आपल्या गुंतवणूकीवर सरस परतावा मिळवण्यासाठी म्युच्युअल फंड हा एक पर्याय असू शकेल. गुंतवणूक करताना नेहमी, गुंतवणूक करणा-या व्यक्तीची जोखिम घेण्याची क्षमता, वय, गुंतवणूकीची रक्कम व सातत्य, त्याची इतर आर्थिक जबाबदारी, गुंतवणूकीचा कालावधी व गुंतवणूकदाराचे आर्थिक उद्दिष्ट (Financial Goals) या सगळ्याच गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि या सर्व निकलातून पारखून सरस परतावा देणारा एक पर्याय म्हणजे म्युच्युल फंड. शेअर बाजारातील थेट गुंतवणूक जरी गुंतवणूकदारास आकर्षित करीत असली तरी त्यासाठी आवश्यक असे भांडवल, दयावा लागणारा वेळ व तांत्रिक ज्ञान, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, शेअर बाजाराचा अभ्यास व जागतिक घडामोडींचा शेअर बाजारावरील परिणामाचा अभ्यास, भीती व लोभ या वरील नियंत्रण, शिस्तबध्दता या सर्व गोष्टी एकत्र जुळून येण्याचा अभाव असल्याने तुलनेने सोपी अशी गुंतवणूक म्युच्युअल फंडात करता येईल. यात जोखीम ही तुलनेने कमी आहे व कमी रकमेतून ही गुंतवणूक करता येईल. कर बचतीचे उद्दीष्ट साध्य करता येईल. अडीअडचणीच्या वेळी गुंतवलेल्या पैश्याची त्वरीत उपलब्धता ही सोयही म्युच्युअल फंडाचा एक पैलू आहे. जितक्या लवकर व जास्त कालावधीसाठी आपण फंडात गुंतवणूक करू तेवढा आकर्षक परतावा आपल्याला मिळू शकेल.
म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचे पैलू-
१) अगदी कमी रकमेत गुंतवणूक करता येईल.
२) एकरक्कमी तसेच टप्प्या टप्प्याने किंवा मासिक हफत्याने गुंतवणूकीची सोय.
३) करबचतीचा पर्याय उपलब्ध.
४) शेअर बाजारातील थेट गुंतवणूकीपेक्षा तुलनेने सोईस्कर व कमी जोखमीचा पर्याय.
५) पारंपारीक गुंतवणूकीपेक्षा आकर्षक परतावा.
६) गुंतवलेला पैसा आवश्यक तेव्हा गरजेच्या वेळी त्वरीत उपलब्ध.
७) चक्रवाढीची ताकद.
८) तज्ञ फंड मॅनेजर्स व रिसर्च टीम यांच्या अभ्यासपूर्ण निर्णयातून फायदा.
९) पूर्णतः करमुक्त लाभांश.
१०) गुंतवणुक कालावधी एक वर्षापेक्षा (Equity फंड) जास्त असल्यास पूर्णतः करमुक्त परतावा.
११) सर्व म्युच्युअल फंड सिक्युरिटी एन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (S.E.B.I.) आणि असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इंडिया (A.M.F.I.) कडे नोंदणीकृत असतात व गुंतवणुकदारांचे हित सांभाळतात.
ELSS – Equity Linked Savings Scheme
इक्वीटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्किम या प्रकारच्या म्युच्युअल फंडातील योजने अंतर्गत गुंतवणुक केल्यास ती आयकर कलम ८०(c) अंतर्गत उत्पन्नातून वजावटीस पात्र ठरते ह्या योजनेतील गुंतवणुकीचा कालावधी कमीत कमी ३ वर्षा साठी आहे. त्याआधी पैसे परत मिळत नाहीत.
तीन वर्षानंतर केव्हाही पूर्ण अथवा आवश्यक तेवढी रक्कम काढता येते व काढलेली रक्कम पूर्णतः करमुक्त असते.
तीन वर्ष सलग पैसे भरून नंतर याच फंडातून दरवर्षी ठराविक रक्कम काढून परत नव्या वा याच योजनेत गुंतवल्यास तुम्हाला नवी गुंतवणुक न करता दरवर्षी करबचतीचा लाभ घेणे शक्य आहे.
या योजनेत गुंतवणुक शेअर बाजारातील कंपन्यांच्या समभागात केली जाते.
म्युच्युअल फंडाचे प्रकार खालिल प्रमाणे -
लिक्वीड फंड - देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकने आपल्या बचत खात्यातील १ कोटी रूपयांपेक्षा कमी शिलकीवर व्याजाचा दर घटवून ४ % वरून ३.५ % केला आहे.सर्वच बँका येणा-या काळात बचत खात्यावरील शिलकी वर देय व्याज दरात कपात करतील असा अंदाज आहे. या घडामोडींचा फटका बसू नये असे वाटणा-या खाते धारकासाठी लिक्वीड फंड हा स्मार्ट पर्याय आहे.
लिक्वीड फंड हा म्युच्युअल फंडाचा प्रकार असा आहे की गुंतवणुकदाराची रक्कम भारत सरकार चे. ट्रेझरी बिल्स व CD (सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट) या प्रकारच्या साधनात गुंतवली जाते. मुदतपूर्तीसाठी ९१ दिवसापेक्षा कमी दिवस शिल्ल्क असलेल्या रोख्यात गुंतवणुक करणे लिक्वीड फंडाना बंधनकारक असते.
सर्वसाधारणपणे लिक्वीड फंडाचा परतावा रिझर्व बँकेच्या रेपो दरापेक्षा थोडा अधिक असतो.
यात गुंतवणूकीच्या अवधी बाबत कमाल अथवा किमान अशी कोणतीही सक्ती नसते.
एखादया गुंतवणूकदाराने शुक्रवारी दुपारी 2 वाजता गुंतवणूक केली व 2 वाजून 5 मिनटांनी पैसे काढून घेण्यासाठी विनंती केली तर त्या गुंतवणूकदाराच्या बॅंक खात्यात सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास पैसे 3 दिवसाच्या गुंतवणूकीवरील नफ्यासह जमा होतील.
आपल्याकडील बचत (saving) वा चालू (Current) खात्यात पडून असलेली रक्कम गुंतवण्यासाठी liquid फंड हा सर्वात कमी जोखीम असलेला प्रकार आहे. Liquid फंडात (ग्रोथ) वृद्धी आणि लाभांश (Dividend) हे पर्याय असतात लिक्विड फंडात मिळणारा लाभांश करमुक्त आहे.
लिक्विड फंडात केलेली गुंतवणूक 3 वर्षानंतर काढुन घेतल्यास झालेल्या फायद्यावर इंडेक्सेशनचा फायदा मिळून कराचे प्रमाण अत्यल्प राखता येऊ शकते.
इंन्स्टंट रिडम्पशन सुविधेअंतर्गत दुपारी3 वाजण्याच्या आधी विनंती केल्यास liquid fund व ultra short term fund यात दररोज 50 हजार रुपये वा योजनेतील शिल्लक रकमेच्या 95% यापैकी जी रक्कम जास्त असेल ती केव्हाही रात्री/ अपरात्री सुद्धा काढता येते. रक्कम काढण्याची विनंती ऑनलाईन नोंदवल्यास रक्कम 10 ते 15 मिनिटात गुंतवणूकदाराच्या बॅंक खात्यात जमा होते.
Liquid फंडाशी संलग्न डेबीट कार्ड सुविधा म्युच्युअल फंडानी सुरु केली आहे. बॅंकाच्या डेबिट कार्डप्रमाणे याचा वापर करता येतो. खरेदीसाठी अथवा इस्पितळात हे कार्ड स्वाइप करता येते. तसेच एटीएम मधून रोख रक्कम देखील या कार्डावरुन काढता येते.
बॅंकेच्या बचत खात्याप्रमाणे सुविधा, सहज व सर्वत्र वापरु शकता येणारे ATM Debit Card आणि बचत खात्यापेक्षा सरस परतावा असे liquid फंडमध्ये गुंतवणूकीचे फायदे आहेत.
दरमहा जमा होणारे वेतन अथवा बचत वा चालू खात्यातील जास्तीची रक्कम ही liquid फंडात जमा ठेवता येईल.
इन्स्टंट रिडम्पशन व ATM/Debit कार्डामुळे गरज पडेल तेव्हा गुंतवलेला निधी सहज वापरता येईल.
Liquid फंडातील शिल्लक रक्कम इक्विटी वा बॅलन्स्ड फंडात वळवता येते.
इक्वीटी फंड
शेअरबाजारातील गुंतवणूक ही नेहमी दिर्घ काळासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे जेव्हा गुंतवणूकीचा काळ मोठा असेल तेव्हा इक्वीटी फंडात गुंतवणूक करावी. मोठा म्हणजे किती काळ? तर तो कमीत कमी 2 वर्षापेक्षा जास्त असावा. आदर्श काळ हा 3 वर्षापर्यंतचा काळ असू शकेल.
यामध्ये ओपन एंडेड आणि क्लोज्ड एंडेड असे प्रकार अंतर्भूत होतात.
ओपन एंडेड फंड – खुली योजना
मुदतीचा ठोस कालवधी नाही. एका युनिटच्या किमतीच्या आधारे केव्हाही खरेदी वा विक्री करता येणे शक्य. खुल्या योजने मध्ये गुंतवणूकीचा काही भाग तरल मालमत्तेमध्ये (liquid Assets) मध्ये ठेवला जातो.
क्लोज्ड एंडेड फंड – मुदतबंद योजना
या योजना साधारण 3 वर्षे मुदतीच्या असतात. काही योजनांचा कालावधी 3 वर्षापेक्षा जास्त असू शकतो. मूदतीपूर्वी गुंतवणूक काढून घेता येत नाही. बहुतेक योजना मुदतीनंतर open ended म्हणजे खुल्या योजनेत रुपांतरीत होतात.
लार्ज कॅप फंड्स (Large Cap Fund)
या फंडात मोठे बाजार भांडवल (market capital) असलेल्या कंपन्यामध्ये गुंतवणूक केली जाते. त्या त्या उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यात गुंतवणूक केली जाते.
मोठे बाजार भांडवल असलेल्या कंपन्या म्हणजे ज्यांचे बाजार भांडवल 5000 करोड रुपयांपेक्षा जास्त आहे.
मिड कॅप फंड्स (Mid Cap Fund)
या फंडातून मध्यम आकारमानाच्या मध्यम बाजार भांडवल असलेल्या म्हणजेच 500 करोड ते 5000 करोड रुपयांपर्यंत बाजार भांडवल असलेल्या कंपन्यामध्ये गुंतवणूक केली जाते.
स्मॉल कॅप फंड्स (Small Cap Fund)
या फंडातून छोट्या आकारमानाच्या तुलनेने कमी बाजार भांडवल असलेल्या म्हणजेच 500 करोड रुपयांपेक्षा कमी बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते.
मल्टी कॅप फंड्स (Multi Cap Funds)
या फंडात विशिष्ट कंपन्यामध्येच गुंतवणूकीचे बंधन नसल्याने या फंडातून तुलनेने अधिक परतावा दिला जातो.
डेब्ट फंड (कर्जरोखे आधारीत योजना)
यात अनेक योजना असतात
यात शेअरबाजाराची जोखीम नसते व त्यामुळे काही योजना मधून मिळणारा परतावा हा तेवढ्याच कालावीच्या फिक्स्ड डिपॉझीट (मुदत ठेवी) च्यापेक्षा जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते. यात अनेक योजना असतात.
a ) Liquid फंड
b ) इन्कम योजना – Income Plan – उत्पन्न योजना
यात सरकारी व कॉर्पोरेट कंपन्यांच्या बॉड्स व डिबेंचर्स सारख्या निश्चीत उत्पन्न देणा-या कर्जरोख्यात व रोख्यात गुंतवणूक केली जाते. या योजनातून मिळवणारे परतावे कमी जोखमीचे व स्थिर असतात.
c ) मंथली इन्कम प्लान (मासिक उत्पन्न योजना)
या प्रकारच्या योजनेत फंडातील एकूण रकमेच्या 75% ते 80% रक्कम दिर्घ मुदतीच्या सरकारी व कंपन्याच्या कर्जरोख्यात व उर्वरीत 20% ते 25% रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते व नियमीत दरमहा / त्रैमासिक परतावा (Dividend) दिला जातो.
Balanced Plan (समतोल योजना)
नावाप्रमाणे या योजनेत ठराविक प्रमाणात शेअर बाजारात व रोख्यांमध्ये गुंतवणूक केली जाते.यात निव्वळ इक्विटी फंडपेक्षा कमी जोखम असते.
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही lumpsum अथवा SIP (Systematic Investment Planning) म्हणजेच नियमीत केलेली गुंतवणूक असू शकेल.
SIP मध्ये गुंतवणूक दरमहा रू ५००/- इतक्या कमी रकमेने सुरू करता येते.
यामुळे आपली गुंतवणूक अधिक शिस्तबध्द पध्दतीने होते व नियमीत गुंतवणूकीमूळे संपत्ती निर्माण होते. यात चक्रवाढीची शक्ती व रूपयाच्या किमतिची सरासरी याचा लाभ ग्राहकाला होतो. (Power of compounding & Rupee cost averaging)
१)म्युच्युअल फंड हे गुंतवणूकीचे प्रभावी माध्यम आहे.
२) प्रत्येकाच्या गरजेनुसार म्युच्युअल फंडाच्या विविध योजना गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतात.
३)म्युच्युअल फंडात जास्त जोखमीच्या तसेच जवळपास अजिबात जोखीम नसणा-याही योजना असतात.
४)म्युच्युअल फंडाच्या कर बचतीच्याही योजना असून यातून आयकर कलम ८०-सी अंतर्गत सुट मिळते.
५)म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी योजनेत केलेल्या गुंतवणूकीवर एक वर्षानंतर मिळणारा सर्व फायदा (As per LTCG New Rule) असतो.
६)म्युच्युअल फंडाच्या डेब्ट योजनेत केलेल्या गुंतवणूकीवर एक वर्षानंतर मिळणा-या उत्पन्नावर इंडेक्ससेशनचा फायदा घेऊन कर बचत करता येते.
७) म्युच्युअल फंडात दिर्घकाळासाठी नियमीत दरमहा गुंतवणूक केली असता फार चांगला फायदा मिळण्याची शक्यता असते.
८)तज्ञ व्यक्ती तुमच्या गुंतवणूकीची काळजी घेतात.
९) शेअर बाजारातील दिर्घकालीन वाढीचा फायदा मिळतो.
१०)नियमीत बचतीची सवय लागते.
११) भविष्यातील आर्थीक गरजा भागवल्या जातात.
१२) संपत्ती निर्माण होते.
१३) तुमच्या गुंतवणूकीचा तपशील केव्हाही ऑनलाईन पहाता येतो.
१४) केव्हाही पैसे काढण्याची सुवीधा असल्यामुळे गरजेला केव्हाही पैसे मिळू शकतात.
१५) म्युच्युअल फंडाच्या योजनेत केलेल्या गुंतवणूकीतून कोणतीही कपात केली जात नसल्यामुळे संपुर्ण रक्कम गुंतवणूकीलाच जाते.
गुंतवणूकीचा सल्ला व म्युच्युअल फंडाच्या योजनेच्या योग्य निवडीसाठी आपण आम्हाला 8459775427 या फोन नंबर वर संपर्क करू शकता.
या मुळे आम्ही आपल्या प्रश्नाना योग्य मार्गदर्शन करू ,पण आपल्या घरूनच आपण कशाप्रकारे उत्तम फंडात गुंतवणूक करू शकाल व त्या गुंतवणूकीची सदर परिस्थिती वेळोवेळी कशी माहीती करून घ्याल याबाबत योग्य मार्गदर्शन करू.
Comments
Post a Comment