मी लाभार्थी, सोशल मीडिया आणि जनता राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला आॅक्टोबर २०१७ मध्ये तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त फडणवीस सरकारकडून तीनवर्षतील कामगिरीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यास सुरवात केली आहे. त्यामध्ये 'मी लाभार्थी' हे शब्द प्रयोग करण्यात आला आहे. राज्यातील गरिबांना फडणवीस सरकारच्या योजनांचा लाभ कसा झाला हे 'मी लाभार्थी' या जाहिरातींमधून दाखविले जात आहे. मात्र, सोशल मीडियाने सरकारच्या या जाहिरातीची खिल्ली उडवली आहे. सन २०१४ च्या लोकसभा व राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 'सोशल' मीडियाचा प्रभावीपणे वापर केला होता. त्याची तयारी सन २०१२ पासून मोदी स्वता करीत होते. त्याचा फायदा त्यांना दोन्ही निवडणुकांमध्ये झाला. व सरकार केंद्रात प्रचंड बहुमताने निवडून आले, तर राज्यात सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपची गणना झाली. तोच सोशल मीडिया आता सरकारच्या विरोधात जाऊ लागला असल्याचे 'मी लाभार्थी' या जाहिरातीनंतर स्पष्ट झाले आहे. 'मी लाभार्...