ग्रामीण भारताच्या सर्वसमावेश विकासासाठी २०१८-१९ चा अर्थसंकल्प: डॉ.संतोष सूर्यवंशी माननीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भाजप सरकारचा पाचवा अर्थसंकल्प सादर केला आहे. भाजप सरकारच्या वतीने सलग पाच वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अरुण जेटली हे पहिले अर्थमंत्री आहेत. अर्थसंकल्प सादर करत असताना जेटली यांनी समाजातील सर्व घटकांचा विचार केलेला दिसून येत आहे. त्यामध्ये त्यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला , तरुण, शेतकरी, महिला शेतकरी, ग्रामीण- शहरी असा कोणताही भेदभाव न करता देशातील सर्वसमावेशक विकासाची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प हा ग्रामीण भागाच्या आणि शेतीच्या विकासासाठी आहे. अर्थसंकल्पामध्ये शेती आणि ग्रामीण विकासासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. एकूण अर्थसंकल्पाच्या 13.34 लाख कोटी रुपये या क्षेत्रासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. अर्थसंकल्पामध्ये मागील काही वर्षापासून देशातील शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनांनी सातत्याने किमान आधारभूत किमती ह्या उत्पादन खर्चाच्या दीडपट...