Skip to main content

अर्थसंकल्प: 2021 ; जाणून घ्या अर्थसंकल्पाविषयी रंजक माहिती



केंद्र सरकारने गेल्या वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक महत्वाच्या घोषणा केल्या होत्या. दोन आठवड्यानंतर संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात केंद्र सरकार १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. यंदा अर्थसंकल्पावर करोनाचा प्रभाव राहणार आहे. करोना संकटामुळे झालेली आर्थिक हानी भरून काढण्याच्या दृष्टीने सरकार काटकसरीचा अर्थसंकल्प सादर करेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

1. वर्ष २०२० मध्ये भारताचा एकूण अर्थसंकल्प किती होता?
- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२० रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्यात एकूण ३०.४२ लाख कोटींचा खर्च प्रस्तावित होता.

2. 'मेक इन इंडिया'साठी मागील अर्थसंकल्पात किती तरतूद होती?
- २०२०-२१ या अर्थसंकल्पात 'मेक इन इंडिया'साठी केंद्र सरकारने १२८१.९७ कोटींची तरतूद केली. २०१९-२० च्या तुलनेत यामध्ये वाढ केली.

3. 'आयकर कलम ८० सी' साठी २०२०-२१ मध्ये किती कर सवलत देण्यात आली?
- २०२०-२१ या वर्षातील अर्थसंकल्पात 'आयकर कलम ८० सी' मध्ये वार्षिक १,५०,००० रुपयांची कर सवलत देण्यात आली आहे.

4. महसुली अर्थसंकल्प (Revenue Budget) म्हणजे काय?
- महसुली अर्थसंकल्प म्हणजे सरकारला विविध स्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पनाचा लेखाजोखा आहे. ज्यात कर महसूल आणि इतर महसुलाचा समावेश असतो. या उत्पन्नानुसार सरकार आगामी वर्षातील खर्चाचे नियोजन करते.

5. अर्थसंकल्प वाचनाचा (Budget Speech) उद्देश काय?
- आगामी आर्थिक वर्षात सरकारकडून कोणती विकास कामे केली जाणार आहेत याची रूपरेषा अर्थसंकल्पात ठरवली जाते. अर्थसंकल्पाला संसदेच्या दोन्ही सभागृहांची मान्यता मिळवण्यासाठी तो जाहीर केला जातो.

6. संसदेच्या कोणत्या सभागृहात बजेट सादर केले जाते?
- लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्पाचे जाहीर वाचन करतात. लोकसभेत बजेट मांडले जाते.

7. एका वर्षात कितीवेळा बजेट मांडले जाते?
- एका वर्षात एकदाच अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र ज्या वर्षी सार्वत्रिक निवडणूक असते त्या वर्षात दोनदा अर्थसंकल्प सादर केला जातो.

8. केंद्र सरकारने संरक्षणावर (India spend on Defence) किती खर्च केला आहे?
- संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो. २०१९ मध्ये सरकारने संरक्षण क्षेत्रावर १९१७ अब्ज डॉलरचा खर्च केला होता. २०१८ च्या तुलनेत संरक्षण खर्चात ३.६ टक्के वाढ झाली होती.

9. २०२० चा अर्थसंकल्प किती होता? (How much is the 2020 Union budget)
- अर्थसंकल्प २०२० मध्ये विकासदर १० टक्के राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. २०२०-२१ या वर्षात ३०,४२,२३० कोटींचा खर्च प्रस्तावित होता. तर २२,४५,८९३ कोटी उत्पन्नाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

10. केंद्र सरकारने आतापर्यंत किती कर महसूल मिळवला आहे? (How much tax does India collect)
- करोना संकटाने कर उत्त्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत सरकारचे एकूण कर उत्पन्न ७.२० लाख कोटी आहे. त्यात गतवर्षीच्या तुलनेत २७.५ टक्के घसरण झाली आहे.

https://maharashtratimes.com/business/business-news/


Comments

Popular posts from this blog

Bazaarbull Trading Academy

  Advanced Technical Analysis  आणि ऑप्शन ट्रेडिंग ची नवीन बॅच   प्रोफेशनल ट्रेडर्स कोर्स   दिनांक 10 March 2023 पासून सुरू होत आहे. सोमवार ते शुक्रवार या  दररोज संध्याकाळी 8 ते 10 PM  या दरम्यान लेक्चर असतात. ( 30 Day )प्रोफेशनल ट्रेडर्स कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी कमीत कमी 6 महिने ऑप्शन ट्रेडिंग चा अनुभव असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर लॅपटॉप देखील आवश्यक आहे. कोर्सची प्रवेश फी 24000 आहे.  अधिक माहितीसाठी संपर्क  8459775427 बँक निफ्टी चा प्रीमियम टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी   Zerodha , Angle one,  Upstox and Aliceblue  मध्ये आमच्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करणे करणे अनिवार्य आहे. अकाउंट ओपन झाल्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि त्यामध्ये फंड add करून त्याचा स्क्रीन शॉट पाठवणे. डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी पुढील लिंक चा उपयोग करा. Zerodha https://zerodha.com/open-account?c=ZMPBRZ Angle broking https://tinyurl.com/yd5t4856 Aliceblue https://alicebluepartner.com/open-myaccount/?P=SSP729 ऑप्शन ट्रेडिंग शिकण्यासाठी फ्री कोर...

शेअर मार्केट: बेसिक आणि टेक्निकल कोर्स

बेसिक आणि टेक्निकल कोर्स प्रा.डॉ.संतोष सूर्यवंशी  ८४५९७७५४२७/ ७७९८३७५३५६  Email: sant.sury@gmail.com अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम मराठी पाऊल आर्थिक सक्षमतेकडे नमस्कार, मी प्रा.डॉ. संतोष सूर्यवंशी                          २०१४ पासून मी शेअर बाजारात कार्यरत आहे. मी स्वत: एक गुंतवणूकदार आणि पूर्ण वेळ Trader आहे, तसेच मी मराठी तरुणांना अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम बनवण्यासाठी  काम करीत आहे . हे मार्गदर्शन करण्यासाठी youtube आणि ब्लॉगच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबत आहे. माहिती तंत्रज्ञान याचा उपयोग करून मराठी लोकांपर्यंत शेअर बाजारातल्या उत्पन्नाची  माहिती पोहोचवणे हे माझे उद्दीष्ट आहे. मी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असेअसा कोर्स डिझाईन केलेले आहेत. आणि तंत्रज्ञानामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या वेळेत हा कोर्स रात्री ८ ते १० या वेळेत पूर्ण करू शकता. Advanced Technical analysis online courses        " बेसिक आणि टेक्निकल कोर्सचा अभिप्राय. नमस्कार,  मी शंकर ढाकणे, सोलापूर बार्शी सर...

Digital India Initiatives by Modi Government

                                       Digital India Initiatives by Modi Government  ●        New checks on booking of e-ticket/i-ticket through IRCTC website introduced with a view to further prevent possible misuse. Under the new provisions a maximum of 6 tickets can be booked online by an individual user in a month on IRCTC website. ●         Cancellation of PRS counter tickets through IRCTC website and 139 introduced ●         Printing of Bar Code on Unreserved tickets introduced to Prevent Fraud. ●         International Debit and Credit Cards accepted for payment for e-ticketing through IRCTC website ●         India’s first High Speed Public Wi - Fi Service at Mumbai Central station inaugurated. ●   ...