मोदीनॉमिक्स आणि विमुद्रीकरण डॉ. संतोष दशरथ सूर्यवंशी. श्री संत दामाजी महाविद्यालय,मंगळवेढा अर्थशास्त्र विभाग. Email ID- sant.sury@gmail.com सारांश: या संशोधन लेखाचा मुख्य उद्देश मोदीनॉमिक्स आणि विमुद्रीकरण या संकल्पना स्पष्ट करणे आहे. भारत सरकारची अधिकृत संकेतस्थळ , भारतीय रिझर्व बँकेचा वार्षिक अहवाल, Economic and Political weekly , लोकसभा व राज्यसभेतील चर्चा , दि.हिंदू, इंडियन एक्सप्रेस इत्यादी दुय्यम साधन सामग्रीचा उपयोगात करण्यात आला आहे. मोदीनॉमिक्सचा अभ्यास करण्यासाठी सन २०१४ ते डिसेंबर २०१७ हा कालखंड विचारात घेतला आहे. मोदीनॉमिक्सची सुरवात अच्छे दिन आयेंगे पासून सुरु होऊन तो सब का साथ सब का विकास आणि संकल्प से सिद्धि तक पर्यंत पोहचला आहे . देशातील ५८ टक्के आज ही उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहेत, ८२ टक्के शेतकरी लहान व सीमांत आहेत, २१ % लोक दारिद्रय रेषेखालील जीवन जगत आहेत. यासर्वांनच्या विकासाशिवा सब का साथ सब का विकास शक्य नाही. उद्योगपूरक आर्थिक धोरण, उद्योग समूहाना किमान किमतीला जमीनिची उपलब्धता, श्रमकायद्यामध्ये सुधारणा, पायाभूत सु...