२०२० हे वर्ष शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी चढ-उताराचे राहिले आहे. मार्च तळापासून मार्केटने जवळपास ८५ टक्के पेक्षा जास्तची वाढ नोंदवली आहे. ज्यांनी मार्च २०२० नंतर गुंतवणूक केली त्यांना चांगला परतावा मार्केटने दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक गुंतवणूकदारांच्या मनामध्ये प्रश्न आहे की २०२१ वर्षात ही तेजीची कायम राहणार का.
विश्लेषकांच्या मते, बाजारातील तेजी २०२१ मध्ये २०२० शी तुलना करता वेगाने असणार नाही. मात्र बाजारातील वातावरण हे गुंतवणुकीसाठी सकारात्मक असेल. आयसीआयसी सिक्युरिटीजने सांगितले आहे की २०२१ वर्षे गुंतवणूकदारांसाठी फ्लॅट रिटर्न देणारे असेल. एचडीएफसी सिक्युरिटी ने 2021 मध्ये गुंतवणूक करण्यासाठी बंधन बँक, बिरला कार्पोरेशन, हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसिस यासारख्या मजबूत समभागांची शिफारस केली आहे.
त्याचबरोबर ICIC सिक्युरिटी आणि ऍक्सेस सिक्युरिटीने भारती एअरटेल या समभागाची शिफारस केली आहे. त्याचबरोबर २०२१ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुचवण्यात आलेल्या भागांमध्ये प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ इंडिया, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, सनफार्मा, रिलॅक्स फुटवेअर, युनायटेड स्पिरिट, बालकृष्ण इंडस्ट्रीज, अदानी इंटरप्राईजेस, कोलगेट पामोलिन, स्टार सिमेंट इत्यादी सर्व भागांचा समावेश आहे.
Comments
Post a Comment