थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन मित्रांनो, निष्क्रीय कमाई म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहितच असेल! आपले एखादे असे इन्कम हवे जे कमवण्यासाठी आपल्याला कसलेही श्रम पडु नयेत, आणि ती कमाई मिळवण्यासाठी आपली कसलीही उर्जा खर्च होवु नये, किंवा झालीच तर अगदीच थोडी, म्हणजे किंचितशी उर्जा खर्च व्हावी. मागचे काही लेख लिहुन मी तुम्हाला शेअरमार्केटमधुन पॅसिव्ह इन्कम म्हणजे निष्क्रिय कमाईचा अखंड स्त्रोत कसा उभा करावा, ह्याविषयी काही माहिती दिली. मित्रांनो , तुमच्यापैकी बरेच जण शेअर मार्केटमध्ये सक्रिय असतील, तुम्ही अनेकदा नफ्याची ट्रेडींग केली असेल, कित्येक वेळा तीन महिने ते एक वर्ष शेअर्स सांभाळले असतील, विकले असतील, नाही म्हण्टले तरी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करण्यासाठी उर्जा आणि वेळ दोन्ही खर्च करावीच लागते, जर मी तुम्हाला एक अशी पद्धत सुचवली, जी वापरण्यासाठी तुम्हाला अजिबात डोकं लावावं लागणार नाही, फक्त एक सिस्टीम बनवावी लागेल आणि तिला फॉलो करावे लागेल, ही सिस्टिम फॉलो केल्यास तुम्हाला काय काय फायदे होतील? ----------------------------------------------------------...