Skip to main content

शेअर बाजारात ५६८ अंकाची तेजी

चालू आठवड्यामध्ये भारतीय आणि जागतिक शेअर बाजारात खूप मोठ्या प्रमाणात चढ उताराचा (VOLATILE)  बघायला मिळाली आहे. गुरुवारच्या मोठया सेल ऑफ नंतर आज मात्र बाजाराला जागतिक स्तरावरील संकेतांनी सावरले, कारण काल अमेरीकन बाजारात तेजी आली होती त्याची प्रतिक्रिया सिंगापूर निफ्टी मध्ये बघायला मिळाली, सकाळी सिंगापूर निफ्टी 170 पेक्ष्या जास्त अंकांनी सकारात्मक होते त्याचाच परीणाम भारतीय शेअर बाजार उघडला तेव्हा दिसला. सकाळी तेजीत उघडलेला बाजार (Todays Stock Market ) काही काळ खाली वर झाला त्याला कारण म्हणजे देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात वाढत्या करोनाची रुग्ण संख्या ह्या सर्वांचा परिणाम बाजार बंद झाला. 
 तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX तब्बल 568 अंकांनी वधारून 49008 ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास संमभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा 182 अंकांनी वधारून 14507 वर स्थिरावला, त्याच बरोबर बारा बँकिंग मिळून तयार झालेला NIFTY BANK 311 अंकांनी वधारून 33318 ह्या पातळीवर बंद झाला. 
आजच्या सत्राला वर ठेवण्यात मेटल, एफ एम सी जी, ऑटो क्षेत्रातील शेअर्सचा मोठा वाटा दिसला . आजच्या बाजाराच्या  (Todays Stock Market ) लांबीचा विचार केला तर 1633 समभाग सकारात्मक होते तर 1283 समभाग नकारात्मक होते आणि 167 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसला नाही. 
बाजारातील जाणकारांनी उल्लेख केला होता की, बाजारात मोठया प्रमाणात IPO येत आहेत त्यामुळे बाजारातून पैसे बाहेर निघत आहे त्याच बरोबर FII वरच्या स्तरावर विक्री करतांना दिसत आहे आणि वाढती करोनाची संख्या बाजारासाठी  काही काळ तरी चिंतेची बाब आहे , त्यामुळे नवीन IPO हे ISSUE किमती पेक्ष्या कमी भावात उघडत आहेत . गुंतवणूकदारांनी प्रत्येक खालच्या स्तरावर गुंतवणूक करावी असे बाजारातील जाणकार सांगत आहेत.सोमवारी आणि पुढील शुक्रवारी शेअर बाजार बंद राहणार आहे .


(Todays Stock Market )
NIFTY १४५०७ + १८२
SENSEX ४९००८ + ५६८
BANK NIFTY ३३३१८ + ३११
आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 
TATA STEEL ७६५ + ६%
BAJAFINSV ९४६० + ४%
ASIANPAINT २४९८ + ४%
HINDALCO ३२६ + ४%
TATA MOTOR २९७ + ४%
आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव
UPL ५८७ – २%
POWERGRID २१४ – १%
EICHERMOT २५६२ – १%
ITC २११ – ०.३३%
INDUSINDBK ९५५ – ०.२३%

Comments

Popular posts from this blog

Bazaarbull Trading Academy

  Advanced Technical Analysis  आणि ऑप्शन ट्रेडिंग ची नवीन बॅच   प्रोफेशनल ट्रेडर्स कोर्स   दिनांक 10 March 2023 पासून सुरू होत आहे. सोमवार ते शुक्रवार या  दररोज संध्याकाळी 8 ते 10 PM  या दरम्यान लेक्चर असतात. ( 30 Day )प्रोफेशनल ट्रेडर्स कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी कमीत कमी 6 महिने ऑप्शन ट्रेडिंग चा अनुभव असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर लॅपटॉप देखील आवश्यक आहे. कोर्सची प्रवेश फी 24000 आहे.  अधिक माहितीसाठी संपर्क  8459775427 बँक निफ्टी चा प्रीमियम टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी   Zerodha , Angle one,  Upstox and Aliceblue  मध्ये आमच्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करणे करणे अनिवार्य आहे. अकाउंट ओपन झाल्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि त्यामध्ये फंड add करून त्याचा स्क्रीन शॉट पाठवणे. डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी पुढील लिंक चा उपयोग करा. Zerodha https://zerodha.com/open-account?c=ZMPBRZ Angle broking https://tinyurl.com/yd5t4856 Aliceblue https://alicebluepartner.com/open-myaccount/?P=SSP729 ऑप्शन ट्रेडिंग शिकण्यासाठी फ्री कोर...

YouTube

 

शेअर मार्केट: बेसिक आणि टेक्निकल कोर्स

बेसिक आणि टेक्निकल कोर्स प्रा.डॉ.संतोष सूर्यवंशी  ८४५९७७५४२७/ ७७९८३७५३५६  Email: sant.sury@gmail.com अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम मराठी पाऊल आर्थिक सक्षमतेकडे नमस्कार, मी प्रा.डॉ. संतोष सूर्यवंशी                          २०१४ पासून मी शेअर बाजारात कार्यरत आहे. मी स्वत: एक गुंतवणूकदार आणि पूर्ण वेळ Trader आहे, तसेच मी मराठी तरुणांना अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम बनवण्यासाठी  काम करीत आहे . हे मार्गदर्शन करण्यासाठी youtube आणि ब्लॉगच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबत आहे. माहिती तंत्रज्ञान याचा उपयोग करून मराठी लोकांपर्यंत शेअर बाजारातल्या उत्पन्नाची  माहिती पोहोचवणे हे माझे उद्दीष्ट आहे. मी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असेअसा कोर्स डिझाईन केलेले आहेत. आणि तंत्रज्ञानामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या वेळेत हा कोर्स रात्री ८ ते १० या वेळेत पूर्ण करू शकता. Advanced Technical analysis online courses        " बेसिक आणि टेक्निकल कोर्सचा अभिप्राय. नमस्कार,  मी शंकर ढाकणे, सोलापूर बार्शी सर...