आज सकाळी शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात झाली.
मात्र ही सकारात्मक वाढ टिकून राहिली नाही. मागील काही सत्रामध्ये भारतीय शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे या घसरणी मध्ये आज देखील वाढ झाली आहे. आज राष्ट्रीय शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रांमध्ये घट नोंदवण्यात आली आहे. निफ्टी निर्देशांकामध्ये 163 अंकांची घसरण झाली आहे. त्याचबरोबर बँकनिफ्टी मध्ये 372 अंकांची घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण माहिती तंत्रज्ञान समभागांमध्ये झाली आहे त्यामध्ये तब्बल 810 अंकांची घसरण नोंदविण्यात आली आहे. HCL Technologies, इन्फोसिस, डॉ. रेड्डीज, दिविसलाब, हेरोमोटोकॉप या प्रमुख भागांमध्ये मोठी घसरण झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणीकृत असणाऱ्या 1712 पैकी 1344 समभागांमध्ये आज घट नोंदवण्यात आली आहे.
आज निफ्टी आणि बँक निफ्टी या महत्त्वाच्या निर्देशांकाचा भाव हा 50 दिवसाच्या सरासरी किमतीच्या खाली बंद झाला आहे. निफ्टी आणि बँक निफ्टीचे स्ट्रक्चर टेक्निकल नुसार बिघडलेल्या आहे. त्याचबरोबर ऑप्शन बेस देखील बदलला आहे.
आज भारतीय बाजारामध्ये जी घट नोंदवण्यात आली आहे याच्या पाठीमागे अमेरिकन बोंड यील्ड मध्ये झालेली वाढ व भारतामध्ये सतत वाढत असणाऱ्या Covid-19 च्या केसेस यास जबाबदार आहेत. त्याचबरोबर आज बाजारात माहिती तंत्रज्ञान आणि फार्मा कंपन्या मध्ये अधिक प्रमाणात प्रॉफिट बुकिंग झाल्याचे दिसत आहे.
Comments
Post a Comment