इलेक्ट्रॉनिक्स कार उत्पादक कंपनी टेसलाचे मालक एलन मस्क यांनी बिटकॉइन मध्ये सोमवारी 1.5 बिलियन गुंतवणूक केल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर बीटकॉइनच्या किमतीमध्ये मोठी तेजी आली आहे. टेसलाच्या गुंतवणुकी नंतर बीटकॉइनच्या किमती मध्ये 14 टक्क्यांची वाढ झाली होती. बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करत असताना एलन मस्क यांनी सांगितले आहे की, टेसला कंपनी "आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी बिटकॉइन चा वापर करू इच्छित आहे". सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बिटकॉइनची किंमत 43000 डॉलर इतकी आहे.
काय आहे बिटकॉइन जाणून घ्या.
बिटकॉइन एक आभासी चलन आहे. अन्य देशांच्या चालना प्रमाणे बिटकॉइन चा वापर खरेदी- विक्री व्यवहार केला जातो. बिटकॉइनचा वापर वेगाने वाढत आहे. पेपालने देखील अलीकडे त्यांच्या प्लॅटफॉर्मवर बिटकॉइन द्वारे खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्याची परवानगी दिली आहे.
भारतात बीटकॉइनच्या वापराच्या संदर्भात भारत सरकार किंवा रिझर्व बँकेकडून कोणते ही मार्गदर्शक नियम देण्यात आले नाहीत. रिझर्व बँक ऑफ इंडियाने 2018 मध्ये क्रिप्टो करेंसी संदर्भात एक परिपत्रक काढून भारतामध्ये क्रिप्टो करेंसी चा व्यवहार करण्यास प्रतिबंध केला आहे.
Comments
Post a Comment