आपल्या आर्थिक जीवन चक्रामध्ये अडचणी आणि संधी निर्माण होत असतात. यामध्ये आपण उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करतो. उत्पन्नातील काही रक्कम खर्च करतो आणि शिल्लक राहिलेली बचतीच्या स्वरूपात गुंतवणूक करीत असतो. वैयक्तिक आर्थिक नियोजनामध्ये वय वर्ष 30 ते 40 खूप महत्त्वाचे असते. या वयामध्ये बहुतेक लोक त्यांच्या वैयक्तिक नियोजनाच्या गोड स्थळी पोचलेले असतात. कारण आपल्याकडे अधिकतर मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये वयाच्या 25 ते 35 या दरम्यान नोकरी लागते किंवा काही तर उद्योग धंदा सुरू केलेला असतो. सुरुवातीला इन्कम सुरू झाल्यानंतर आपण बचत न करता पैसा खर्च करीत असतो. अशा वेळी लोक बचत आणि गुंतवणुकीच्या योजने कडे दुर्लक्ष करतात. पैशाची गोष्ट अशी अवस्था आहे. जेथे चुका सुधारण्याची क्षमता कमी असते. कारण या चुका दुरुस्त करण्यासाठी खूप कमी वेळ उपलब्ध असतो. म्हणून आपले आर्थिक आरोग्य सुरक्षित ठेवण्याची आणि चांगल्या भविष्यासाठी मार्ग तयार करण्याची ही वेळ आहे. आपण आयुष्यातील आर्थिक चुका लवकर दुरुस्त करणे आवश्यक आहे. सर्वसाधार...