100 रुपये वाचवून अशी करा मोठी कमाई, महागाईची दूर होईल चिंता: या महागाईच्या दिवसांत प्रत्येकालाच स्वत:चं भवितव्य सुरक्षित करायचं असतं. यासाठीच बचतीचे वेगवेगळे मार्ग आहेत.तुम्ही रोज जर 100 रुपयांची बचत केली तर मोठ्या रकमेची बचत होऊ शकते. दिसायला दिवसाला 100 रुपये दिसत असले तरी त्याचा फायदा कित्येक पटीने होऊ शकतो.
SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात करा गुंतवणूक
घटत्या व्याजदरांच्या या दिवसांत FD च्या ऐवजी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं हा चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर चांगला फायदा मिळू शकतो. त्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडात SIP च्या माध्यमातून रोज 100 रुपयांच्या हिशोबाने दरमहा 3 हजार रुपये जमा होऊ शकतात.
25 वर्षांत 9 लाखांची गुंतवणूक
SIP कॅल्क्युलेटरच्या हिशोबाने तुम्ही जर 25 वर्षांसाठी गुंतवणूक करत राहिलात आणि 15 टक्के रिटर्न्सची अपेक्षा करत असाल तर त्याचा मोठा फायदा होईल. दरमहा 3 हजार रुपये या न्यायाने तुम्ही एकूण 9 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकाल. 25 वर्षांत 15 टक्के रिटर्न्सचा हिशोब केला तर गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला 98. 5 लाख रुपये मिळतील. यातले 89.5 लाख रुपये तुमचा फायदा असेल आणि उरलेले 9 लाख रुपये तुमची गुंतवणूक असेल.
म्युच्युअल फंडात तुम्ही तुमच्या सोयीने आणि इनकमच्या हिशोबाने गुंतवणूक करू शकता.म्युच्युअल फंडात तुम्ही महिन्याला कमीतकमी 500 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. SIP मध्ये गुंतवणूक केली तर जेवढे जास्त दिवस तुम्ही पैसे गुंतवता तेवढा तुम्हाला अधिक फायदा मिळतो.त्यामुळेच FD वर मिळणाऱ्या व्याजदरांपेक्षा म्युच्युल फंडात गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल आहे.
Comments
Post a Comment