Skip to main content

सेन्सेक्सचा रेकॉर्ड; 'ही' आहेत तेजीमागील ४ कारणे

केंद्र सरकारचा आर्थिक सुधारणांचा धडाका, परकीय गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने आज मुंबई शेअर बाजारच्या सेन्सेक्सने तब्बल ४०० अंकांची झेप घेतली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ४१३ अंकांच्या वाढीसह ४१ हजार ३५२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १११ अंकांच्या वाढीस १२ हजार १६५ अंकाच्या नव्या विक्रमाची नोंद केली. या तेजीच्या लाटेने गुंतवणूकदारांना किमान दीड लाख कोटींनी मालामाल केले. शेअर बाजाराच्या इतिहासातील सेन्सेक्स आणि निफ्टीचा आतापर्यंतचा रेकॉर्ड स्तर आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही नजीकच्या काळात व्याजदर कपातीचे संकेत दिले होते. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बँक गरज पडेल तेव्हा हस्तक्षेप करेल,असे त्यांनी 'इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह'मध्ये उपस्थितांना आश्वस्त केले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या परिषदेला संबोधित करताना जीएसटी दरवाढीच्या शक्यता फेटाळून लावल्या. जीएसटी दरवाढीचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. वस्तूंचा खप वाढण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. लोकांच्या हातातील पैसा वाढवा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सीतारामन यांनी सांगितलं. या सर्व घडामोडी शेअर बाजारातील तेजी वाढण्यास कारणीभूत ठरल्याचे दलालांनी सांगितले. आजच्या सत्रात ऑटो, टेलिकॉम, मेटल, आयटी, एनर्जी या क्षेत्रात खरेदी दिसून आली. या तेजीच्या लाटेने गुंतवणूकदारांना किमान दीड लाख कोटींनी मालामाल केले, असा अंदाज दलालांनी व्यक्त केला.

तेजीमागील 'ही' आहेत ४ कारणे
अमेरिका-चीन व्यापारी संघर्षावर तोडगा दृष्टिपथात
मागील १७ महिन्यांपासून चिघळलेला आणि जागतिक अर्थव्यवस्थेची डोकेदुखी बनलेल्या अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षावर दोन्ही देशांकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यादृष्टीने गेल्या आठवड्यात प्राथमिक चर्चा झाली आहे. हा तोडगा लवकर निघेल, या आशेने जागतिक गुंतवणूकदार उदयोन्मुख बाजारात जोमाने शेअर खरेदी करीत आहेत.
- अडीच अब्ज डॉलरचा मार्ग मोकळा
देशात परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. परदेशी गुतवणूकदारांची (फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर) कंपनीमधील गुंतवणूक मर्यादा सध्याच्या २४ टक्क्यांहून अधिक वाढण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात घोषणा केली जाईल, असे शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. येत्या एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढेल, असे मॉर्गन स्टॅन्ले या संस्थेने म्हटलं आहे. त्याचेही पडसाद शेअर बाजारावर उमटले.

- परदेशी गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी
ब्रेक्झिट आणि अमेरिका-चीन व्यापारी संघर्ष मिटण्याची चिन्हे दिसत असल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भारतीय शेअर बाजारांमधील तेजी वाढण्यास परदेशी गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी कारणीभूत ठरली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी इक्विटीमध्ये ८५० कोटींची गुंतवणूक केली आहे.
- तांत्रिक सपोर्ट
अमेरिका-चीन व्यापारी संघर्ष मिटेल या आशेने युरोप, अमेरिकासह आशियातील भांडवली बाजारांना एक टेक्निकल सपोर्ट मिळाला. या वृताने बाजारात तेजीला पोषक वातावरण निर्माण झाले.


तेजीतील शेअर
टाइम टेक्नोप्लास्ट, एनआयआयटी टेक्नॉलॉजी, अव्हेन्यू सुपरमार्ट , जिंदाल स्टील, एमएमटीसी, रिलायन्स इन्फ्रा , जैन इरिगेशन, दिवाण हौसिंग, रिलायन्स कॅपिटल, टाटा स्टील, भारती एअरटेल, स्टील ऑथॉरिटी, फिनोलेक्स, वेदांता , एलआयसी हौसिंग फायनान्स, बजाज इलेक्ट्रिकल, महानगर गॅस हे शेअर वधारले.

घसरलेले शेअर
इंडियन बँक, कोर्पोरेशन बँक, बंधन बँक, मेंगलोर रिफायनरी, मॅग्मा फिनकॉर्प, स्टार सिमेंट, आयआरबी इन्फ्रा, वोडाफोन आयडिया, श्री सिमेंट, नेस्को, बाटा, एडलवाईज फायनान्स, डीएलएफ, ओएनजीसी, युनियन बँक या शेअरमध्ये घसरण झाली.

Comments

Popular posts from this blog

Bazaarbull Trading Academy

  Advanced Technical Analysis  आणि ऑप्शन ट्रेडिंग ची नवीन बॅच   प्रोफेशनल ट्रेडर्स कोर्स   दिनांक 10 March 2023 पासून सुरू होत आहे. सोमवार ते शुक्रवार या  दररोज संध्याकाळी 8 ते 10 PM  या दरम्यान लेक्चर असतात. ( 30 Day )प्रोफेशनल ट्रेडर्स कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी कमीत कमी 6 महिने ऑप्शन ट्रेडिंग चा अनुभव असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर लॅपटॉप देखील आवश्यक आहे. कोर्सची प्रवेश फी 24000 आहे.  अधिक माहितीसाठी संपर्क  8459775427 बँक निफ्टी चा प्रीमियम टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी   Zerodha , Angle one,  Upstox and Aliceblue  मध्ये आमच्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करणे करणे अनिवार्य आहे. अकाउंट ओपन झाल्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि त्यामध्ये फंड add करून त्याचा स्क्रीन शॉट पाठवणे. डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी पुढील लिंक चा उपयोग करा. Zerodha https://zerodha.com/open-account?c=ZMPBRZ Angle broking https://tinyurl.com/yd5t4856 Aliceblue https://alicebluepartner.com/open-myaccount/?P=SSP729 ऑप्शन ट्रेडिंग शिकण्यासाठी फ्री कोर...

शेअर मार्केट: बेसिक आणि टेक्निकल कोर्स

बेसिक आणि टेक्निकल कोर्स प्रा.डॉ.संतोष सूर्यवंशी  ८४५९७७५४२७/ ७७९८३७५३५६  Email: sant.sury@gmail.com अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम मराठी पाऊल आर्थिक सक्षमतेकडे नमस्कार, मी प्रा.डॉ. संतोष सूर्यवंशी                          २०१४ पासून मी शेअर बाजारात कार्यरत आहे. मी स्वत: एक गुंतवणूकदार आणि पूर्ण वेळ Trader आहे, तसेच मी मराठी तरुणांना अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम बनवण्यासाठी  काम करीत आहे . हे मार्गदर्शन करण्यासाठी youtube आणि ब्लॉगच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबत आहे. माहिती तंत्रज्ञान याचा उपयोग करून मराठी लोकांपर्यंत शेअर बाजारातल्या उत्पन्नाची  माहिती पोहोचवणे हे माझे उद्दीष्ट आहे. मी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असेअसा कोर्स डिझाईन केलेले आहेत. आणि तंत्रज्ञानामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या वेळेत हा कोर्स रात्री ८ ते १० या वेळेत पूर्ण करू शकता. Advanced Technical analysis online courses        " बेसिक आणि टेक्निकल कोर्सचा अभिप्राय. नमस्कार,  मी शंकर ढाकणे, सोलापूर बार्शी सर...

Digital India Initiatives by Modi Government

                                       Digital India Initiatives by Modi Government  ●        New checks on booking of e-ticket/i-ticket through IRCTC website introduced with a view to further prevent possible misuse. Under the new provisions a maximum of 6 tickets can be booked online by an individual user in a month on IRCTC website. ●         Cancellation of PRS counter tickets through IRCTC website and 139 introduced ●         Printing of Bar Code on Unreserved tickets introduced to Prevent Fraud. ●         International Debit and Credit Cards accepted for payment for e-ticketing through IRCTC website ●         India’s first High Speed Public Wi - Fi Service at Mumbai Central station inaugurated. ●   ...