स्थानिक आणि जागतिक घडामोडींमुळे भारतीय शेअरबाजार खूपच अस्थितरता अनुभवत आहे. अशा स्थितीत शेअरबाजारासाठी आगामी काही महिने परिस्थिती कशी असेल ? हा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर आहे.
सध्या जागतिक पातळीवरील वृध्दीचे संकेत आणि पीएमआय निर्देशांकातील काही अंशी स्थिरता यांची सरमिसळ झालेली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे जगातील मोठ्या केंद्रीय बँका हे त्यांच्या ताळेबंदाचा आकार वाढवत चालल्या आहेत. सध्याच्या जागतिक वातावरणात विविध वस्तूंच्या विशेषत इंधनाचे अल्प दर आणि अत्यल्प पातळीवरील व्याजदर हे दोन घटक भारतासाठी अतिशय सकारात्मक आहेत.
गेली काही वर्ष भारताचा विकास हा मंदावला असून त्याचमुळे भारतीय शेअरबाजाराने मोठ्या प्रमाणात अस्थिरता अनुभवली आहे. शेअरबाजार यातुन केव्हा उसळी घेईल, याचा अंदाज बांधणे अवघड असले तरी पुढील चार मुद्दांमुळे बाजार टप्याटप्प्यात पुढील काही तिमाहींमध्ये सावरत जाईल, असे वाटते. विविध उद्योगक्षेत्रात तयार झालेला लाभदायक पाया, क्षेत्रनिहाय उपाययोजनांच्या माध्यमातून सरकारकडून आव्हानांचा कसोशीने सामना, समाधानकारक मॉन्सुनमुळे ग्रामीण भागातून चांगल्या मागणीची वाढलेली शक्यता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अल्प व्याजदरांचा पुर्ण परिणाम हे चार घटक बाजार सावरण्यात महत्वाची भुमिका बजावतील.
अल्प व्याजदरामुळे मागणीत वाढ, नफ्याच्या शक्यतेत वाढ आणि पी-ई गुणोत्तराचे रिरेटींग यामुळे व्याजदर कपात ही शेअरबाजाराला पेलुन धरणारे अतिशय महत्वपुर्ण साधन ठरले आहे. उत्पादनवाढीत उणे वाढ आणि अल्प पातळीवर आलेला चलनवाढ दरामुळे व्याजदर अत्यल्प राहण्याची शक्यता आहे.
करोत्तर नफा-जीडीपी गुणोत्तर हे 2.7 टक्के असुन ते गत पंधरा वर्षातील निच्चांकी पातळीवर आहे. त्याचबरोबर दीर्घ मुदतीतील सरासरीशी तुलना करता बाजाराची कमाई अद्यापही अल्प असल्याने पीई गुणोत्तराच्या तुलनेत 18 पट कमाईमुळे शेअरबाजार अद्यापही योग्य किंमतमुल्याच्या परिघातच आहे. व्यापारी बँका, दूरसंचार, भांडवलआधारित उद्योग इत्यांदी तोट्यातील उद्योगक्षेत्रांचा जीडीपीतील वाटा हा सर्वाधिक असुन सध्या तो उणे 1.3 टक्के आहे. त्यामुळेच आगामी काही वर्षात या क्षेत्रांचा जीडीपीतील मध्य ( मीन) आढावा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सध्या यांची मुल्यपातळी योग्य टप्प्यावर असुन त्यात गुंतवणूक केलीच पाहिजे.
एसआयपीचा आणखी विस्तार
अॅम्फीच्या आकडेवारीनुसार, गेल्या काही महिन्यात समभाग योजनांच्या फंडातील गुंतवणूक काही अंशी घसरली आहे. परंतु गेल्या काही वर्षात एसआयपीचा ओघ हा विविध परिस्थितीतही टिकूनच होता. सध्याच्या अस्थिरतेच्या परिस्थितीत एसआयपी गुंतवणूकदारांनी काय भुमिका घेतली पाहिजे अथवा त्यांनी नवीन गुंतवणूकीसाठी थांबले पाहिजे का ? या प्रश्नावर विचार करणे उचित आहे.
गेल्या तीन वर्षात एसआयपीतील गुंतवणूक 120 टक्क्यांनी वाढून दरमहा 3600 कोटींवरुन 8100 कोटी रुपयांवर गेली आहे. या गुंतवणूकीचे वैशिष्ट म्हणजे ती दीर्घकालीन आणि टिकणारी आहे. जर प्रवाह तपासला तर 2015 पासून गेल्या पाच वर्षात स्थानिक गुंतवणूकीचा प्रवाह पुर्णपणे वेगवान झाला आहे. स्थानिक म्युच्यूअल फंडात तीन लाख 20 हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक झाली आहे. सध्याची एसआयपी गुंतवणूक टिकुन राहील, असा अंदाज असून दुहेरी आकड्यातील परताव्याचे असंख्य गुंतवणूकदारांचे उद्दीष्ट पुर्ण झाल्याने दीर्घकालीन एसआयपीचा विस्तार यापुढे आणखी होत जाईल.
मिडकॅप की लार्जकॅप :
रिटेल गुंतवणूकदार हे नेहमी मिडकॅप आणि स्मॉलकॅपकडे गुंतवणूक संधी म्हणून पाहतात. मिडकॅपमध्येच गुंतवणूक ठेवायची किंवा सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीमुळे ब्लूचिप समभागांमध्ये गुंतवणूक वळवायची का ? यासाठी सध्याची वेळ उत्तम आहे का ? याबाबतही विचार करावा लागेल.
गुंतवणूक ही नेहमी 70 : 30 या गुणोत्तरात करताना लार्ज कॅप-ब्लुचिपकडे कललेली पाहिजे. लाज कॅपमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करण्याची अनेक कारणे आहेत. भारत ही वाढती अर्थव्यवस्था असल्याने लार्ज कॅप अद्याप परिपक्व झालेले नाहीत. अनेक बड्या कंपन्यांच्या व्यवसाय चौकटी मजबूत आहेत. लार्ज कॅपमधील गुंतवणूक जोखीमीच्या तुलनेत चांगला परतावा देतातच आणि घसरणीची शक्यता कमी असते. मुल्याच्या पातळीवर मिडकॅप अधिक आकर्षक संधी देत असल्या तरी लार्ज कॅपला टाळून मि़डकॅपमागे धावू नये. सध्याच्या बाजारात मुल्यपातळी आणि भांडवल आकार यांच्यात ध्रवीकरण झालेले आहे. एकीकडे उच्च मुल्य दर्जा व हमखास परतावा देणारे उद्योग तर दुसरीकडे खोलवर मुल्यक्षमता परंतु परताव्यात अडथळे या दोन प्रकारच्या समभागांमध्ये किंमत पातळीचा शोध गुरफटताना सध्या शेअरबाजारात दिसतो. लार्ज आणि मिड कॅप समभागांमध्ये झालेल्या या ध्रुवीकरणामुळे शेअरबाजारात सध्या अमाप संधी आहे आणि त्याचा फायदा उठवाच.
-निलेश सुराणा, सीआयओ, मिराई ग्लोबल इन्व्हेस्टमेंट (भारत) इक्विटी विभाग
Please call me sir 9665686518
ReplyDeleteBHARAT Salunke