चला आज यावर बोलुया. किती जणांना वाटतं की शेअर मार्केट हा जुगार आहे? मला पण सुरुवातीला वाटायचं की शेअर मार्केट हा जुगार आहे. मी ग्रामीण भागातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून अर्थशास्त्र हा विषय शिकवतो. अलीकडील काळात यूजीसीने धोरणात्मक बदल केले आहेत त्यामुळे त्यांनी सांगितले आहे की विद्यार्थ्यांना कौशल्यभिमुख शिक्षण देण्यात यावे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही महाविद्यालय मध्ये स्टॉक मार्केट अँड इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट हा कोर्स सुरू केला. या कोर्सला विद्यार्थ्यांचा खूप प्रतिसाद मिळाला. मात्र जास्त तर विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना हे सांगितले नाही की आम्ही स्टॉक मार्केट कोर्सला ऍडमिशन घेतले आहे. त्यांना भीती वाटते पालक रागावतील म्हणून . म्हणजे आज अशी परिस्थिती झाली आहे की ज्या शिक्षणातून म्हणजेच पारंपारिक शिक्षणातून मला आयुष्यात कोणतेही कौशल्य मिळणार नाही ते शिक्षण देण्यास आमचे पालक तयार आहेत मात्र एखादं नवीन कौशल्य आत्मसात करायचे असते तेव्हा स्वतःच्या पाल्यांना परावृत्त करत आहेत हे खूप मोठे दुर्दैव आहे मराठी माणसाचे. आपण बऱ्याच वेळा वर्तमानपत्रांमध्ये आणि दूरदर्शन वर ऐकतो की आज गुंतवणूकदारांचे 1 लाख कोटी रुपये बुडाले. मग गुंतवणूकदारांचे 1 दिवसात 1 लाख कोटी बुडत असतील तर शेअर मार्केट आज का सुरू आहे. हा प्रश्न स्वतःला विचारून बघा. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भारताच्या वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी कार्पोरेट टॅक्स मध्ये 5 % नी कमी केले. त्यानंतर दोनच दिवसात शेअर बाजारातून गुंतवणूकदारांना 11 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला होता. ही बातमी कोणत्याही वर्तमानपत्रात आली नाही हे विशेष आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसाला फक्त तोट्याची माहिती सांगायची फायद्याची माहिती सांगितली जात नाही.
आज आपण बँकेमध्ये FD मध्ये 1 वर्षासाठी रक्कम ठेवली तर व्याज किती मिळते? वार्षिक 6 ते 7.50 टक्के.म्हणजे तुम्ही आज 10000 रुपये बँकेत ठेवले तर 365 दिवसांनी तुम्हाला मिळणारी आगाऊ रक्कम 600 रुपये. म्हणजे दिवसाला 1.64 रुपये.आजच्या महागाईचा विचार करता हे व्याज किती कामाला येउ शकत ते मला सांगा. आणि गम्मत अशी आहे की जी बऱ्याच लोकांना माहीत नाही.तुम्ही कोणत्याही बँकेत पैसे ठेवा ते शेअर मार्केट साठीच वापरले जातात.जसे की बँका त्यांच्याकडे आलेले ठेवीतील काही रक्कम ही mutual फंड किंवा fund manager कडून शेअर मार्केट मध्ये गुंतवून भरपूर नफा कमावतात. आणि आलेल्या नफ्यातूनच तुम्हाला तुमच्या ठेवींवरील व्याज अदा करतात.
पाठी मागील 5 वर्षांमध्ये भारतात म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या प्रत्येक महिन्याला 70 ते 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक की फक्त मीच फंडांमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन च्या माध्यमातून केली जाते. 30 नोव्हेंबर 2019 अखेरीस म्युच्युअल फंडात झालेली एकूण गुंतवणूक ही 27 लाख कोटी पेक्षा जास्त आहे. ज्या गुंतवणूकीवर गुंतवणूकदाराला 8% ते 15 टक्के रिटन मिळतात. भारतात 43 म्युच्युअल फंड कंपन्या आहेत. त्यांचे एकूण जे फंड आहेत त्यापैकी 70 टक्के फंडांचे रिटर्न्स हे 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. परंतु म्युच्युअल फंड कंपन्या जे करतात ते आपण स्वतः केले तर आपणास किती टक्के रिटन मिळू शकतात हे कधी कॅल्क्युलेट करून बघितले आहे का. मी स्टेट बँक ऑफ इंडियाचा लार्ज किंवा ब्ल्यू चिप म्युच्युअल फंड चे रिटर्न्स कॅल्क्युलेट करून बघितले आहेत. पाच वर्षात 225 % इतके आहेत. म्हणजेच म्युच्युअल फंड कंपन्या देखील ग्राहकांना चुना लावण्याचे काम करीत आहेत.
मी वित्त सल्लागार म्हणून काम करत असताना अनेक सुशिक्षित लोकांना भेटण्याचा योग आला. आजही असंख्य लोकांना एलआयसी मध्ये पॉलिसी घेतली म्हणजे आपण गुंतवणूक केली आहे असे ते समजतात. एकतर मुख्याध्यापक असे भेटले की ज्यांनी 101 एलआयसी पॉलिसी खरेदी केल्या आहेत. त्या सर्व पॉलिसींचा एकत्रित sumassured हा तीस लाखापेक्षा कमी आहे हे विशेष. हे चित्र कुठेतरी बदलणे आवश्यक आहे. इन्शुरन्स कंपनीचा कोणताही प्लॅन खरेदी करताना खरेतर एक सुज्ञ नागरिक या नात्याने आपण टर्म इन्शुरन्स खरेदी करणे आवश्यक आहे. परंतु आमच्या दृष्टीने टर्म इन्शुरन्स म्हणजे बिनकामाचा विमा आहे असे असंख्य लोक मानतात आजही. आपण LIC मध्ये पैसे गुंतवतो ते पैसे कुठे जातात? शेअर मार्केट मधेच. एलआयसी(LIC) फक्त गुंतवणूकदारांना 6 टक्के व्याजदर देते. विशेष म्हणजे 30 नोव्हेंबर 2019 रोजी फायनान्शिअल एक्सप्रेस या भारतातील आघाडीच्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती की एलआयसीने 14000 कोटी रुपयांचा नफा फक्त शेअर मार्केट मधून कमवला आहे (नोव्हेंबर 2019). जे लोक शेअर मार्केटला विरोध करतात त्यांनी ही बातमी एक वेळ आवश्यक गुगल वर जाऊन वाचायला पाहिजे. शेअर मार्केटचे काय खरं म्हणणाऱ्यांची सर्व गुंतवणूक तर शेअर मार्केटमध्ये आहे. (एलआयसीचे गुंतवणुकदार)
अलीकडे म्हणजेच 2005 नंतर सरकारी नोकरीच लागलेल्या सर्व लोकांना सरकारने नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये टाकले आहे. नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये असणारी रक्कम देखील शेअर मार्केट आणि स्टेट गव्हर्नमेंट च्या कर्जरोखे मध्ये जाते हे जवळपास कोणालाही माहीत नाही. एलआयसी पेन्शन फंड, यूटीआय पेन्शन फंड आणि एसबीआय पेन्शन फंड यांच्यामार्फत नॅशनल पेन्शन स्कीम चे फंड ऑपरेट केले. नॅशनल पेन्शन स्कीम मधून मिळणारी रिटन्स देखील दहा टक्के आहेत. म्हणजेच आपण कुठेतरी गुंतवणूक केले त्याचा संबंध प्रत्यक्ष प्रत्यक्ष हा शेअर बाजाराशी येतच असतो. त्यामुळे आता मराठी माणसाने साक्षर होऊन शेअर बाजाराशी मैत्री करणे आवश्यक आहे.
हेच जर intraday trading skill तुम्ही शिकला तर दिवसाला तुमच्या कॅपिटलच्या 1 टक्के कमीत कमी आरामात कमावू शकतात. Intraday ट्रेडिंग करून दिवसाला 1 ते 2 लाख कमावणारे पण आहेत. शेअर मार्केट मध्ये व्यवहार केल्यावर सरकारला वेगवेगळे टॅक्सेस जातात जसे की stamp duty, secutiry transaction टॅक्स,Gst,State Tax, Sebi Charges etc. आणि यामुळे आपली अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होते.
शेअर मार्केटमधील लॉस का होतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कोणताही अभ्यास नसणे दुसऱ्याच्या सांगण्यानुसार ट्रेडिंग करणे व गुंतवणूक करणे आणि स्वतः शिकण्याची तयारी नसणे या कारणांमुळे असंख्य गुंतवणूकदारांनी आणि ट्रेडर्सने नुकसान करून घेतले आहे. याकडेही आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. शेअर मार्केट मध्ये यशस्वी व्हायचे असेल तर रिस्क मॅनेजमेंट खूप महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्तीला रिस्क मॅनेजमेंट करता येते तो माणूस शेअर मार्केटमध्ये खूप पैसा कमवू शकतो. तुमच्याकडे चे भांडवल असेल त्या भांडवलावर ती दररोज फक्त 0.25 % रिटन मिळवा. तरीसुद्धा मोठा फंड शेअर मार्केट मधून तयार करता येतो परंतु लोक याकडे दुर्लक्ष करतात.
*प्रा. डॉ. संतोष सूर्यवंशी*
*वित्त सल्लागार*
8459775427
*शेअर मार्केट गुंतवणूक आणि मार्गदर्शनासाठी व डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी लिंक*
©️Dr. Santosh Suryawanshi
खूप छान माहिती.. असंख्य पालक आजही त्यांच्या मुलांना शेअर मार्केट पासून दूर ठेवतात हे बदलायला हवे.. 👍👍
ReplyDeleteVery nice sir
ReplyDeleteहो
ReplyDelete