कुटुंबाचे आर्थिक नियोजन करताना आपत्कालीन निधीचाही विचार करावा लागतो.
शिवाय, अनावश्यक खर्च टाळणे व बचतीची सवय लागणे हेदेखील याचे फायदे आहेत. l हा निधी किती असावा? आपत्कालीन निधीचे प्रमाण हे तुमच्या जीवनशैलीवर अवलंबून असते. मासिक प्राप्ति व खर्चाच्या प्रमाणात हा निधी ठरतो. तुमच्या सरासरी मासिक खर्चाच्या तीन ते सहापट म्हणजे तीन ते सहा महिन्यांचा खर्च आपत्कालीन निधी म्हणून राखीव ठेवणे योग्य ठरते. हा निधी उभारण्यासाठी डेट म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय आहे. सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अथवा फंडात एकरकमी गुंतवणूक (लिक्विड फंड किंवा अल्पमुदतीचा फंड) करून हा निधी उभारता येतो. या फंडमध्ये तरलता अधिक असल्याने आणीबाणीच्या प्रसंगी यातून निधी उभारता येतो.
कामकाजाच्या एक ते दोन दिवसांत हे पैसे मिळू शकतात. l या निधीतून किती परतावा मिळू शकतो? बँकेच्या बचत खात्यात पैसे पडून राहिल्यास केवळ साडेतीन टक्के व्याजाचा परतावा मिळतो. मात्र आपत्कालीन निधी ज्या माध्यमातून उभारला जातो त्या लिक्विड किंवा अल्पमुदतीच्या फंडांतून निश्चितच अधिक म्हणजे पाच ते सात टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो. या फंडांची गेल्या वर्षातील कामगिरी पाहिल्यास लिक्विड फंडांनी ६.६१ तर, अल्पमुदतीच्या फंडांनी ६.८९ टक्के परतावा दिल्याचे दिसेल.
सौजन्य महाराष्ट्र टाइम्स
Comments
Post a Comment