2016 मध्ये झालेल्या नोटबंदी नंतर देशभरामध्ये डिजिटल व्यवहारांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. आज आपण दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने फोन पे, गुगल पे, भीम व अन्य मोबाइल वॉलेटचा वापर दररोज करत असतो. त्याचबरोबर इंटरनेट बँकिंग चा विस्तार देखील वेगाने होत आहे. डिजिटल किंवा रोकड रहित व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी. हे आपणास माहित असणे आवश्यक आहे. अलीकडील काळामध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर सध्या व्हाट्सअप वर एक मॅसेज फिरत आहे. तुमच्या खात्यामध्ये 86xxxx इतकी रक्कम जमा झाली आहे. या पार्श्वभूमीवर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे.
मोबाईल ॲप
पाठी मागील पाच वर्षात जगामध्ये चटके काय सायबर गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बनावट मोबाईल ॲप्लिकेशन चा वापर झाला आहे. या पार्श्वभूमीवर आपण कोणतेही मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करताना त्या ॲप्लिकेशनची सत्यता पडताळणे आवश्यक आहे. मोबाईल मध्ये आवश्यक नसलेले मोबाईल ॲप्लिकेशन डिलीट करणेदेखील फायद्याचे आहे.
विमा पॉलिसी
आजकाल अनेकांना भारतीय विमा नियामक प्राधिकरणाकडून ईमेल प्राप्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र हे ई-मेल विमा प्राधिकरणाकडून येत नसल्याचे प्राधिकरणाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहेत. या सायबर गुन्हेगारांकडून अधिकृत ई-मेलच्या पत्त्यामध्ये किरकोळ बदल केला जातो. आयुर्विमा आणि आरोग्य विम्याच्या काही पॉलिसीची स्वतः विमा प्राधिकरण शिफारस करत आहे असे भासवले जाते. या माध्यमातून नागरिकांकडून त्यांच्या बँक खाते तपशील, डेबिट क्रेडिट कार्डाचा तपशील मागितला जातो. मात्र त्याचा वापर बँक खाते साफ करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे आयुर्विमा किंवा आरोग्य विमा पॉलिसी विकत घ्यायचे असल्यास ओळखीच्या एजंटमार्फत अथवा संबंधित कंपनीच्या अधिकृत पोर्टलवरून व्यवहार करावा.
परताव्याचे प्रलोभन
प्राप्तिकर भरण्याची प्रक्रिया आता ऑनलाईन झाल्यामुळे कर परतावाही करदात्यांच्या खात्यामध्ये जमा होतो. याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. तुम्हाला मोठ्या प्रमाणात कर परतावा मिळणार आहे, अशा प्रकारचे इमेल्स खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे आपण अशा कोणत्याही परताव्याच्या प्रलोभनाला बळी पडू नये.
केवायसी तपशील
केवायसी साठी प्रत्येक बँकेची ठराविक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत व्यतिरिक्त कोणालाही आधार, त्यांनी इत्यादी तपशील देऊ नये. अशी बँकांना. मात्र अनेक ग्राहक बनावट केवायसी ला बळी पडतात. केवायसी अद्ययावत करण्याची ई-मेल द्वारे एक लिंक पाठवली जाते. त्यावरून ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले जाते. या पद्धतीने कुणीही केवायसी करू नये. केवायसी प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन करावी. केवायसी करायचे असेल तर स्वतःच्या इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून करणे कधीही फायदेशीर आहे. किंवा प्रत्यक्ष भेट देऊन केवायसी करावी.
पासवर्ड
सायबर गुन्ह्यांमध्ये पासवर्ड डिकोड करून आर्थिक घोटाळा करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. अतिशय सोपे व कोणीही अंदाज करू शकेल असे पासवर्ड ठेवणे घातक ठरते. ब्रिटनच्या नॅशनल सायबर्सेक्युरिटी सेंटरने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगभरातील अडीच कोटी बँक ग्राहकांचे पासवर्ड अतिशय सोपे व सुरक्षित असल्याचे उघड केले आहे. त्यामुळे आपला पासवर्ड नेहमी स्ट्राँग असावा.
यू.पी.आय.पेमेंट
युनिफाईड पेमेंट इंटरफेस च्या माध्यमातून पैशाचे देवाण-घेवाण करणे अतिशय सोपे झाले आहे. मात्र आपण योग्य व्यक्तीला अथवा योग्य ठिकाणी पैसे ट्रान्सफर करत आहोत ना याची काळजी घेणे आवश्यक आहे.
डिमॅट खाते उघडा आणि 10,000 रुपयांचे फायदे मिळवा. आता इंदिरा सिक्युरिटीजमध्ये सामील व्हा! सर्वोत्तम स्टॉक ब्रोकर
ReplyDeleteOpen Demat account