घरी कोंबडी पाळली तर सहसा ४/५ पर्याय असतात, पहिला रविवार आला की कापून खायची,मस्त पार्टी करायची! दुसरा पर्याय,तिला जपायचे,ती रोज अंडे देईल ते सुखसमाधानाने आपण आपल्या कुटुंबासह खायचे. तिसरा-तिच्याकडे लक्ष नसल्याने वा शेजारचे/ वांड पोरं आपला घात करून गुपचूप ती कोंबडी एखाद दिवशी फस्त करून टाकतात. मग बसा “आम्हाला फसवले” म्हणून बोंबलत. चौथा- कोंबडी मारून गाडीखाली टाकायची मग गाडीवाल्याला ब्लॅकमेल करून चार कोंबड्याचे पैसे आणि आपणच
मारलेली पण कोंबडी लुटायची (पण हा काही सज्जनांचा पर्याय नाही.) आता अजून एक पाचवा पर्याय असतो, कोंबडी,ती अंडीही खायची नाही, कितीही इच्छा झाली, तरी खायची नाहीत. त्या कोंबडीची सर्व १५/२० अंडी जमा करायची. पुढे कोंबडी खुराड्यात बसवायची, तीची पुर्ण काळजी घ्यायची, कोंबडी २१ दिवस ती अंडी उबवत बसणार. तोपर्यंत आपण, संपुर्ण कुटूंब वाट पहात बसणार. पुढे एक दिवस अंड्यातून लहान लहान पिल्लांचा आवाज, चिवचिवाटाने घर भरणार. पुढे त्या पिल्लांना, कोंबडीला मांजर, कुत्री, इतर पक्षी/ जनावरे (खवीस शेजारी) यांच्यापासून रक्षण करायचे. पुढे तीन-चार महिन्यांत आपल्याकडे १५-२० कोंबड्या. त्यांची अंडीच अंडी. दोन-तीन वर्ष हेच रिपीट. आता पुढे ही सायकल किती, कशी वाढू द्यायची याचा सर्वस्वी निर्णयही आपलाच. मग कितीही अंडी घरी खा किंवा विका. पैसे हे हमखास मिळणारच. बरं आपली शेती, नोकरीधंदा बाजूला सुरूच असतो त्यामुळे हे उत्पन्न तसे अतिरिक्तच. आता हे जे कोंबडी कापून न खाण्याचे मन मारणे, सुरूवातीला अंडीही न खाणे, ते २१ दिवस वाट पाहणे, (थोडक्यात या सर्व प्रोसेसचा अभ्यास आणि कष्टही) पुढे या कोंबडीच्या पिल्लांचे रक्षण करून मोठे करणे याला जो संयम लागतो, धीर आणि एकाग्रता लागते तशीच पैशांची गुंतवणूक करताना लागते. गुंतवणूक करताना बचत, मनावर ताबा, दूरगामी विचार करून वाट पाहण्याची तयारी आणि दूरदृष्टीने कष्ट घेतले तरच यश मिळते. यात स्वत:ला ज्ञान असणे गरजेचे आहे नाहीतर आजूबाजूलाच तुमच्याच कोंबड्या चोरून/फसवून/आमिष देऊन/पोपटपंछी फंडे देऊन स्वत:च गटकवतील असे लोक आहेतच. (अशा भामट्या/ फसवणाऱ्या सुशिक्षित टोळभैरवांपासून तुम्हाला वाचायचेय, स्वसंरक्षण करायचेय) यासाठी वॅारन बफेट यांनी फार सुंदर वाक्य सांगितलेय. “Never ask the barber whether you need a haircut.” त्यामुळे इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून न राहता,ज्या क्षेत्रात आपल्याला गुंतवणुक करायची आहे त्याचा अभ्यास करा आणि योग्य व्यक्तीचाच सल्ला घ्या. मार्गदर्शक चांगला असणे महत्वाचेच “Never ask the barber whether you need a haircut.” त्यामुळे इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून न राहता,ज्या क्षेत्रात आपल्याला गुंतवणुक करायची आहे त्याचा अभ्यास करा आणि योग्य व्यक्तीचाच सल्ला घ्या. मार्गदर्शक चांगला असणे महत्वाचेच तुमच्याकडे हा संयम, ताबा, शिकण्याची, कष्टाची आणि वाट पाहण्याची तयारी, यापैकी काहीच नसेल तर- सरळ पर्याय नंबर एक,अगदी रविवारचीही वाट न पाहता कोंबडी खसकावून मोकळे व्हा. उगीच नको तो गुंतवणुकीचा अन आर्थिकसाक्षरतेचा त्रास! सरळ पर्याय नंबर एक,अगदी रविवारचीही वाट न पाहता कोंबडी खसकावून मोकळे व्हा. उगीच नको तो गुंतवणुकीचा अन आर्थिकसाक्षरतेचा त्रास! धन्यवाद
Comments
Post a Comment