गुंतवणूक गुरु वॉरन बफे हे ज्याप्रमाणे जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार म्हणून ओळखले जातात तसेच ते यशस्वी बिझनेसमन म्हणून पण ओळखले जातात. बिझनेस विकत घेण्याच्या क्षेत्रात पण त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. बर्कशायर हॅथवे ही त्यांची कंपनी असून गेली 54 वर्षे ते या कंपनीचे सी.ई.ओ आहेत. आज त्यांची कंपनी अमेरिकेतील ऍपल, गुगल व एक्झीम मोबाइलनंतरची चौथ्या क्रमांकाची सर्वात श्रिमंत कंपनी म्हणून ओळखली जाते. आज त्यांच्या 97 उपकंपन्या असून त्यांच्या एका शेअरची किंमत 2 लाख डॉलर्सच्या वर आहे. त्यांची ‘बिझनेस प्रिन्सिपल्स’ अगदी आगळी वेगळी, कोणत्याही मॅनेजमेन्टच्या पुस्तकात न लिहिलेली व वैशीष्ट्यपूर्ण अशी आहेत. याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ या.
1) एखादी ‘फेअर’ कंपनी ‘वंडफूल प्राइस’ ला विकत घेण्याऐवजी एखाधी ‘वंडरफूल’ कंपनी ‘फेअर प्राइसला’ विकत घेणे जास्त श्रेयस्कर ठरते.
2) जेव्हा एखादी कंपनी ‘ऑपरेशन टेबल’ वर असते (म्हणजे आर्थिक संकटात सापडलेली असते) त्याच वेळी ती कंपनी विकत घेणे किंवा त्या कंपनीत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.
3) कंपनीचे व्हॅल्युएशन करणे हे जसे एक शास्त्र आहे तशीच एक कला पण आहे.
4) मी चांगला गुंतवणूकदार आहे कारण मी चांगला बिझनेसमन आहे. मी चांगला बिझनेसमन आहे कारण मी चांगला गुंतवणूकदार आहे.
5) बिझनेसच्या गाडीमधे ‘रेअर व्ह्यु मिरर’ हा पुढच्या विंडशिल्ड जास्त क्लिअर असतो. याचा अर्थ आपण आत्तापर्यंत काय केले हे स्पष्ट दिसत असते पण पुढे काय घडणार आहे हे धुसर दिसत असते.
6) एका बिझनेसमधून 100 डॉलर्स मिळवण्याऐवजी 100 बिझनेसमधून प्रत्येकी 1 डॉलर मिळवणे केव्हाही फायद्याचे असते.
7) आम्ही फक्त बिझनेस विकत घेतो, विकत नाही.
8) कुठलाही नवीन बिझनेस सुरु करण्यापेक्षा एखादा जुना पण डबघाइला आलेला बिझनेस विकत घेणे फायदेशीर ठरते.
9) जेव्हा एखादा माणूस माझ्याकडे बिझनेस विकायला येतो तेव्हा मी त्याचे बॅलन्स शिट, प्रॉफिट ऍन्ड लॉस अकाऊंट, गंगाजळी या गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही. मला त्याच्या डोळ्यात पॅशन व भूक दिसते का एवढेच मी पहातो. कारण ज्याच्याकडे पॅशन असते तोच माणूस त्याचा बिझनेस पोटतीडकीने करू शकतो. तसेच ज्याच्या पोटात भूक असते त्याला रोज सकाळी कामावर जाण्यासाठी अंथरुणातून खोचून बाहेर काढावे लागत नाही.
10) मी ज्यांच्याकडून बिझनेस विकत घेतो त्यांनाच तो चालवायला देतो. कारण तेच लोक त्यांचा बिझनेस उत्तम चालवू शकतात.
11) योग्य कामासाठी योग्य माणसाची निवड करा व त्यांना त्यांचे काम त्यांच्या पद्धतीने करु द्या. तुम्ही शांतपणे खिडकीबाहेर बघत बसा. रिझल्ट आपोआप येतील.
12) मी माझ्या कंपन्यांच्या सी.ई.ओ. ज ना वर्षातून फक्त एक पत्र पाठवतो व त्यांना त्यांची टार्गेट्स देतो. त्यानंतर मी त्यांना वर्षभर भेटत पण नाही किंवा फोनपण करत नाही. तुम्ही फक्त तुमच्या लोकांना टार्गेट्स द्या व त्या प्रमाणे ते लोक काम करत आहेत की नाही यावर फक्त नजर ठेवा. बाकी काही करू नका.
13) भरपूर वाचन करा.
14) तुम्ही पाण्यात पोहणार्या. माशाला जमिनीवर चालण्याचा काय आनंद असतो ते सांगु शकाल का? एक दिवस जमिनीवर घालवण्याचा जो अनुभव असतो तो तुम्ही हजारो शब्दांमध्ये सुद्धा व्यक्त करू शकत नाही. एक दिवस बिझनेस करण्याचा अनुभवही काहीसा असाच असतो.
15) मी जेव्हा एखादा बिझनेस विकत घेतो तेव्हा एखाद्या गुंतवणूकदारासरखा विचार करतो. माझ्याकडे अमेरिकन एक्सप्रेसचे सर्वात जास्त शेअर आहेत. पण मला क्रेडिट कार्डस कशी छापतात व वितरीत होता याची अजिबात कल्पना नाही. बिझनेस विकत घेतल्यावर बिझनेसच्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला कळल्याच पाहीजेत असा अट्टाहास धरू नका.
16) तुम्ही तुमच्या कंपनीत नेहमी तुमच्यापेक्षा जास्त चांगली व हुषार माणसे नेमा. तरच तुमची कंपनी प्रगती करत राहील. जर तुम्ही तुमच्या कंपनीत ‘होयबांची’ फौज निर्माण केलीत तर तुमची कंपनी कधीच प्रगती करणार नाही.
17) बिझनेस स्कुलमधे साध्या साध्या गोष्टी अवघड कशा करायच्या हे शिकवतात. पण प्रत्यक्षात साध्या साध्या गोष्टीच जास्त उपयोगी पडतात.
📊📉📈
उल्हास हरी जोशी.
Comments
Post a Comment