आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल असून दोन दिवसाच्या विक्रीनंतर अमेरिकन बाजारांमध्ये तेजी आली आहे. एशियाई बाजारात देखील फ्लॅट सुरुवात होत आहे. काल SGX निफ्टी मध्ये 200 अंकांची घसरण झाली होती. मात्र आज परत SGX निफ्टी 150 पॉईंट वरती आहे. यानुसार भारतीय बाजार आज gap down open होणे अपेक्षित आहे. भारतीय मार्केट साठी भारतामध्ये सातत्याने वाढणाऱ्या covid-19 च्या केसेस चिंता करण्याचे कारण आहे. मागील 24 तासात 3 लाख 15 हजारांहून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे. चीनने देशातील 14 टक्के लोकांना लसीकरण पूर्ण केल्याचे जाहीर केले आहे.
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1082 कोटी cash मार्केटमध्ये विक्री केले आहेत. त्याच वेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1323 कोटी रुपयांचे कॅश मार्केटमध्ये खरेदी केले आहेत.
Comments
Post a Comment