आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल असून शुक्रवारी अमेरिकन बाजारामध्ये तेजी आली होती. या पार्श्वभूमीवर एशियाई बाजाराची सुरुवात देखील पॉझिटिव्ह मूडवर होत आहे. अमेरिकेमध्ये अलीकडे प्रसिद्ध झालेला डेटा आर्थिक क्षेत्रावर रिकव्हरी दर्शवित आहे. त्याचबरोबर डॉलर इंडेक्स 2 महिन्याच्या खालच्या पातळीवर पोहोचला आहे. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये नवीन घरांच्या विक्रीमध्ये 2006 नंतर सर्वात मोठी तेजी आली आहे.
भारतात सातत्याने covid-19 ची वाढणारी संख्या मार्केट साठी चिंता करण्याचे कारण आहे. काल दिवसभरामध्ये 3 लाख 55 हजार नवीन केसेस आढळले आहेत. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कॅश मार्केटमध्ये 1361 कोटी रुपयांची विक्री केली आहे. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1692 कोटी रुपयांची खरेदी केली आहे.
BANKNIFTY Resistance
3190-32081
32401-32491
Support
31502-31369
31145-31040
Comments
Post a Comment