Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

आजचे मार्केट ३० एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. काल अमेरिकन बाजार जोरदार तेजी सहबंद झाला आहे. एशियाई बाजाराची सुरुवात घसरणीसह होताना दिसत आहे. SGX NIFTY 70 अंकांनी दबाव मध्ये काम करत आहे.  रिलायन्स कंपनीचे आज चौथ्या तिमाहीत रिझल्ट आहेत. देशात कोरोना थांबण्याचे नाव घेत नाही काल दिवसभर मध्ये 3 लाख 86 हजार नवीन केसेस आढळले आहेत. त्याचबरोबर दोन लाख 91 हजार लोक रिकवर देखील झाले आहेत. महामारी वर चर्चा करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी आज सकाळी 11 वाजता पंतप्रधानांनी बैठक बोलावली आहे. NIFTY Resistance  14975-15030 15072-15113 Nifty support  14823-14781 14644-14600 BANKNIFTY Resistance  34040-34188 34280-34640 BANKNIFTY support  33550-33520 33200-33100

आजचे मार्केट २९ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे असून एशियाई बाजार देखील फ्लाईट मोडवर ओपन होण्याचे इंडिकेशन दाखवत आहे. SGX Nifty ९० अंकांनी वर आहे. काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कॅश मार्केटमध्ये 766 कोटी रुपयांचे खरेदी केली आहे. त्याचबरोबर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 436 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. banknifty resistance  33980-34020 34200-34280 support 33466-33390 33220-33150 ******************** DOW FUTURES और SGX NIFTY तेज निफ्टी की तीन कंपनियों के नतीजे आज नए केस 3.79 लाख, रिकवर 2.70 लाख सीरम इंस्टीट्यूट ने घटाए कोविशील्ड के दाम, राज्यों को 400 की जगह अब 300 रुपए में मिलेगी वैक्सीन। 100 दिन पूरे होने के उपलक्ष्य में #JoeBiden का संबोधन, $1.8 Trillion का शिक्षा और Child Care प्लान संभव।

वॉरन बफे यांची ‘बिझनेस प्रिन्सिपल्स’

गुंतवणूक गुरु वॉरन बफे हे ज्याप्रमाणे जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार म्हणून ओळखले जातात तसेच ते यशस्वी बिझनेसमन म्हणून पण ओळखले जातात. बिझनेस विकत घेण्याच्या क्षेत्रात पण त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. बर्कशायर हॅथवे ही त्यांची कंपनी असून गेली 54 वर्षे ते या कंपनीचे सी.ई.ओ आहेत. आज त्यांची कंपनी अमेरिकेतील ऍपल, गुगल व एक्झीम मोबाइलनंतरची चौथ्या क्रमांकाची सर्वात श्रिमंत कंपनी म्हणून ओळखली जाते. आज त्यांच्या 97 उपकंपन्या असून त्यांच्या एका शेअरची किंमत 2 लाख डॉलर्सच्या वर आहे. त्यांची ‘बिझनेस प्रिन्सिपल्स’ अगदी आगळी वेगळी, कोणत्याही मॅनेजमेन्टच्या पुस्तकात न लिहिलेली व वैशीष्ट्यपूर्ण अशी आहेत. याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ या. 1) एखादी ‘फेअर’ कंपनी ‘वंडफूल प्राइस’ ला विकत घेण्याऐवजी एखाधी ‘वंडरफूल’ कंपनी ‘फेअर प्राइसला’ विकत घेणे जास्त श्रेयस्कर ठरते.  2) जेव्हा एखादी कंपनी ‘ऑपरेशन टेबल’ वर असते (म्हणजे आर्थिक संकटात सापडलेली असते) त्याच वेळी ती कंपनी विकत घेणे किंवा त्या कंपनीत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.  3) कंपनीचे व्हॅल्युएशन करणे हे जसे एक शास्त्र आहे तशीच एक कला पण आह...

आजचे मार्केट २६ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल असून शुक्रवारी अमेरिकन बाजारामध्ये  तेजी आली होती. या पार्श्वभूमीवर  एशियाई बाजाराची सुरुवात देखील पॉझिटिव्ह मूडवर होत आहे. अमेरिकेमध्ये अलीकडे प्रसिद्ध झालेला डेटा आर्थिक क्षेत्रावर रिकव्हरी दर्शवित आहे. त्याचबरोबर डॉलर इंडेक्स 2 महिन्याच्या खालच्या पातळीवर पोहोचला आहे. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये नवीन घरांच्या विक्रीमध्ये 2006 नंतर सर्वात मोठी तेजी आली आहे. भारतात सातत्याने covid-19 ची वाढणारी संख्या मार्केट साठी चिंता करण्याचे कारण आहे.  काल दिवसभरामध्ये 3 लाख 55 हजार नवीन केसेस आढळले आहेत. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कॅश मार्केटमध्ये 1361 कोटी रुपयांची विक्री केली आहे. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1692 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. BANKNIFTY   Resistance 3190-32081 32401-32491 Support 31502-31369 31145-31040

Prafulla Wankhede: कोंबडी: आर्थिक साक्षरता

घरी कोंबडी पाळली तर सहसा ४/५ पर्याय असतात, पहिला रविवार आला की कापून खायची,मस्त पार्टी करायची! दुसरा पर्याय,तिला जपायचे,ती रोज अंडे देईल ते सुखसमाधानाने आपण आपल्या कुटुंबासह खायचे. तिसरा-तिच्याकडे लक्ष नसल्याने वा शेजारचे/ वांड पोरं आपला घात करून गुपचूप ती कोंबडी एखाद दिवशी फस्त करून टाकतात. मग बसा “आम्हाला फसवले” म्हणून बोंबलत. चौथा- कोंबडी मारून गाडीखाली टाकायची मग गाडीवाल्याला ब्लॅकमेल करून चार कोंबड्याचे पैसे आणि आपणच  मारलेली पण कोंबडी लुटायची (पण हा काही सज्जनांचा पर्याय नाही.) आता अजून एक पाचवा पर्याय असतो, कोंबडी,ती अंडीही खायची नाही, कितीही इच्छा झाली, तरी खायची नाहीत. त्या कोंबडीची सर्व १५/२० अंडी जमा करायची. पुढे कोंबडी खुराड्यात बसवायची, तीची पुर्ण काळजी घ्यायची, कोंबडी २१ दिवस ती अंडी उबवत बसणार. तोपर्यंत आपण, संपुर्ण कुटूंब वाट पहात बसणार. पुढे एक दिवस अंड्यातून लहान लहान पिल्लांचा आवाज, चिवचिवाटाने घर भरणार. पुढे त्या पिल्लांना, कोंबडीला मांजर, कुत्री, इतर पक्षी/ जनावरे (खवीस शेजारी) यांच्यापासून रक्षण करायचे. पुढे तीन-चार महिन्यांत आपल्याकडे १५-२० कोंबड्या. त्यांची ...

आजचे मार्केट २३ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल स्वरूपाचे आहेत. अमेरिकन मार्केटमध्ये 300 अनेकांचा दबाव आहे. कारण तेथे कॅपिटल गेन टॅक्स वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत. आशियाई बाजाराची देखील सुरुवात दबावा सहित होत आहेत. SGX NIFTY 80 अंकांचा दबाव दाखवत आहे. देशातील तरुणांची संख्या थांबण्याचे नाव घेत नाही काल दिवसभर मध्ये 2 लाख 32 हजार रुग्णांची वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आज पंतप्रधानांनी सर्वाधिक प्रभावित राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत मॅराथॉन बैठकीचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसोबत देखील बैठक होणार आहे. काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कॅश मार्केटमध्ये 909 कोटीची विक्री केली आहे. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 850 कोटी ची खरेदी केली आहे. BANKNIFTY RESISTANCE  31930-32070 32290-32410 BANKNIFTY SUPPORT  31450-31390 31000-30854

आजचे मार्केट २२ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल असून दोन दिवसाच्या विक्रीनंतर अमेरिकन बाजारांमध्ये तेजी आली आहे. एशियाई बाजारात देखील फ्लॅट सुरुवात होत आहे. काल SGX निफ्टी मध्ये 200 अंकांची घसरण झाली होती. मात्र आज परत SGX निफ्टी 150 पॉईंट वरती आहे. यानुसार भारतीय बाजार आज gap down open होणे  अपेक्षित आहे. भारतीय मार्केट साठी भारतामध्ये सातत्याने वाढणाऱ्या covid-19 च्या केसेस चिंता करण्याचे कारण आहे. मागील 24 तासात 3 लाख  15 हजारांहून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे. चीनने देशातील 14 टक्के लोकांना लसीकरण पूर्ण केल्याचे जाहीर केले आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1082 कोटी cash मार्केटमध्ये विक्री केले आहेत. त्याच वेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1323 कोटी रुपयांचे कॅश मार्केटमध्ये खरेदी केले आहेत.

डरना जरुरी है------

अगदी बरोबर वाचलत शेअर बाजाराची भीती असणे आवश्यकच आहे.कित्येक लोक आपण बघतो की आपल्या अनलिसिस वरती किंवा आपल्या स्ट्रॅटेजी वरती गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवतात एखादी स्ट्रॅटेजी समजा दोन चार महिने काय जरा व्यवस्थित चालली की लेगच ते स्वतःला देवच समजू लागतात आणि वाट्टेल ती आवश्वसने देऊ लागतात काही लोक कोर्सेस चालू करतात तर काही लोक पोर्टफोलिओ मॅनेज करायला सुरुवात करतात. शेअर बाजारात तुम्ही काहीही करा पण आपल्याला मर्यादा ओळखुन करा जशी मराठीत म्हण आहे "अंथरूण पाहून पाय पसरावे "अगदी तसेच काही तरी आपल्याला शेअर बाजारात करावे लागते. जर आपण असे केले नाही तर येणार काळ हा खूप भयानक असू शकतो.          कमी काळात मिळालेल्या यशामुळे त्याच्या मनात आपल्याला सर्व काही येते असा गैरसमज निर्माण होऊ लागतो त्यामुळे काही ट्रेडर किंवा अनलिस्ट हे खूप मोठ्या प्रमाणावर काम करायच अस ठरवतात आणि अचानक शेअर बाजारात मोठी मंदि किंवा तेजी येते आणि ही परिस्थिती त्यांना नवीन असते अश्या प्रकारची परिस्थिती त्यांनी ह्या आधी कधीच बघितली नसते काय करावे आणि काय नाही हे समजत नाही आणि अश्यात त्यांच्या हातुन ...

आजचे मार्केट २० एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल स्वरूपाचे असून काल अमेरिकन बाजारामध्ये वरच्या पातळीवर टेक्नॉलॉजी समभागांमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले आहेत. टेस्ला कंपनीच्या समभागांमध्ये काल पाच टक्‍क्‍यांची घट झाली आहे. कारण ड्रायव्हरलेस कारचा एक्सीडेंट झाला आहे. अमेरिकेतील दहा वर्षाच्या Bond Yield वाढली आहेत. त्याचबरोबर डॉलर इंडेक्स मध्ये देखील वाढ नोंदविण्यात आले आहे. पाठीमागील 24 तासात भारतात 256000 हून अधिक covid-19 च्या केसेस आढळले आहेत. हा आकडा पाठीमागील दिवसापेक्षा थोडा कमी आहे. भारत सरकारने 18 वर्षे वयोगटातील पुढील लोकांना सरसकट लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर भारत सरकारने ड्यूटी फ्री आयात करायला परवानगी दिली आहे.     काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1634 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये विक्री केली आहे तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2355 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये खरेदी केले आहेत. BANKNIFTY Resistance  31550-31670 31800-31920 BANKNIFTY support  30590-30445 30119-30000

आजचे मार्केट १९ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र आणि नकारात्मक स्वरूपाचे आहेत.SGX NIFTY -192 आहे. त्यानुसार निफ्टी इंडेक्स 14500 च्या आसपास ओपन होण्याची शक्यता आहे. वित्तीय वर्ष 2020 21 मध्ये भारतातील सोन्याची आयात 22 टक्क्याने वाढले असल्याचे नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी अमेरिकन मार्केट नवीन उच्चांक पातळीवरती बंद झाले आहे. Dow Jones 164 अंकांची तेजी नोंदवण्यात आली होती. जगभरातील सर्व प्रमुख बिटकॉइन मध्ये 15 ते 20 टक्के पर्यंतचे घसरण झाली आहे. देशात सातत्याने वाढणारी कोरूना ची संख्या मार्केटसाठी चिंता करण्याचे कारण आहे. काल भारतामध्ये 275000 हून अधिक covid-19 पॉझिटिव केसेस आलेले आहेत. BANKNIFTY Resistance 32200-32310 32470-32550 BANKNIFTY support  31710-31550 31250-31200

आजचे मार्केट १५ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. आशियामधील काही शेअर बाजाराचा दमदार सुरुवात झाली आहे. मात्र SGX NIFTY 110 पॉईट खाली आहे. यानुसार भारतीय बाजार देखील gap Down ओपन होईल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची मागणी वाढल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइलच्या किंमतीमध्ये तेजी आली आहे. क्रूड ऑइल सध्या 66$ वरती ट्रेड करत आहे. आज भारतातील इंडियन ऑइल ओएनजीसी हे समभाग रडारवर राहतील. आदित्य बिर्ला सन लाइफ असेट मॅनेजमेंट कंपनीला आयपीओ आणण्यासाठी मान्यता मिळाली आहे. मागील 24 तासात देशभरामध्ये दोन लाखाहून अधिक covid-19 चे पेशंट आलेले आहेत. बिटकॉइन मध्ये जोरदार तेजी आली आहे. बिटकॉइन चा भाव 63 हजार डॉलरच्या वरती गेला आहे.    शुक्रवारी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 730 कोटी रुपयांचे cash  मार्केट बदल विक्री केली आहे. BANKNIFTY Resistance  32145-32280 32530-32680 BANKNIFTY support  31380-31200 30900-30840

आजचे मार्केट १३ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल मिश्र स्वरूपाचे आहेत. काल अमेरिकन बाजारामध्ये नफा वसुली झाली आहे. भारत आणि जग भरात सातत्याने वाढणारी covid-19 ची संख्या मार्केट साठी येणाऱ्या कालखंडात चिंता करण्याचे कारण असेल. प्रत्येक आठवड्यात जगभरामध्ये जवळपास चाळीस लाखांहून अधिक covid-19 अशा लोकांची संख्या आढळत आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काल 1746 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये विक्री केली आहे. NIFTY BANK RESISTANCE  31000-31224 31500-31665 NIFTY BANK SUPPORT  30500-30486 30297-30100

आजचे मार्केट १२ एप्रिल २०२१

        आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल असून अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार तेजी आहे. आशियाई बाजाराची सुरुवात फ्लॅट मूडवर होत आहेत. आयटी कंपनीमध्ये आज तेजी दिसून येऊ शकते. चौथ्या तिमाहीत चे रिझल्ट आज टाटा कन्सल्टन्सी कंपनी जाहीर करेल. त्याचबरोबर इन्फोसिस कंपनी त्यांचे रिझल्ट 14 एप्रिल रोजी जाहीर करेल व त्यामध्ये त्यांनी शेअर बायबॅक ची ऑफर जाहीर केले आहे. बाय बॅक ऑफर चा साइज 12 हजार कोटी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या इं प्रोसेस हा समभाग आपला पोर्टफोलिओ मध्ये असेल तर त्याला होल्ड करून ठेवावे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये वाढत जाणारी कोरूना ची संख्या मार्केट साठी अजून देखील चिंता करण्याचे कारण आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये दोन ते तीन आठवड्याचा लोकडाऊन जाहीर करण्याची शक्यता आज आहे त्याचा परिणाम स्टॉक मार्केट वर होताना दिसेल. Covid-19 च्या पार्श्वभूमीवर कॅडीला हेल्थकेअर, सिप्ला आणि डॉ. रेड्डी हे समभाग आज तेजी मध्ये असतील.       विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 653 कोटीची Cash मार्केटमध्ये विक्री केले आहे. त्याचबरोबर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूक...

आजचे मार्केट ९ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार तेजी असून अमेरिकन बाजार सध्या सर्वोच्च पातळीवर ती ट्रेड करत आहे. त्याचबरोबर काल टेक्नॉलॉजी समभागांमध्ये देखील तेजी आली आहे. आज नऊ एप्रिल रोजी चे शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक होताना दिसत आहे. देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात परत लोकांची आवश्यकता नसल्याचे प्रतिपादन केले आहे. Covide19 ची वाढती संख्या शेअर बाजारासाठी चिंता करण्याचे कारण आहे. उत्तर प्रदेश कर्नाटक आणि जम्मू काश्मीर सह अन्य काही राज्यांमध्ये नाईट कर्फ्यु लावण्यात आला आहे.    अमेरिकन फेडरल बँकेचे चेअरमन यांनी ग्रेट अमेरिका बनवण्याचे आवाहन केले आहेत. त्यामुळे अमेरिकन बाजारामध्ये तेजी आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज हाऊस 2023 पर्यंत अमेरिकेत तेजी राहण्याचे आशा व्यक्त केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. सोने एक महिन्याच्या उच्च पातळीवर ट्रेड करत आहे.   आजचा ट्रेडिंग सेशनमध्ये भारती रिटेल, हॉस्पिटलचे समभाग पॅथॉलॉजी लॅब समभाग, अशोक लेलँड या सर्व भागां...

आजचे मार्केट ०१ एप्रिल २०२१

👉 राष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 अमेरिकन सरकारने जाहीर केलेले इन्फ्रास्ट्रक्चर प्रपोजल यामुळे जागतिक बाजारांमध्ये तेजी आली आहे. 👉 आज पासून भारत सरकारच्या विविध बचत योजना वरील व्याज दरामध्ये घट करण्यात आली आहे. 👉 SGX NIFTY @100 + 👉 आजपासून फोरविलर गाड्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. 👉 इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये देखील बदल झाला आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1682 कोटीच विक्री केली आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सेंटीमेंट भारतीय मार्केटवर आजच्या दिवसासाठी निगेटिव आहे. 👉 NIFTY Resistance  14810-14841 14890-14920 NIFTY support  14627-14590 14550-14510 👉 BANKNIFTY Resistance  33819-33939 34180-34260 33180-33050 32859-32800