आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत सकारात्मक आणि मिश्र स्वरूपाचे आहेत. काल डाऊ जोन्स मध्ये 238 अंकांची तेजी आली आहे. एशियाई बाजार देखील अमेरिकन मार्केटला अनुकरण करणे अपेक्षित आहे. SGX NIFTY सपाट ओपनिंग संकेत देत आहे. अमेरिकेतील निम्म्याहून अधिक कंपन्यांचा नफा मध्ये चांगली वाढ नोंदविण्यात आली आहे.
देशातील covid-19 ची वाढती संख्या हे आज देखील भारतीय शेअर बाजारासाठी चिंता करण्याचे कारण आहेत. मागील 24 तासात देशभरामध्ये तीन लाख 55 हजार हून अधिक केसेस नोंदविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील केस कमी होत आहे हे एक चांगले लक्षण आहे. महाराष्ट्रामध्ये काल पहिल्यांदा एक महिन्यानंतर पन्नास हजारापेक्षा कमी केसेस आढळले आहेत. कर्नाटकामध्ये मात्र covid 19 केसे स्पाईक आली आहे. कोटक बँकेचा तिमाही निकालानंतर दिग्गज ब्रोकरेज संस्थांनी कोटक बँकेच्या टारगेट मध्ये घट केली आहे. त्याच वेळी या दिग्गज ब्रोकरेज हाऊसने एसबीआय लाइफ (SBI Life ) इन्शुरन्स वरील आपले टार्गेट वाढवले आहे. 1275 हे नवीन टारगेट एसबीआय लाईफ साठी देण्यात आले आहे.
काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2289 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये विक्री केली आहे.
NIFTY Resistance
14688-14718
14785-14839
NIFTY Support
14510-14471
14440-14383
BANKNIFTY Resistance
32580-32670
32790-32920
BANKNIFTY Support
32020-31940
31780-31580
Comments
Post a Comment