जगभरात कर्करोगाच्या रुग्णांत वेगाने वाढ होत आहे. दर वर्षी जवळपास दोन कोटी लोकांना कर्करोगाची लागण होत असल्याची माहिती समोर आली आहे. २०१७ ते २०१८ या एका वर्षात कर्करोगाचे रुग्ण ३०० टक्क्यांनी वाढले आहेत. जगभरात कर्करोगाच्या रुग्णांत वेगाने वाढ होत आहे. दर वर्षी जवळपास दोन कोटी लोकांना कर्करोगाची लागण होत असल्याची माहिती समोर आली आहे. २०१७ ते २०१८ या एका वर्षात कर्करोगाचे रुग्ण ३०० टक्क्यांनी वाढले आहेत. सर्वसामान्य कर्करोगासह तोंडाचा कर्करोग, छातीचा कर्करोग या कर्करोगाचा यात समावेश आहे. भारतात कर्करोगाच्या रुग्णात वेगाने वाढ होत आहे. याबाबतची आकडेवारी 'राष्ट्रीय आरोग्य २०१९'च्या अहवालावरून समोर आली आहे. भारतात ३०० टक्क्यांनी वाढ झालेल्या कर्करोगाच्या रुग्णांच्या माहितीची राज्यातील एनसीडी (नॉन कम्युनिकेबल डिसीज) क्लिनिक्समध्ये नोंद करण्यात आलेली आहे. २०१८मध्ये ६.५ कोटी पेशंट या क्लिनिकमध्ये पोहोचले होते. यातील १.६ लाख लोकांना कर्करोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे, तर २०१७ मध्ये या केसमध्ये ३९ हजार ६३५ केसची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, एनसीडी क्लिनिकमध्ये २०१७ ते २०१८ पर्...