Skip to main content

Posts

आजचे मार्केट २३ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल स्वरूपाचे आहेत. अमेरिकन मार्केटमध्ये 300 अनेकांचा दबाव आहे. कारण तेथे कॅपिटल गेन टॅक्स वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत. आशियाई बाजाराची देखील सुरुवात दबावा सहित होत आहेत. SGX NIFTY 80 अंकांचा दबाव दाखवत आहे. देशातील तरुणांची संख्या थांबण्याचे नाव घेत नाही काल दिवसभर मध्ये 2 लाख 32 हजार रुग्णांची वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आज पंतप्रधानांनी सर्वाधिक प्रभावित राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत मॅराथॉन बैठकीचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसोबत देखील बैठक होणार आहे. काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कॅश मार्केटमध्ये 909 कोटीची विक्री केली आहे. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 850 कोटी ची खरेदी केली आहे. BANKNIFTY RESISTANCE  31930-32070 32290-32410 BANKNIFTY SUPPORT  31450-31390 31000-30854

आजचे मार्केट २२ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल असून दोन दिवसाच्या विक्रीनंतर अमेरिकन बाजारांमध्ये तेजी आली आहे. एशियाई बाजारात देखील फ्लॅट सुरुवात होत आहे. काल SGX निफ्टी मध्ये 200 अंकांची घसरण झाली होती. मात्र आज परत SGX निफ्टी 150 पॉईंट वरती आहे. यानुसार भारतीय बाजार आज gap down open होणे  अपेक्षित आहे. भारतीय मार्केट साठी भारतामध्ये सातत्याने वाढणाऱ्या covid-19 च्या केसेस चिंता करण्याचे कारण आहे. मागील 24 तासात 3 लाख  15 हजारांहून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे. चीनने देशातील 14 टक्के लोकांना लसीकरण पूर्ण केल्याचे जाहीर केले आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1082 कोटी cash मार्केटमध्ये विक्री केले आहेत. त्याच वेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1323 कोटी रुपयांचे कॅश मार्केटमध्ये खरेदी केले आहेत.

डरना जरुरी है------

अगदी बरोबर वाचलत शेअर बाजाराची भीती असणे आवश्यकच आहे.कित्येक लोक आपण बघतो की आपल्या अनलिसिस वरती किंवा आपल्या स्ट्रॅटेजी वरती गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवतात एखादी स्ट्रॅटेजी समजा दोन चार महिने काय जरा व्यवस्थित चालली की लेगच ते स्वतःला देवच समजू लागतात आणि वाट्टेल ती आवश्वसने देऊ लागतात काही लोक कोर्सेस चालू करतात तर काही लोक पोर्टफोलिओ मॅनेज करायला सुरुवात करतात. शेअर बाजारात तुम्ही काहीही करा पण आपल्याला मर्यादा ओळखुन करा जशी मराठीत म्हण आहे "अंथरूण पाहून पाय पसरावे "अगदी तसेच काही तरी आपल्याला शेअर बाजारात करावे लागते. जर आपण असे केले नाही तर येणार काळ हा खूप भयानक असू शकतो.          कमी काळात मिळालेल्या यशामुळे त्याच्या मनात आपल्याला सर्व काही येते असा गैरसमज निर्माण होऊ लागतो त्यामुळे काही ट्रेडर किंवा अनलिस्ट हे खूप मोठ्या प्रमाणावर काम करायच अस ठरवतात आणि अचानक शेअर बाजारात मोठी मंदि किंवा तेजी येते आणि ही परिस्थिती त्यांना नवीन असते अश्या प्रकारची परिस्थिती त्यांनी ह्या आधी कधीच बघितली नसते काय करावे आणि काय नाही हे समजत नाही आणि अश्यात त्यांच्या हातुन नकळत चुका होत

आजचे मार्केट २० एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल स्वरूपाचे असून काल अमेरिकन बाजारामध्ये वरच्या पातळीवर टेक्नॉलॉजी समभागांमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले आहेत. टेस्ला कंपनीच्या समभागांमध्ये काल पाच टक्‍क्‍यांची घट झाली आहे. कारण ड्रायव्हरलेस कारचा एक्सीडेंट झाला आहे. अमेरिकेतील दहा वर्षाच्या Bond Yield वाढली आहेत. त्याचबरोबर डॉलर इंडेक्स मध्ये देखील वाढ नोंदविण्यात आले आहे. पाठीमागील 24 तासात भारतात 256000 हून अधिक covid-19 च्या केसेस आढळले आहेत. हा आकडा पाठीमागील दिवसापेक्षा थोडा कमी आहे. भारत सरकारने 18 वर्षे वयोगटातील पुढील लोकांना सरसकट लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर भारत सरकारने ड्यूटी फ्री आयात करायला परवानगी दिली आहे.     काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1634 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये विक्री केली आहे तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2355 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये खरेदी केले आहेत. BANKNIFTY Resistance  31550-31670 31800-31920 BANKNIFTY support  30590-30445 30119-30000

आजचे मार्केट १९ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र आणि नकारात्मक स्वरूपाचे आहेत.SGX NIFTY -192 आहे. त्यानुसार निफ्टी इंडेक्स 14500 च्या आसपास ओपन होण्याची शक्यता आहे. वित्तीय वर्ष 2020 21 मध्ये भारतातील सोन्याची आयात 22 टक्क्याने वाढले असल्याचे नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी अमेरिकन मार्केट नवीन उच्चांक पातळीवरती बंद झाले आहे. Dow Jones 164 अंकांची तेजी नोंदवण्यात आली होती. जगभरातील सर्व प्रमुख बिटकॉइन मध्ये 15 ते 20 टक्के पर्यंतचे घसरण झाली आहे. देशात सातत्याने वाढणारी कोरूना ची संख्या मार्केटसाठी चिंता करण्याचे कारण आहे. काल भारतामध्ये 275000 हून अधिक covid-19 पॉझिटिव केसेस आलेले आहेत. BANKNIFTY Resistance 32200-32310 32470-32550 BANKNIFTY support  31710-31550 31250-31200