Skip to main content

Posts

शिवश्री फिनान्शियल सर्विसेस

आपण कष्टाने कमावलेले पैसे हे सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या विविध क्षेत्रामध्ये गुंतवावा असे सर्वाना  वाटत आणि ते काही गैर नाही. पण प्रत्येकालाच आर्थिक व्यवहारांची चांगली माहिती असेलच असे नाही.  मग अशावेळी म्युच्युअल फंड योग्य ती भूमीका पार पडतो. म्युच्युअल फंड गुंतवणूक पर्यायामध्ये अनेक  गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र केले जातात आणि एका विशिष्ठ उद्देशासाठी वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायामध्ये  ते गुंतवले जातात .    1.     म्युच्युअल    फंडाचा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन दरमहा लहान रकमेची गुंतवणूक करून ठराविक कालावधीत संपत्ती निर्माण करण्याचा सोपा मार्ग आहे. 2.     एसआयपी द्वारे जमा झालेला पैसा शेअर्स आणि कर्जरोखे यामध्ये  गुंतविला जातो. 3.     तुमच्या मुलांचे उच्च शिक्षण ,  लग्न किंवा तुमचे निवृत्तीनंतरचे जीवन ,  यासारख्या अनेक वित्तीय गरजांसाठी एसआयपी गुंतवणूक तुम्हाला वेळेवर मदत करू शकते. 4.     गुंतवणूक दीर्घकाळासाठी करा.(५/१०/१५/२० वर्षे)   5.     दरमहा १०००  रुपये एवढ्या रकमेची एसआयपी गुंतवणूक तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यातून करू शकता . ----------

तुम्हाला या जबदरस्त कर बचतीच्या योजना माहिती आहेत का

पैसा हा लोकांच्या उत्पन्नाचा निदर्शक आणि जीवनमानाचाही मापदंड आहे. म्हणूनच ज्यांच्याकडे पैसा अधिक , त्यांचे उत्पन्नही अधिक , त्यामुळे त्यांचे जीवनमानही उच्च प्रतिचे असा निष्कर्ष काढला जातो. त्यामुळेच समाजातील प्रत्येक कर्ती व्यक्ती पैसा मिळविण्यासाठी धडपडत असते. ते आर्थिक दृष्टिकोनातून बरोबरही आहे. अर्थात या पैशाचा वापर लोक कसा करतात , हेही अत्यंत महत्त्वाचे आहे.  बचतीचे मार्ग    ही गोष्ट अत्यंत बरोबर आणि महत्त्वाची आहे की , श्रीमंत   व अतिश्रीमंत समाजातील लोक सोडून इतर सर्वांनीच वर्तमानातून मिळालेल्या उत्पन्नातून पैशाची काही बचत करणे आवश्यक आहे. अर्थात ही बचत करण्यासाठी नियोजनबद्घ आणि हेतूपुरस्सर प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसा प्रयत्न जर झाला नाही , तर वर्तमानकाळात त्या व्यक्तीस आणि अनुषंगाने त्या कुटुंबास मिळणारे सर्वच्या सर्व उत्पन्न खर्च होऊन पैशाची बचत होणार नाही. कुटुंबाला कोणत्या कोणत्या मार्गांनी आणि किती उत्पन्न महिन्याला आणि अनुषंगाने वर्षाला मिळते याचा अंदाज बांधायला पाहिजे. त्यानंतर कुटुंबांच्या गरजांच्या अत्यावश्यक गरजा , आवश्यक गरजा , आणि कमी महत्वाच्या गरजा असे वर्गीकरण

पैशाची गोष्ट : टर्म इन्शुरन्स म्हणजे काय आणि तो घेताना काय काळजी घ्यायची?

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? "कुटुंबासाठीच्या आर्थिक नियोजनांतील विमा ही अतिशय महत्त्वाची व पहिली पायरी मानली जाते." आयुर्विम्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे टर्म इन्शुरन्स आणि दुसरा कायमस्वरुपी विमा. पैकी टर्म इन्शुरन्समध्ये ठरलेल्या मुदतीपर्यंत तुम्हाला हप्ते भरायचे असतात. पैसे तुमच्या पश्चात तुमच्या नॉमिनीला मिळतात. थोडक्यात तुमच्या नंतर तुमच्यावर अवलंबून लोकांची आर्थिक काळजी घेणारा हा इन्शुरन्स आहे. पण, मुदतीनंतर तुम्ही जिवंत असाल तर मात्र तुम्हाला लाभ मिळत नाही. हाच इतर आयुर्विमा आणि टर्म इन्शुरन्सचा फरक आहे.  टर्म  इन्शुरन्सची गरज  काय? इन्शुरन्स तज्ज्ञ मिलिंद बने यांच्या मते, टर्म इन्शुरन्स हे एकच माध्यम आहे जे आपल्या सर्व आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतं."घरातली कर्ती व्यक्ती आपल्या नोकरीच्या काळात कुटुंबीयांच्या सर्व आर्थिक गरजा भागवत असते. शास्त्रीय परिभाषेत या जबाबदारीची मोजदाद मानवी जीवन मूल्यामध्ये होत असते", बने सांगतात. "घरातल्या सर्वांच्या आर्थिक गरजा लक्षात घेतल्या तर अशा व्यक्तीचं जीवन मूल्य हे दीड-दोन कोटींच्या घरात जातं. आणि मिळकत

समभाग संलग्न बचत योजना (ELSS)

समभाग संलग्न बचत योजना (ELSS) या विशेष प्रकारच्या गुंतवणूक योजना असून त्या म्युच्युअल फंडाच्या पुरस्कार्त्यांकडून राबवण्यात येतात. या योजना निरंतर (Open Ended) किंवा बंदिस्त (Closed Ended) या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहेत. यामध्ये एकरकमी किंवा जमेल तशी गुंतवणूक करता येते. त्याचप्रमाणे त्यात किमान ₹ ५००आणि कमाल कितीही रकमेची नियोजनपूर्वक गुंतवणूकही (SIP) करता येते. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर ८०/C च्या विहित मर्यादेत सूट मिळते. लाभांश (Dividend) आणि मूल्यवृद्धी (Growth) हे दोन्ही पर्याय उपलब्ध असून या योजनेस लाभांश पुनर्गुंतवणूक (Dividend Reinvestment) हा पर्याय उपलब्ध नाही. या योजनेतील ८०% रक्कम ते अनुकरण करीत असलेल्या इंडेक्समधील वैविध्यपूर्ण (Diversified) अशा समभागात जसे S&P Nifty किंवा S&P Nifty ५०० या इंडेक्समधील समभाग आणि २०% रक्कम डेट, मनी मार्केटमध्ये गुंतवली जाते. (अधिक तपशिलासाठी योजनेचे मागणीपत्र पाहावे.) सध्या मान्यताप्राप्त निवृत्तीयोजनेची वर्गणी (PF, VPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC),सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), विमा हप्ते, गृहकर्ज परतफेड, शैक्षणिक

निवृत्तीवेतन (पेन्शन) योजना NPS

निवृत्तीवेतन (पेन्शन) योजना म्हणजे अशी योजना जी आपल्या निवृत्तीनंतर खात्रीने उत्पन्न, निश्चित कालावधीसाठी देण्याची हमी देते. या योजनेत सहभागी होऊन आपण योजनेचे हप्ते भरले असता, जमा रकमेत दीर्घ काळात वाढ होते. ह्या रकमेचे व्यवस्थापन करून धारकास दरमहा उत्पन्न मिळते. सर्वसाधारणपणे या वेळी मिळणाऱ्या उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्याने या उत्पन्नातून अस्तित्वात असलेली जीवनशैली राखता येते. आपण कोणावरही अवलंबून नाही, या भावनेतून आत्मसन्मानात  भर पडते. अशा प्रकारच्या योजना जीवन विमा कंपन्या, म्युच्युअल फंड आणि सरकार यांच्याकडून राबवण्यात येतात. राष्ट्रीय सेवानिवृत्ती योजना ही सरकारी मान्यता असलेली सेवानिवृत्ती योजना असून १८ ते ६५ या वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिकांस या योजनेत ऐच्छीकरीत्या सहभागी होता येते, नंतर ऐच्छिकरित्या ७० वर्षापर्यंत ती चालू ठेवू शकता येते. तर १ जानेवारी २००४ नंतर रुजू झालेल्या केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना (सैन्य विभाग सोडून) या योजनेत सक्तीने सहभागी व्हावे लागते. पेन्शन वरील खर्चात बेसुमार वाढ झाल्याने सरकारी कामगारांना पूर्वीच्या निश्चित हमी पेन्शनऐवजी सहभागानु