Skip to main content

समभाग संलग्न बचत योजना (ELSS)

समभाग संलग्न बचत योजना (ELSS) या विशेष प्रकारच्या गुंतवणूक योजना असून त्या म्युच्युअल फंडाच्या पुरस्कार्त्यांकडून राबवण्यात येतात. या योजना निरंतर (Open Ended) किंवा बंदिस्त (Closed Ended) या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहेत. यामध्ये एकरकमी किंवा जमेल तशी गुंतवणूक करता येते. त्याचप्रमाणे त्यात किमान ₹ ५००आणि कमाल कितीही रकमेची नियोजनपूर्वक गुंतवणूकही (SIP) करता येते. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर ८०/C च्या विहित मर्यादेत सूट मिळते. लाभांश (Dividend) आणि मूल्यवृद्धी (Growth) हे दोन्ही पर्याय उपलब्ध असून या योजनेस लाभांश पुनर्गुंतवणूक (Dividend Reinvestment) हा पर्याय उपलब्ध नाही. या योजनेतील ८०% रक्कम ते अनुकरण करीत असलेल्या इंडेक्समधील वैविध्यपूर्ण (Diversified) अशा समभागात जसे S&P Nifty किंवा S&P Nifty ५०० या इंडेक्समधील समभाग आणि २०% रक्कम डेट, मनी मार्केटमध्ये गुंतवली जाते. (अधिक तपशिलासाठी योजनेचे मागणीपत्र पाहावे.)

सध्या मान्यताप्राप्त निवृत्तीयोजनेची वर्गणी (PF, VPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC),सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), विमा हप्ते, गृहकर्ज परतफेड, शैक्षणिक फी, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS), करबचत मुदत ठेवी (Tax Saving FDR), सुकन्या समृद्धी योजना (SSY), वरिष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) साधनातील गुंतवणुकीला दीड ते दोन लाख या मर्यादेत आयकर कलम ८०/सी खाली आयकर सवलत मिळते.

म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीसाठी आणि मार्गदर्शन यासाठी संपर्क 
8459775427

यातील काही योजनांचा परतावा (Return) मिळतो तो योजनेच्या प्रकारानूसार करमुक्त असतो किंवा नसतो. त्याचप्रमाणे यातील बहुतेक योजनांचा गुंतवणूक काळ हा किमान पाच वर्षे तरी असतोच. पीएफ, व्हीपीएफ यांना सध्या ८.५५% करमुक्त उतारा मिळत असून त्यांचा गुंतवणूक कालावधी प्रदीर्घ आहे. पीपी एफ व एनएससी मधून मिळणारा उतारा (Return) वार्षिक ८% आहे. यातील एनएससीमधील पहिल्या ४ वर्षात मिळालेले व्याज हे उत्पन्न करपात्र समजले जाते आणि त्याला पुनर्गुंतवणूक केल्याचा फायदा मिळतो, तर अंतिम वर्षात ती होत नसल्याने करपात्र उत्पन्नात मिळवले जाते. पीपीएफमधील उत्पन्न करमुक्त असते, परंतु यातील रक्कम पाच वर्षांहून अधिक काळ अडकून राहते. टॅक्स सेव्हिंग एफडीमधून पाच वर्षांत मिळणारा उतारा ७ ते ७.५% असून तो करपात्र आहे. एनपीएसमधून मिळणारा उतारा हा योजनेनुसार आणि दीर्घ काळ असून त्याची निश्चित अशी हमी नसल्याने ज्यांची दीड लाख गुंतवणूक पूर्ण झाली आहे आणि ज्यांच्याकडे जास्तीचे पैसे आहेत अशा लोकांना पन्नास हजारांची अधिकची करसवलत घेण्यास योग्य आहे.

सुकन्या समृद्धी ही योजना मुलींनी स्वावलंबी व्हावे यासाठी असून त्यातील गुंतवणूक मुलीच्या वयानुसार १४ ते २१ वर्षांपर्यंत अडकून राहते आणि ती संबधित मुलीलाच मिळते. सध्या यातून मिळणारा परतावा ८.५% असून तो करमुक्त आहे, तर एससीएसएस ही योजना सेवानिवृत्त झालेल्या लोकांसाठी असून यातून दर तिमाहीस मिळणारे ८.७% व्याज करपात्र आहे. ही गुंतवणूक पाच वर्ष कालावधीसाठी आहे.

या सर्व योजनांच्या तुलनेत ईएलएसएस ही कोणतीही निश्चित हमी न देणारी योजना आहे. भविष्यात भांडवल उभारणी करण्यासाठी जोखीम स्वीकारण्याची तयारी असलेल्या प्रत्येकास उपयुक्त आहे. या योजनेचा किमान गुंतवणूक कालावधी तीन वर्ष असून हा कालावधी संपला तरी गुंतवणूक काढून घेण्याचे बंधन नसते. यावर मिळणारा डिव्हीडंड त्याचप्रमाणे भांडवली नफा हा प्रतिवर्षी एक लाखांच्या मर्यादेत काही अटींसह पूर्णपणे करमुक्त आहे. moneycontrol या संकेतस्थळावर १ फेब्रुवारी २०१९ रोजी उपलब्ध असलेल्या माहीती प्रमाणे मूल्यांकनानूसार (Top Ranking Scheme) (Top Performing Scheme) चा गेल्या ३ वर्षांचा सरासरी उतारा १५% हून अधिक आहे.

या योजनांत गुंतवणूक करताना निश्चितच धोका आहे, परंतु यातून मिळणारा परतावा पाहिला असता थोडी जोखीम (Calculated Risk) पत्करली, तर अल्पमुदतीत अधिक आकर्षक उतारा भांडवलवृद्धी होण्याची खात्री आहे आणि त्यासाठी अनेक फंडहाऊस कडील आकर्षक योजनांचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय थोडे थांबण्याची तयारी असेल, तर नुकसान होण्याची अजिबात शक्यता नाही. हा दृष्टीकोन ठेवून अशा योजनांचा विचार धाडसी गुंतवणूकदारांनी करावा.

(यात उल्लेख केलेल्या योजना संदर्भासाठी www.moneycontrol.com या संकेतस्थळावरून घेतल्या असून त्या केवळ अभ्यासासाठी आहेत, त्यांची शिफारस केलेली नाही. आपण आपली गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करून योजना समजून घेऊन स्वतःच्या जोखमीवर करावी.)

Comments

Popular posts from this blog

Bazaarbull Trading Academy

  Advanced Technical Analysis  आणि ऑप्शन ट्रेडिंग ची नवीन बॅच   प्रोफेशनल ट्रेडर्स कोर्स   दिनांक 10 March 2023 पासून सुरू होत आहे. सोमवार ते शुक्रवार या  दररोज संध्याकाळी 8 ते 10 PM  या दरम्यान लेक्चर असतात. ( 30 Day )प्रोफेशनल ट्रेडर्स कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी कमीत कमी 6 महिने ऑप्शन ट्रेडिंग चा अनुभव असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर लॅपटॉप देखील आवश्यक आहे. कोर्सची प्रवेश फी 24000 आहे.  अधिक माहितीसाठी संपर्क  8459775427 बँक निफ्टी चा प्रीमियम टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी   Zerodha , Angle one,  Upstox and Aliceblue  मध्ये आमच्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करणे करणे अनिवार्य आहे. अकाउंट ओपन झाल्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि त्यामध्ये फंड add करून त्याचा स्क्रीन शॉट पाठवणे. डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी पुढील लिंक चा उपयोग करा. Zerodha https://zerodha.com/open-account?c=ZMPBRZ Angle broking https://tinyurl.com/yd5t4856 Aliceblue https://alicebluepartner.com/open-myaccount/?P=SSP729 ऑप्शन ट्रेडिंग शिकण्यासाठी फ्री कोर...

शेअर मार्केट: बेसिक आणि टेक्निकल कोर्स

बेसिक आणि टेक्निकल कोर्स प्रा.डॉ.संतोष सूर्यवंशी  ८४५९७७५४२७/ ७७९८३७५३५६  Email: sant.sury@gmail.com अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम मराठी पाऊल आर्थिक सक्षमतेकडे नमस्कार, मी प्रा.डॉ. संतोष सूर्यवंशी                          २०१४ पासून मी शेअर बाजारात कार्यरत आहे. मी स्वत: एक गुंतवणूकदार आणि पूर्ण वेळ Trader आहे, तसेच मी मराठी तरुणांना अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम बनवण्यासाठी  काम करीत आहे . हे मार्गदर्शन करण्यासाठी youtube आणि ब्लॉगच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबत आहे. माहिती तंत्रज्ञान याचा उपयोग करून मराठी लोकांपर्यंत शेअर बाजारातल्या उत्पन्नाची  माहिती पोहोचवणे हे माझे उद्दीष्ट आहे. मी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असेअसा कोर्स डिझाईन केलेले आहेत. आणि तंत्रज्ञानामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या वेळेत हा कोर्स रात्री ८ ते १० या वेळेत पूर्ण करू शकता. Advanced Technical analysis online courses        " बेसिक आणि टेक्निकल कोर्सचा अभिप्राय. नमस्कार,  मी शंकर ढाकणे, सोलापूर बार्शी सर...

Digital India Initiatives by Modi Government

                                       Digital India Initiatives by Modi Government  ●        New checks on booking of e-ticket/i-ticket through IRCTC website introduced with a view to further prevent possible misuse. Under the new provisions a maximum of 6 tickets can be booked online by an individual user in a month on IRCTC website. ●         Cancellation of PRS counter tickets through IRCTC website and 139 introduced ●         Printing of Bar Code on Unreserved tickets introduced to Prevent Fraud. ●         International Debit and Credit Cards accepted for payment for e-ticketing through IRCTC website ●         India’s first High Speed Public Wi - Fi Service at Mumbai Central station inaugurated. ●   ...