Skip to main content

तुम्हाला या जबदरस्त कर बचतीच्या योजना माहिती आहेत का

पैसा हा लोकांच्या उत्पन्नाचा निदर्शक आणि जीवनमानाचाही मापदंड आहे. म्हणूनच ज्यांच्याकडे पैसा अधिक, त्यांचे उत्पन्नही अधिक, त्यामुळे त्यांचे जीवनमानही उच्च प्रतिचे असा निष्कर्ष काढला जातो. त्यामुळेच समाजातील प्रत्येक कर्ती व्यक्ती पैसा मिळविण्यासाठी धडपडत असते. ते आर्थिक दृष्टिकोनातून बरोबरही आहे. अर्थात या पैशाचा वापर लोक कसा करतात, हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. 
बचतीचे मार्ग  ही गोष्ट अत्यंत बरोबर आणि महत्त्वाची आहे की, श्रीमंत  व अतिश्रीमंत समाजातील लोक सोडून इतर सर्वांनीच वर्तमानातून मिळालेल्या उत्पन्नातून पैशाची काही बचत करणे आवश्यक आहे. अर्थात ही बचत करण्यासाठी नियोजनबद्घ आणि हेतूपुरस्सर प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसा प्रयत्न जर झाला नाही, तर वर्तमानकाळात त्या व्यक्तीस आणि अनुषंगाने त्या कुटुंबास मिळणारे सर्वच्या सर्व उत्पन्न खर्च होऊन पैशाची बचत होणार नाही. कुटुंबाला कोणत्या कोणत्या मार्गांनी आणि किती उत्पन्न महिन्याला आणि अनुषंगाने वर्षाला मिळते याचा अंदाज बांधायला पाहिजे. त्यानंतर कुटुंबांच्या गरजांच्या अत्यावश्यक गरजा, आवश्यक गरजा, आणि कमी महत्वाच्या गरजा असे वर्गीकरण करायला पाहिजे. कुटुंबाला मिळणाऱ्या उत्पन्नातील अत्यावश्यक व आवश्यक गरजांवर खर्च करावा लागणारे उत्पन्न खर्च करावे आणि इतर उत्पन्नाची बचत करावी. अशाप्रकारे, कुटुंबांच्या गरजांची तीव्रतेनुसार क्रमवारी लावून वर्तमानकाळात उत्पन्नातील काही ना काही हिस्सा किमान ३० टक्के उत्पन्न बचत करायलाच पाहिजे. ही ३० टक्के रक्कम दर महिन्यास बचत करण्यात आली, तर वर्षभरात निश्चितपणे चांगली रक्कम बचत करणे शक्य आहे. आम्ही अभ्यास करून काही कर बचतीच्या आणि गुंतवणूकीच्या  योजना पुढील प्रमाणे आहेत.
म्युच्युअल फंड,शेअर्स मार्केट आणि विमा यांच्या सेवेसाठी आणि मार्गदर्शनासाठी संपर्क 
8459775427
१) ईएलएसएस कर बचत म्युच्युअल फंड
  •  ईएलएसएस ही कर बचतीची म्युच्युअल फंडांची एक योजना आहे.  
  • या योजनेत वार्षिक १ लाख ५० हजार रुपयांची कर सूट मिळू शकते.
  • इतर म्युच्युअल फंडांप्रमाणे या फंडाचाही परतावा (रिटर्न) निश्चीत नाही. या फंडामधून तुम्हाला १२ ते १८ टक्के परतावा मिळू शकतो.
  • या फंडाचा लाॅक इन पिरियड ३ वर्षांचा अाहे. म्हणजे ३ वर्षाच्या अात या फंडातून तुम्हाला तुमची गुंतवणूक काढता येणार नाही.
  • अॅक्सिस लाँग टर्म इक्विटी, रिलायन्स टॅक्स सेवर फंड. डीएसपी  टॅक्स सेवर फंड हे  ईएलएसएस (ELSS )प्रकारातील टाॅपचे फंड आहेत. 
  • कर बचत आणि उत्तम परतावा यासाठी ईएलएसएस कर बचत म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा एक उत्कृष्ट प्रकार आहेत . १५ मार्च २०१९ अखेर पुढीलप्रमाणे ईएलएसएसचा परतावा राहिला आहे.


२) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
  •  कर बचतीचा हा भारतातील सध्याचा एक उत्कृष्ट प्रकार आहे.
  • पीपीएफमधील १ लाख ५० हजार रुपयांपर्यंतची गुंतवणूक कर बचतीस पात्र आहे.
  • यावर मिळणारे व्याजही करमुक्त आहे.
  • केंद्र सरकार ही योजना राबवत असून यावरील व्याजदर सध्या ७.८ ते ८ टक्के आहे.
  • कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत पीपीएफ खाते उघडून गुंतवणूक सुरू करता येते.
  • या योजनेत १५ वर्षांचा लाॅक इन पिरियड आहे.

३) सुकन्या समृद्धी योजना
  •  ही योजना फक्त मुलींसाठी आहे.
  • पालक मुलीच्या नावाने खाते खोलून दर वर्षी जास्तीत जास्त १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
  • या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते.
  • मुदत संपल्यानंतर मिळणारे व्याजही करमुक्त आहे.

४) बँक मुदत ठेवी योजना  (tax saver bank FD schemes)
  •  कर बचतीचा हा एक जुना आणि उत्तम पर्याय मानला जातो.
  • अनेक बँकांच्या मुदत ठेवीच्या योजना आहेत. या मुदत ठेवीच्या रकमेवर कर सूट मिळते.
  • या योजनेत गुंतवणूक करमुक्त असली तरी मिळणाऱ्या व्याजावर मात्र कर अाकारला जातो.
  • या योजनांचा लाॅक इन पिरियड ५ वर्षांचा आहे.


५) ज्येष्ठ नागरिक बचत योजना 
  •  ही कर बचतीची योजना ज्येष्ठ नागरिकांना खात्रीशीर परताव्याची हमी देते.
  • ६० वर्षांवरील नागरिकाला कर बचतीसाठी हे खाते खोलता येते.
  • ५ वर्ष मुदतीची ही योजना आहे.
  • प्रत्येक तिमाही अखेरीस व्याज मिळते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी कर बचतीसाठी ही योजना उत्तम मानली जाते.
  • जास्तीत जास्त गुंतवणूकीची मर्यादा १५ लाख रुपये आहे.
  •  मिळणाऱ्या व्याजावर कर अाकारला जातो.
  • मुदती आधी  खाते १ वर्षानंतर  बंद करता येते. मात्र, यासाठी गुंतवणूक रकमेच्या दीड टक्के रक्कम दंड म्हणून आकारली जाते.


६) राजीव गांधी इक्विटी सेविंग स्कीम (RGESS)
  •  नवीन गुंतवणूकदारांसाठी ही कर बचत करणारी योजना आहे.
  • ज्यांचं वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपये अशा प्रथमच गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या योजनेत कर सवलत मिळते.
  • प्रत्येक आर्थिक वर्षात जास्तीत जास्त ५० हजार रुपयांची गुंतवणूक करता येते.
  • बीएसई १०० मधील शेअर्समध्ये आणि  RGESS म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते.
  • गुंतवणुकीच्या ५० टक्के रकमेवर कर सवलत मिळते. म्हणजे नवीन गुंतवणूकदाराने प्रथमच ५० हजार रुपयांची गुंतवणूक बीएसई १०० मधील शेअर्स आणि  RGESS म्युच्युअल फंडात केल्यास २५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळेल.

७) राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) 
  •  निवृत्तीसाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी अाणि कर बचतीसाठी हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे.
  • या योजनेत गुंतवणूकदारांना शेअर्स, बाँड्समध्ये गुंतवणूक करता येते.वर्षाला कमीत कमी ६ हजार रुपये आणि स्त कितीही रक्कम या योजनेत गुंतवता येते.
  • दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते.
८)  राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 
  •  राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही योजना पोस्ट अाॅफिसकडून चालवली जाते.
  • हा गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय मानला जातो.
  • कमीत कमी ५०० रुपये आणि  जास्तीत कितीही रक्कम या योजनेत गुंतवता येते
  • ५ वर्षासाठीची ही बचत प्रमाणपत्रे असून यावर ७.८ टक्के व्याज मिळते. दर ३ महिन्यांनी अर्थ मंत्रालय नवीन व्याजदर जाहीर करते.
  • गुंतवणूक करमुक्त असली तरी मिळणारे व्याज करपात्र आहे.

९) युनिट लिंक्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅन (ULIP)
  •  विमा संरक्षण, गुंतवणूक आणि  कर बचत असा तिहेरी लाभ देणारी ही योजना आहे.
  • विमा संरक्षणासह शेअर्समधील गुंतवणूकीचा फायदा या योजनेत मिळतो.
  • ही योजना राबवणारी कंपनी गुंतवणुकीचा काही हिस्सा शेअर बाजारात गुंतवते. 
  • योजनेचा लाॅक इन पिरियड ३ वर्ष आहे..

१०) जीवन विमा योजना
  •  अनेक कंपन्या जीवन विमा योजना देतात
  • सर्व प्रकारच्या जीवन विमा योजनांच्या प्रीमिमवर कर सवलत मिळते.
  • पारंपारिक विमा, मुदतीचा विमा, युलिप, मनी बॅक आदी  सर्व योजनांवर कर सूट मिळते. 
  • कर बचतीसाठी या योजना चांगल्या मानल्या जातात.
  • विमा संरक्षणासह परतावा मिळण्याची हमी या योजना देतात.


११) गृहकर्ज
  •  गृहकर्ज रकमेच्या परतफेडीवर २ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कर सूट मिळते.
  • गृहकर्ज व्याजाच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कर सूट दिली जाते.
  • जर तुमचं पहिलंच घर असेल तर ५० हजार रूपयांच्या व्याजाच्या रकमेवर अतिरिक्त कर सूट मिळेल. 

१२) पेन्शन फंड्स
  •  सेवानिवृत्तीनंतर उत्पन्न मिळवण्याचा मार्ग म्हणजे पेन्शन फंड. या फंडांमधील गुंतवणूकीवर कर सूट मिळते.

१३) शाळेची फी
  •  मुलांच्या शाळा, काॅलेज, विद्यापिठातील शिक्षणासाठी भरलेल्या फी वर  पालकांना कर सवलत मिळते.
  • जास्तीत जास्त २ मुलांच्या फी वरच कर सूट मिळेल.
  • शाळेला दिलेला विकास निधी आणि  इतर दिलेल्या शुल्कावर मात्र कर सवलतीचा दावा पालकांना करता येत नाही.

१४) घर भाडे
  •  तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर कंपनीकडून मिळणारा घरभाडे भत्ता कर सवलतीस पात्र असतो.

१५) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ)
  •  कर्मचाऱ्याच्या नावाने कंपनी ईपीएफमध्ये पैसे जमा करते.
  • यामध्ये कर्मचाऱ्याचा हिस्सा १२ टक्के आणि  तेवढाच हिस्सा कंपनीचाही असतो.
  • यामधील कर्मचाऱ्याचा हिश्श्यावर कर सवलत मिळते.
शिवश्री फायनान्शिअल सर्व्हिसेस
प्रा. डॉ. संतोष सूर्यवंशी
Ph.D. in Economics
AMFI Registered Mutual Fund Distributor &
SBI Life Insurance Adviser
मंगळवेढा-दामाजी साखर कारखाना रोडज्ञानदीप शाळेच्या  समोर,
*मंगळवेढा, सोलापूर
८४५९७७५४२७ 

Comments

Popular posts from this blog

Bazaarbull Trading Academy

  Advanced Technical Analysis  आणि ऑप्शन ट्रेडिंग ची नवीन बॅच   प्रोफेशनल ट्रेडर्स कोर्स   दिनांक 10 March 2023 पासून सुरू होत आहे. सोमवार ते शुक्रवार या  दररोज संध्याकाळी 8 ते 10 PM  या दरम्यान लेक्चर असतात. ( 30 Day )प्रोफेशनल ट्रेडर्स कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी कमीत कमी 6 महिने ऑप्शन ट्रेडिंग चा अनुभव असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर लॅपटॉप देखील आवश्यक आहे. कोर्सची प्रवेश फी 24000 आहे.  अधिक माहितीसाठी संपर्क  8459775427 बँक निफ्टी चा प्रीमियम टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी   Zerodha , Angle one,  Upstox and Aliceblue  मध्ये आमच्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करणे करणे अनिवार्य आहे. अकाउंट ओपन झाल्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि त्यामध्ये फंड add करून त्याचा स्क्रीन शॉट पाठवणे. डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी पुढील लिंक चा उपयोग करा. Zerodha https://zerodha.com/open-account?c=ZMPBRZ Angle broking https://tinyurl.com/yd5t4856 Aliceblue https://alicebluepartner.com/open-myaccount/?P=SSP729 ऑप्शन ट्रेडिंग शिकण्यासाठी फ्री कोर...

शेअर मार्केट: बेसिक आणि टेक्निकल कोर्स

बेसिक आणि टेक्निकल कोर्स प्रा.डॉ.संतोष सूर्यवंशी  ८४५९७७५४२७/ ७७९८३७५३५६  Email: sant.sury@gmail.com अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम मराठी पाऊल आर्थिक सक्षमतेकडे नमस्कार, मी प्रा.डॉ. संतोष सूर्यवंशी                          २०१४ पासून मी शेअर बाजारात कार्यरत आहे. मी स्वत: एक गुंतवणूकदार आणि पूर्ण वेळ Trader आहे, तसेच मी मराठी तरुणांना अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम बनवण्यासाठी  काम करीत आहे . हे मार्गदर्शन करण्यासाठी youtube आणि ब्लॉगच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबत आहे. माहिती तंत्रज्ञान याचा उपयोग करून मराठी लोकांपर्यंत शेअर बाजारातल्या उत्पन्नाची  माहिती पोहोचवणे हे माझे उद्दीष्ट आहे. मी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असेअसा कोर्स डिझाईन केलेले आहेत. आणि तंत्रज्ञानामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या वेळेत हा कोर्स रात्री ८ ते १० या वेळेत पूर्ण करू शकता. Advanced Technical analysis online courses        " बेसिक आणि टेक्निकल कोर्सचा अभिप्राय. नमस्कार,  मी शंकर ढाकणे, सोलापूर बार्शी सर...

Digital India Initiatives by Modi Government

                                       Digital India Initiatives by Modi Government  ●        New checks on booking of e-ticket/i-ticket through IRCTC website introduced with a view to further prevent possible misuse. Under the new provisions a maximum of 6 tickets can be booked online by an individual user in a month on IRCTC website. ●         Cancellation of PRS counter tickets through IRCTC website and 139 introduced ●         Printing of Bar Code on Unreserved tickets introduced to Prevent Fraud. ●         International Debit and Credit Cards accepted for payment for e-ticketing through IRCTC website ●         India’s first High Speed Public Wi - Fi Service at Mumbai Central station inaugurated. ●   ...