दारिद्र्य रेषेखालील महिलांना मोफत गॅस जोडणी
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील महिलांना स्वयंपाकाच्या गॅसचा जोड (कनेक्शन) मोफत देण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने गुरुवार, 11 मार्च 2016 रोजी मंजूर केली. या योजनेसाठी 8 हजार कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वल योजना असे या योजनेचे नाव असून, तीन वर्षांसाठी याला मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या चुलींमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी, तसेच महिला सबलीकरण म्हणून या स्तरातील महिलांना मोफत कनेक्शन दिली जाणार असून पहिल्या वर्षात त्यासाठी अर्थसंकल्पात २ हजार कोटींची तरतूद केली गेली आहे. पहिल्या वर्षात १ कोटी ५० लाख क नेक्शन दिली जातील तर तीन वर्षाच्या कालावधीत हीच संख्या ५ कोटींवर जाणार आहे.

योजनेचे उद्देश
- महिलांचे सक्षमीकरण व त्यांच्या आरोग्याची निगा राखणे.
- स्वयंपाक करतांना लाकडी जळण वापरण्यामूळे होणारे तीव्र दुष्परिणाम कमी करणे.
- स्वयंपाकासाठी अस्वच्छ जळण वापरल्यामुळे भारतात होणारे मृत्यू कमी करणे.
- घरात लाकडी जळण वापरल्यामुळे लहान बालकांना बऱ्याच मात्रेत होणाऱ्या श्वासोच्छवासाच्या तक्रारी दूर करणे
उज्ज्वल योजनेचे यश
- देशातील 6९४ जिल्हे समाविष्ट
- एकूण २०९१६१५ जोडणी पूर्ण
Comments
Post a Comment