जगप्रसिद्ध गुंतणूकदार आणि Rich Dad Poor Dad या त्यांच्या जगप्रसिद्ध गाजलेल्या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी म्हणतात "जगातील ९०% लोक ही रॅट रेसमध्ये अडकलेली असतात. म्हणजेच काय तर सकाळी उठणे कामाधंद्यास जाणे त्यातून कमावणे, खर्च करणे, देणी देणे, परत कमवणे खर्च करणे देणी देणे आणि हे दुष्टचक्र आयुष्यभर चालूच असते म्हणून ह्या व्यक्ती कधीच श्रीमंत होऊ शकत नाहीत" कारण ह्या व्यक्ती आपण कमावलेल्या पैशाचे कधीच संपत्तीत रूपांतर करत नाहीत जसे की -रिअल इस्टेट ज्यातून भाडे मिळू शकते किंवा किंमत वाढू शकते. - शेअर्स खरेदी करणे - व्यवसायात गुंतवणूक करणे फक्त आज कमावलेले आज खर्च करणे आणि उद्याची वाट बघणे हेच ते करत असतात आणि यात मूळ अभाव असतो आर्थिक शिक्षणाचा आणि कधीच ना केलेल्या आर्थिक नियोजनाचा. आपण प्रत्येकाने शाळेत असताना "जोड्या लावा" ह्या प्रकारांमध्ये भरघोस गुण मिळवले असतील इतका सोपा गुण मिळवून देणारा प्रकार होता. पण जेव्हा आज आपल्या जीवनात काही आर्थिक ध्येयं आहेत त्यांच्यासाठी आज आपण काय गुंतवणूक केली आहे अशा जोड्या लावायला सांगितल्या तर किती त्रासदायक होईल? कारण या पद्