आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण सर्वच जण अगदी धावत आहोत पैश्यांसाठी, करीअरसाठी, टार्गेट साठी, दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी...!
पण या सर्व व्यापात आपण स्वतःला च विसरून गेलो अाहोत. कुटुंबातील व्यक्तिंसोबत वेळ देणे, नियमीत पायी फिरायला जाणे, मैदानी खेळ खेळणे, पोहणे, सायकल चालविणे, निसर्गाच्या सान्निध्यात राहणे हे अगदी दुरापास्त झाल्यासारखे आहे. सतत कामाचा ताण, व्यायामाचा अभाव, सकस अाहाराचा अभाव, तेल व फास्ट फुड चा अति वापर, वाढत चाललेली व्यसनाधीनतेची फॅशन यावर आपल्या शरीरावर जो अन्याय होतोय तो आपण सोयीस्कर विसरतो . परिणामी आजकाल अगदी पस्तीशीच्या लोकांनाही ह्रदयविकार, अतिरक्तदाब, मधुमेह, दमा, लठ्ठपणा आदी समस्या उद्भवत आहेत. गतिमान आयुष्यात अधिक गतीने व पुरेशी सावधानता व वाहतूकीचे नियम न पाळता वाहने चालविणे वा आपण कितीही व्यवस्थित चाललो तरी दुसरयांच्या चुकीमुळे अपघात हेही नित्याचेच झालेले आहेत. अशा एकंदरीत प्रतिकूलतेचा विचार केल्यास *आपल्याला केव्हा ना केव्हा तरी हाॅस्पीटलची पायरी चढावीच लागणार ही जाणीव प्रत्येकाला असलीच पाहिजे.*
आपण अनेकविध भौतिक सुखं व चैनीच्या वस्तूंसाठी पैसे खर्च करतो. व्यसने पूर्ण करण्यासाठी काही लोक नित्यनेमाने पैसे खर्च करत असतात. पण जेव्हा स्वतःच्याच आयुष्याचा प्रश्न उभा राहतो, स्वतःच्या शरीरास एखाद्या गंभीर आजाराने ग्रासले जाते, तेव्हा चांगल्या चांगल्यांचीही पायाखालील जमीन सरकते. अचानक उद्भवणाऱ्या या परिस्थितीचा एक महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे उपचारासाठी लागणारा पैसा. आपल्या भारतात सार्वजनिक सरकारी आरोग्य यंत्रणेची सेवा म्हणजे न बोललेलंच बरं! प्रत्येकच जण अशावेळी खाजगी हाॅस्पीटलकडेच धाव घेतो. स्वच्छ, स्वतंत्र रूम्स, तत्पर सेवा, अत्याधुनिक उपचार प्रणालीचा वापर यासाठी सर्वसामान्य मनुष्य देखील खाजगी हाॅस्पीटल्सलाच पसंती देतो. आजकाल हाॅस्पिटलची बिलेही भरमसाठ वाढली आहेत.साध्या साध्या आजारांचा खर्चही 10-20 हजारांच्या आत होत नाही. पण जेव्हा मोठा अपघात, ह्रदयविकाराचा झटका, कॅन्सर इ. स्वरूपाचा किचकट जीवघेणा आजार असेल तर अशावेळी लागणाऱ्या तपासण्या, महागड्या औषधी, मेजर आॅपरेशन्स किंवा इन्टेसिव्ह प्रोसीजर्स (ICU) या सर्वाना सामोरे जावे लागतेच लागते. या सर्वासाठी पैसा हा लागतोच. आपण आजतागायत कमविलेली जमापुंजी खर्च करण्याची पाळी येते. ती देखील नसली तर नातेवाईक -मित्र किंवा समाजसेवी संस्थांकडे मदतीचा हात पसरावा लागतो. काहींना यात अनेकदा चांगल्या-वाईटाचा अनुभव येतो. आणि जर घरातील कर्ता पुरूषच आजारी असेल तर अजुनच फसगत होते. कुणी मदत करुन करणारही किती? प्रत्येकालाच सांसारिक गरजा असतात. अशा प्रसंगातून जो पार पडला असेल तोच याचे गांभीर्य जाणतो. *डिस्चार्ज च्या दिवशी आपले नातेवाईक किंवा मित्रांकडुन पैसे गोळा करुन,उसणवारी करुन हाॅस्पिटलची बिले भरताना आम्ही कितीतरी वेळा डोळ्यांनी पाहिलं आहे.*
या सगळ्या गोष्टीवर खबरदारी म्हणून स्वतःचा व परीवारातील सदस्यांचा मेडिक्लेम करुन तो नियमितपणे रिन्युवल करुन घेणे हे अधिक सुरक्षितता देणारे ठरते. *आपल्या कुटुंबातील व्यक्तीला कुणास डायबेटिस वा उच्च रक्तदाब असल्यास पुढील शक्यता गृहित धरून मेडिक्लेम हा केलाच गेला पाहिजे.*
अापल्या स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूकता असल्यामुळेच पाश्च्यात्य लोकं आरोग्यदृष्ट्या सुखी आहे. सरकारी तिजोरीवरही त्याचा भार न येता डेव्हलपमेंट साठी त्याचा वापर करता येतो. इन्व्हेस्टमेंटचे अधिक रिटर्नस् देणारे अनेकही चांगले मार्ग आहेत. *तुमचा 1 कोटीचा लाईफ इन्शुरन्स असु द्या,आजारी पडल्यावर तुम्हाला त्यातुन काहीच मिळणार नाही.* मनुष्य मेल्यानंतर पैसा मिळालाच तर तो कुटुंबाच्या उपयोगी येईलच पण गंभीर आजारात अथवा अपघातात जायबंदी झाल्यास काय?लाईफ इन्शुरन्स हा तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाची काळजी घेईल तर हेल्थ इन्शुरन्स (मेडीक्लेम) हे तुम्हाला जगवण्यासाठी,उपचारांसाठी मदत करेल! सुदृढ शरीर व उत्तम आरोग्य ही देखील आपली एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहेच. यासाठी मेडिक्लेम केव्हाही चांगलेच. शिवाय 80 D अंतर्गत त्यास करसंरक्षण आहेच. आपण आपल्या कारचा, मोटारसायकलीचा विमा करतो शिवाय समोरच्यास काही झाल्यास थर्डपार्टीचीही तरतुद करतो, पण आपल्या स्वतःला व कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्य सेवेबद्दल इतकी अनास्था का बाळगतो? *गाडीचा अपघात झालातर गाडीच्या विम्यातुन गाडीच्या दुरुस्तीसाठी पैसे मिळतील पण तुमच्या दुरुस्तीचे काय ??*
मी आजपर्यंत रुग्ण व नातेवाईकांचे अनुभव बघितले, त्यातुन हे सांगावेसे वाटले. आपल्या कुणावरही असा बिकट प्रसंग उद्भवू नये पण उद्भभवलाच तर निश्चित दिलासा म्हणून मेडिक्लेम हा चांगला उपाय आहे असे वाटते.
*गाडी निघुन गेल्यावर हात करण्यात काहीच अर्थ नसतो,तसंच आजार झाल्यावर पाॅलिसी घेण्यात काहीच अर्थ नाही .कारण पाॅलिसी घेण्यापुर्वी असणारया आजारांना पहिली 4 वर्षे क्लेम मिळत नाही,म्हणुन मेडीक्लेमची सुरुवात ही आपण निरोगी असतानाच करायला हवी!*
*आपली मेडीक्लेम पाॅलिसी आजच करुन घ्या...*
SBI Life
Financial Advisers
Dr.Santosh Suryawanshi
Ph.D in Economics
Mob.9763708789
Comments
Post a Comment