सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती देशातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाच्या सरकारी बँकेमध्ये जो आर्थिक अपहार करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यशैली बाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. देशातील जवळपास 60 टक्के बँकिंग क्षेत्र हे सार्वजनिक बँकांनी व्यापले आहे. देशातील खाजगी बँका विचार करता त्यांची कार्यक्षमता व आर्थिक प्रगती ही नेहमीच सार्वजनिक बँकांपेक्षा अधिक सक्षम राहिली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत नीरव मोदी यांनी 11हजार 400 कोटीचा आर्थिक अपहार केल्याचे उघड झाले आहे. त्यासंबंधी सीबीआय चौकशी करीत आहेत व तसा प्राथमिक अहवाल त्यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आला आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हा सर्व प्रकार मागील सात वर्षांपासून सुरु होता.याची खबर ना मध्यवर्ती बँकेला होती, ना वित्त मंत्रालयाला होती. हा आर्थिक अपहार करण्यासाठी नीरव मोदी यांनी लेटरऑफ अंडरटेकिंग (एलओयू) आधार घेतला. एलओयूच्या आधारावर विदेशातील विविध बॅंकांच्या शाखेतून पैसे काढण्यात आले व त्या...