वाहन विमा हा कार, ट्रक,
मोटारसायकल व इतर वाहनांच्या संरक्षणासाठी
काढलेला विमा होय. या विम्याचा
प्राथमिक उद्देश हा रहदारीच्या अपघातांपासून होणारे वाहनाचे/वाहनांचे नुकसान व
वाहनचालकाला वा अपघातात सापडल्याने इतर व्यक्तीला झालेल्या शारीरिक इजा यांपासून
आर्थिक सुरक्षा पुरवणे हा आहे. वाहन विमा हा रहदारीच्या अपघातांमुळे निर्माण
होणार्या अन्य काही दायित्वांपासूनही आर्थिक सुरक्षा पुरवतो. वाहन विम्याच्या
विशिष्ट अटी या प्रत्येक विभागाच्या कायदेशीर तरतुदीनुसार बदलतात. काही प्रकारचे
वाहन विमा हे रस्ते अपघातांव्यतिरिक्त कारणांमुळे होणारे वाहनाचे नुकसान व चोरी
यांपासूनही आर्थिक सुरक्षा प्रदान करतात.
विम्याचा दावा करताना
वाहनाचा अपघात झाल्यास विमा कंपनीस त्वरित लेखी कळवावे लागते. अपघातानंतर व्यापारी वाहनाचा स्पॉट सर्व्हे, पोलिस पंचनामा करून घेऊन त्याची प्रत दाव्यासोबत जोडावी लागते. दुरुस्तीसाठी वाहन दिल्यानंतर दुरुस्तीचे अंदाजपत्रक (एस्टिमेट) घेणे आवश्यक असते. दावा फॉर्ममध्ये अपघाताचे नेमके विवरण स्पष्टपणे नमूद करावे लागते. अपघातामुळे नेमके काय नुकसान झाले, हेही नमूद करणे गरजेचे असते. दावा अर्जासोबत दुरुस्ती अंदाजपत्रक, नोंदणीपुस्तक, वाहनपरवाना, कर पावती, फिटनेस दाखला, परमिट याच्या गरजेप्रमाणे झेरॉक्स प्रती जोड्तात. सर्व कागदपत्रांसह कोणताही रकाना न सोडलेला दावाअर्ज विमा कंपनीत सादर केल्यावर सर्व्हेअरने मंजुरी दिल्यानंतर वाहनाची दुरुस्ती करता येते. दुरुस्तीचे बिल रक्कम मिळाल्याच्या पावतीसह आणिअन्य कगदपत्रांसह विमा कंपनीकडे सादर केल्यावर तीस दिवसांत दावा निकाली निघतो. किरकोळ रकमेचा दावा केल्यास वाहनाअभावी होणारी गैरसोय होते व पुढील वर्षी कापला जाणारा "नो क्लेम बोनस‘ व वाहन किमतीचा घसारा मिळत नाही.
वाहनाच्या विम्याचा दावा केव्हा नाकारला जातो
गाडीचा विमा का करावा
आजच्या जमान्यामध्ये महागड्या गाड्या वापरणार्यांची संख्या वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर रस्ते अपघातांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. रस्ते अपघातांमुळे होणारे वाहनाचे नुकसान व अपघातामध्ये समाविष्ट व्यक्तींच्या उपचाराचा खर्च यामुळे खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो. बर्याच वाहनधारकांना हा आर्थिक खर्च पेलणे कठीण असते. म्हणूनच वाहनधारकांसाठी ही एक चिंतेची बाब असते. बरेच लोकं या भीतीमुळे स्वतःचे वाहन विकत घेणे टाळतात. वाहनधारकांची ही चिंता मिटवण्याचे काम वाहन विमा करतो. वाहन विमा हा अपघातामुळे निर्माण होणार्या समस्यांमधील आर्थिक बाजू सांभाळतो. त्यामुळे वाहन विमा असलेली व्यक्ती ही विनाचिंता वाहन वापरण्याचा आनंद लुटू शकते. एखाद्या गोष्टीमधील जोखीम ती गोष्ट वापरणाऱ्या सर्वांमध्ये विभागणे हे विम्याचे सर्वसाधारण सूत्र इथेही वापरले जाते.
वाहन विम्यामध्ये खालीलपैकी काही किंवा सर्व बाबींचा समावेश असतो

- वाहन विमाधारक व्यक्ती (वैद्यकीय खर्च)
- वाहन विमाधारकामुळे झालेले मालमत्तेचे नुकसान
- विमाधारक वाहनाचे नुकसान
- थर्ड पार्टी (वाहन व व्यक्ती, मालमत्तेचे नुकसान व शारीरिक इजा) व थर्ड पार्टी, आग व चोरी
- विमाधारक वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च (अपघातात कोणाचीही चूक असली तरीही)
- दुसरे वाहन भाड्याने घेण्याचा खर्च (जर विमाधारकाच्या वाहनाचे नुकसान झाले असेल तर)
- अपघातग्रस्त वाहन अपघाताच्या जागेपासून दुरुस्तीच्या जागेपर्यंत घेऊन जाण्याचा खर्च
- अपघातामध्ये समाविष्ट इतर विमा नसलेल्या वाहनचालकांचा वैद्यकीय खर्च
थर्ड पार्टी इन्शुरन्स
मोटार वाहन कायद्यानुसार थर्ड पार्टी इन्शुरन्स कायदेशीर आहे. नावावरूनच स्पष्ट होते. हा विमा तिसऱ्या पक्षाशी संबंधीत आहे. पहिला पक्ष म्हणजे विमा विकत घेणारा, दुसरा पक्ष विमा कंपनी आणि तिसरा म्हणजे आपल्यामुळे ज्याच्या गाडीचे नुकसान झाले आहे असा व्यक्ती. थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये या तिसऱ्या व्यक्तीलाच नुकसान भरपाईची रक्कम दिली जाते. यामध्ये विमा घेणाऱ्या व्यक्तीला काहीही नुकसान भरपाई मिळत नाही. तसेच तिसऱ्या पक्षाचा मृत्यू किंवा गंभार दुखापत झाल्यास त्याला भरपाई देण्याचीही कायद्यात तरतूद करण्यात आली आहे.

गाडीच्या विमा खरेदीसाठी: 8459775427
कॉम्प्रिहेन्सिव इन्शुरन्स
या प्रकारच्या इन्शुरन्समध्ये वाहनाला अपघात झाल्यास विमा घेणाऱ्या व्यक्तीसह तिरऱ्या पक्षाचे नुकसानही कव्हर होते. जर समोरचा व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास त्याचाही खर्च केला जातो. तसेच वाहनाचेही नुकसान मिळते. या विमा प्रकारामध्ये अपघात, आग, चोरी, नैसर्गिक आपत्ती किंवा दहशतवादामध्ये वाहनाचे नुकसान झाल्यास भरपाई मिळते. या प्रकारामध्ये वाहनाचे नुकसान प्लॅस्टिक, पत्रा याच्या वर्गीकरनानुसार दिले जाते. तसेच डेप्रिसिएशन वाहनाला झालेल्या वर्षानुसार ठरते.

झिरो डेप्रिसिएशन इन्शुरन्स
या प्रकारच्या विमा पॉलिसी अंतर्गत वाहनाच्या नुकसानीची किंमत ठरविताना डेप्रिसिएशन म्हणजेच रक्कम कमी केली जात नाही. म्हणजेच अपघात झाल्यास विमा कंपनी नुकसानीची पूर्ण रक्कम वाहन मालकाला देते. मात्र, या प्रकारच्या इन्शुरन्स कॉम्प्रिहेन्सिव इन्शुरन्सपेक्षा 20 टक्क्यांपेक्षा महाग असतो.
या प्रकारच्या विमा पॉलिसी अंतर्गत वाहनाच्या नुकसानीची किंमत ठरविताना डेप्रिसिएशन म्हणजेच रक्कम कमी केली जात नाही. म्हणजेच अपघात झाल्यास विमा कंपनी नुकसानीची पूर्ण रक्कम वाहन मालकाला देते. मात्र, या प्रकारच्या इन्शुरन्स कॉम्प्रिहेन्सिव इन्शुरन्सपेक्षा 20 टक्क्यांपेक्षा महाग असतो.
विम्याचा दावा करताना
वाहनाचा अपघात झाल्यास विमा कंपनीस त्वरित लेखी कळवावे लागते. अपघातानंतर व्यापारी वाहनाचा स्पॉट सर्व्हे, पोलिस पंचनामा करून घेऊन त्याची प्रत दाव्यासोबत जोडावी लागते. दुरुस्तीसाठी वाहन दिल्यानंतर दुरुस्तीचे अंदाजपत्रक (एस्टिमेट) घेणे आवश्यक असते. दावा फॉर्ममध्ये अपघाताचे नेमके विवरण स्पष्टपणे नमूद करावे लागते. अपघातामुळे नेमके काय नुकसान झाले, हेही नमूद करणे गरजेचे असते. दावा अर्जासोबत दुरुस्ती अंदाजपत्रक, नोंदणीपुस्तक, वाहनपरवाना, कर पावती, फिटनेस दाखला, परमिट याच्या गरजेप्रमाणे झेरॉक्स प्रती जोड्तात. सर्व कागदपत्रांसह कोणताही रकाना न सोडलेला दावाअर्ज विमा कंपनीत सादर केल्यावर सर्व्हेअरने मंजुरी दिल्यानंतर वाहनाची दुरुस्ती करता येते. दुरुस्तीचे बिल रक्कम मिळाल्याच्या पावतीसह आणिअन्य कगदपत्रांसह विमा कंपनीकडे सादर केल्यावर तीस दिवसांत दावा निकाली निघतो. किरकोळ रकमेचा दावा केल्यास वाहनाअभावी होणारी गैरसोय होते व पुढील वर्षी कापला जाणारा "नो क्लेम बोनस‘ व वाहन किमतीचा घसारा मिळत नाही.
वाहनाच्या विम्याचा दावा केव्हा नाकारला जातो
- विम्याचे नूतनीकरण केले्ले नसल्यास
- विमा कंपनीला न विचारता वाहनाची दुरुस्ती केल्यास
- वाहनात अन्ध्कृतपणे सीएनजी/एलपीजी किट बसवले असल्यास
- खासगी वाहन व्यापारी उपयोगासाठी वापरले असल्यास
- अपघाताच्या वाहनात क्षमतेपेक्षा अधिक व्यक्ती बसलेल्या असल्यास
- वाहन पाण्यातडकले असल्यावर इंजिन चालू करण्याचा प्रयत्न केलेला असल्यास
- वाहन विकल्यानंतर त्याची व नव्या मालकाची नोंदणी पुस्तकात नोंद केलेली नसल्यास
कॅशलेस सेवा आजकाल वाहन वितरकाकडून काढलेल्या इन्शुरन्स पॉलिसीवर त्याच वितरकाकडे
कार दुरुस्त करून घेतल्यास कॅशलेस सेवा मिळते. म्हणजे इन्शुरन्सधारकास वाहन
दुरुस्तीची पूर्ण रक्कम न भरता विशिष्ट रक्कम (घसारा रक्कम, नामंजूर खर्च आदी) भरून वाहन घरी नेता येते. येथे क्लेम फॉर्म भरणे, सव्र्हेअरकडून कागदपत्रे छाननी, दुरुस्तीपूर्व व नंतरची तपासणी ही सर्व
कामे वितरकाच्या दुरुस्ती वर्कशॉपच्या व्यक्तींमार्फत केली जातात. ग्राहकास फार
धावपळ करावी लागत नाही व रोख रकमेची तजवीजही करावी लागत नाही.
Comments
Post a Comment