*मार्च ची वाट नको*
टॅक्स वाचवण्यासाठी मार्च महिन्याची वाट पाहू नका.
आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच SIP पद्धतीने ELSS गुंतवणूक करु शकता, त्यामुळे तुमचा धोका कमी होऊन जाईल.
ELSS म्हणजे ( Equity Linked Saving Scheme.)
ELSS हा म्युच्युअल फंडचाच प्रकार आहे.
Equity – व्यवसायाचा भागीदार होणे
Linked – जुळलेली
Saving – बचत
Scheme – योजना
**ELSS हा म्युच्युअल फंडचा प्रकार, मग यात इतर फंड पेक्षा वेगळ काय ?
यात दोन गोष्टी प्रामुख्याने वेगळ्या आहेत आणि त्याच याला इतर म्युच्युअल फंड पेक्षा वेगळ करतात.
1) इनकम टॅक्स सुट 80(c)
2) लॉक इन पिरियड ३ वर्ष – म्हणजे असा काळ, ज्यात तुम्ही पैसे काढू शकत नाही.
ELSS कोणासाठी योग्य आहे?
1) ज्या लोकांना इनकम टॅक्स 80 (c) सुट हवी आहे.
2) जे लोक इतर टॅक्स बचत योजना जसे का FD, PPF पेक्षा थोडा जास्त धोका घ्यायला तयार आहेत. थोडा जास्त परतावा मिळवण्या करीता.
ELSS कोणासाठी योग्य नाही?
1) ज्या लोकांना इनकम टॅक्स सूट 80 (c) नको आहे.
2) ज्यांना मार्केटच्या चढ उतारांचा धोका घ्यायचा नाही आहे. जे थोडा कमी परतावा आला तरी समाधानी आहेत.
ELSS मध्ये टॅक्स सूट किती ?
ELSS मध्ये टॅक्स सूट ची कमाल मर्यादा १.५ लाख आहे. याचा अर्थ तुमचा १.५ लाख पर्यंत टॅक्स माफ होतो असे नाही. तर १.५ लाखांवर जो टॅक्स तुम्हाला भरावा लागणार होता, तो माफ होईल.
ELSS मध्ये गुंतवणुकीचे दोन पर्याय
1) LUMPSUM – एकाच वेळी गुंतवणूक करणे.
2) SIP – नियमित गुंतवणूक करणे. ( SIP यात तुम्ही मासिक गुंतवणूक करू शकता.)
SIP मध्ये जी मासिक गुंतवणूक करता, त्या तारखेपासून तुम्हाला ३ वर्ष वाट पहावी लागेल. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे,नोव्हेंबर २०१५ आधी तुम्ही जेवढी पण गुंतवणूक ELSS मध्ये केली आहे, ती तुम्ही आॅक्टोबर २०१८ नंतर काढू शकता. पण डिसेंबर २०१५ ची गुंतवणूक काढण्याकरिता तुम्हाला नोव्हेंबर २०१८ पर्यंत थांबावे लागेल.
ELSS मध्ये ३ वर्ष लॉक इन पिरियड का ?
तुम्ही जी गुंतावणूक करता, तिचा उपयोग देशाच्या विकासासाठी होतो. तुम्ही व्यवसायात केलेली गुंतवणूक ही उद्योगांना वाढण्यास मदत करते. यामुळे सरकार तुम्हाला करामध्ये सूट देते. त्याचा खरोखर फायदा व्यवसायांना व्हावा, यासाठी सरकारने त्यावर ३ वर्ष रक्कम काढण्यास निर्बंध लादला आहे.
***ELSS मध्ये जरी लॉक इन पिरियड ३ वर्षांचा असला, तरी तुम्ही ३ वर्ष कालावधी साठी गुंतवणूक करू नका. ३ वर्षांनंतर पण तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. पण गुंतवणूक करताना, तुम्ही दिर्घअवधीसाठी म्हणजेच १० वर्ष वा अधिक काळासाठी गुंतवणून राहण्याची तयारी ठेवली पाहिजे.
PPF आणि ELSS च्या परताव्यामध्ये फरक ( PPF vs ELSS )
फरक २००८-२०१८ या कालावधी दरम्यानचा
या काळात PPF ने सरासरी वार्षिक ८% दराने परतावा दिलाय, तर ELSS ने सरासरी वार्षिक १७% दराने परतावा दिलाय.
जर आपण १ लाखांसाठी पहिले तर आपल्याला असे दिसून येईल कि,
१ लाखाचे १० वर्षात PPF – २,२१,९६४₹ vs ELSS – ५,४०,९०३ लाख एवढे झाले.
म्युच्युअल फंड हे बाजार जोखीमेच्या अधीन असतात. त्यामुळे म्युच्युअल फंड संबंधित योजनेबद्दल सर्व कागदपत्र वाचून गुंतवणूक करावी.
म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीसाठी संर्पक :-
प्रा. डॉ. संतोष सूर्यवंशी
Ph.D. in Economics
AMFI Registered Mutual Fund Distributor &
SBI Life Insurance Adviser
www.policybazaar.com
Mob: 8459775427
*मंगळवेढा,जिल्हा सोलापूर*
Comments
Post a Comment