चायनीज फेंगशुई व इतर प्राचीन तंत्रांत असे अनेक छोटे छोटे बिनखर्चाचे उपाय सांगितले आहेत.
१. पैशाचे पाकीट कधीच मोकळे ठेऊ नका. त्यात काही नोटा-नाणी असावीतच.
२. गल्ला, कपाट यात नेहमी एक छोटी वाटी पैशांनी भरलेली ठेवा.
३. पैसा येण्याअगोदरच खर्चाचे नियोजन करूच नका किंवा तसा विचारही करू नका.
४. वेतन/फायदा पैसा आल्यानंतर खात्यावर/घरात किमान ११ दिवस तसाच ठेवा.
५. ५००/२००० ची एखादी मोठी नोट पाकीट/टेबलाच्या काचेखाली दिसेल अशी ठेवा.
६. किमान थोडेफार सोने अंगावर परिधान करा.
७. गाडीतील डिझेल/पेट्रोल संपूर्ण खाली होईपर्यंत वापरू नका.
८. घरातील धान्य, चहा, साखर, तेल इत्यादी डबे पूर्ण खाली ठेवू नका.
९. वापरात नसलेली मोडकी भांडी, वस्तू, यंत्र, फर्निचर इत्यादी घरात ठेवू नका.
१०. फाटलेले, चुरगळलेले कपडे परत शिवून रफू करून वापरू नका.
११. तुमच्या नजरेस पडेल असे हिरवे झाड किंवा रोपटे घर/कार्यालय/दुकानात ठेवा.
१२. उगवत्या सूर्याचे दर्शन जरूर घ्या.
१३. झोपताना पाण्याने भरलेला तांब्या उजव्या बाजूला उशाजवळ ठेवा.
१४. मी आनंदी, मी शक्तिमान, मी श्रीमंत आहे असे रोज सकाळी स्वत:ला म्हणा.
१५. मळलेले कपडे वापरू नका.
१६. शिळे अन्न खाऊ नका.
१७. जेवताना फोनवर बोलणे, टीव्ही पाहणे, बोलणे इत्यादी टाळा.
१८. लाल रंगाची चमकणारी एखादी वस्तू वापरा.
१९. दरिद्री व नकारात्मक व्यक्तीच्या सहवासात थांबू नका.
२०. प्राणी व गरीबांना अन्नदान करा.
२१. रोज किमान १२ तास काम करा. शेवटचा उपाय केला नाही तर पहिल्या २० चा काहीही उपयोग नाही.
Comments
Post a Comment