आपण कष्टाने कमावलेले पैसे हे सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या विविध क्षेत्रामध्ये गुंतवावा असे सर्वाना वाटत आणि ते काही गैर नाही. पण प्रत्येकालाच आर्थिक व्यवहारांची चांगली माहिती असेलच असे नाही. मग अशावेळी म्युच्युअल फंड योग्य ती भूमीका पार पडतो. म्युच्युअल फंड गुंतवणूक पर्यायामध्ये अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र केले जातात आणि एका विशिष्ठ उद्देशासाठी वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायामध्ये ते गुंतवले जातात . 1. म्युच्युअल फंडाचा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन दरमहा लहान रकमेची गुंतवणूक करून ठराविक कालावधीत संपत्ती निर्माण करण्याचा सोपा मार्ग आहे. 2. एसआयपी द्वारे जमा झालेला पैसा शेअर्स आणि कर्जरोखे यामध्ये गुंतविला जातो. 3. तुमच्या मुलांचे उच्च शिक्षण , लग्न किंवा तुमचे निवृत्तीनंतरचे जीवन , यासारख्या अनेक वित्तीय गरजांसाठी एसआयपी गुंतवणूक तुम्हाला वेळेवर मदत करू शकते. 4. गुंतवणूक दीर्घकाळासाठी करा.(५/१०/१५/२० वर्षे) 5. दरमहा १००० रुपये एवढ्या रकमेची एसआयपी गुंतवणूक त...