आपल्या गुंतवणूकीवर सरस परतावा मिळवण्यासाठी म्युच्युअल फंड हा एक पर्याय असू शकेल. गुंतवणूक करताना नेहमी, गुंतवणूक करणा-या व्यक्तीची जोखिम घेण्याची क्षमता, वय, गुंतवणूकीची रक्कम व सातत्य, त्याची इतर आर्थिक जबाबदारी, गुंतवणूकीचा कालावधी व गुंतवणूकदाराचे आर्थिक उद्दिष्ट (Financial Goals) या सगळ्याच गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि या सर्व निकलातून पारखून सरस परतावा देणारा एक पर्याय म्हणजे म्युच्युल फंड. शेअर बाजारातील थेट गुंतवणूक जरी गुंतवणूकदारास आकर्षित करीत असली तरी त्यासाठी आवश्यक असे भांडवल, दयावा लागणारा वेळ व तांत्रिक ज्ञान, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, शेअर बाजाराचा अभ्यास व जागतिक घडामोडींचा शेअर बाजारावरील परिणामाचा अभ्यास, भीती व लोभ या वरील नियंत्रण, शिस्तबध्दता या सर्व गोष्टी एकत्र जुळून येण्याचा अभाव असल्याने तुलनेने सोपी अशी गुंतवणूक म्युच्युअल फंडात करता येईल. यात जोखीम ही तुलनेने कमी आहे व कमी रकमेतून ही गुंतवणूक करता येईल. कर बचतीचे उद्दीष्ट साध्य करता येईल. अडीअडचणीच्या वेळी गुंतवलेल्या पैश्याची त्वरीत उपलब्धता ही सोयही म्युच्युअल फंडाचा एक पैलू आहे. जितक्या लवकर व...