डिसेंबर 2016 मध्ये सर्व वस्तूंच्या घाऊक किंमत निर्देशांकात आधिच्या महिन्याच्या तुलनेत 0.2 टक्के घट होऊन तो 182.8 (तात्पुरती) आकडेवारी राहिला.
| |
मासिक घाऊक किंमतीवर आधारित चलनफुगवट्याचा दर डिसेंबर 2016 मध्ये 3.39 टक्के राहिला.
| |
प्राथमिक घटक : -
| |
प्राथमिक घटकाचा निर्देशांक गेल्या महिन्याच्या 259.4 वरुन घसरुन तो 256.3 वर स्थिरावला. टक्क्यांच्या तुलनेत ही घट 1.2 टक्के नोंदवली गेली. खाद्यान्न गटातल्या वस्तूंच्या निर्देशांकात 2.2 टक्के घट झाली. फळे आणि भाज्या, तूर, मसूर, उडीद, मूग यांच्या किंमतीत घट झाली तर नाचणी, ज्वारी, गहू, बाजरी यांच्या किंमतीत वाढ झाली.
| |
अखाद्य वस्तूंच्या गटाच्या निर्देशांकात 1.9 टक्के वाढ नोंदवली गेली. फुले, कच्चे रबर, नारळ, भुईमूग, कच्चे रेशीम यांच्या किंमतीत वाढ झाली.
| |
खनिजे गटाच्या निर्देशांकात 2.8 टक्के वाढ झाली.
| |
इंधन आणि ऊर्जा : -
| |
इंधन आणि ऊर्जा गटाच्या निर्देशांकात 0.7 टक्के वाढ झाली. केरोसिन, पेट्रोल, एलपीजी यांच्या किंमतीत वाढ झाली.
| |
उत्पादित वस्तू : -
| |
उत्पादित वस्तू गटाच्या निर्देशांकात 0.1 टक्के वाढ झाली. अन्न उत्पादने, वस्त्रोद्योग, लाकूड आणि लाकडी उत्पादने, चामडे आणि चामडी उत्पादने, रसायने आणि रासायनिक उत्पादने या गटांच्या निर्देशांकात घट दिसून आली तर कागद आणि कागदी उत्पादने, शीतपेये, तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादने, अधातू खनिज उत्पादने या गटांच्या निर्देशांकात वाढ दिसून आली.
|
Digital India Initiatives by Modi Government ● New checks on booking of e-ticket/i-ticket through IRCTC website introduced with a view to further prevent possible misuse. Under the new provisions a maximum of 6 tickets can be booked online by an individual user in a month on IRCTC website. ● Cancellation of PRS counter tickets through IRCTC website and 139 introduced ● Printing of Bar Code on Unreserved tickets introduced to Prevent Fraud. ● International Debit and Credit Cards accepted for payment for e-ticketing through IRCTC website ● India’s first High Speed Public Wi - Fi Service at Mumbai Central station inaugurated. ● ...

Comments
Post a Comment