१. खर्च कमी करून बचत वाढवा: पगारच पुरत नाही तर बचत कशी करू ? या मानसिकतेमधून बाहेर पडा. रोजचा जमा खर्च लिहायची शिस्त स्वतःला लावून घेतल्यास होणारा अनावश्यक खर्च लक्षात येतो. तसेच नियोजन यशस्वी होण्यासमदत होते. दर महिन्याला पगारातील ठराविक रक्कम बँकेत जमा करण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी. यामुळे वर्षाच्या शेवटी जमा होणारी मोठी रक्कम गुंतवणूक किंवा आपला वैयक्तिक व कौटुंबिक खर्च , व्हेकेशन ट्रिप , कर्जाचं प्रीपेमेन्ट , इत्यादीसाठी वापरता येईल. २. विमा: विमा म्हणजे गुंतवणुकीबरोबरच आर्थिक संकटाची तरतूद आहे. खरतर ' विमा ' या पर्यायाकडे पूर्वी फक्त आर्थिक संकटाची तरतूद म्हणून पहिले जायचे. परंतु आधुनिक काळात विम्याच्या बदललेल्या स्वरूपाने त्याला गुंतवणुकीचा दर्जाही मिळाला आहे. जीवन विमा , वाहन विमा , अपघात विमा याबरोबरच सगळ्यात महत्वाचा असतो तो आरोग्य विमा आरोग्यावर होणाऱ्या खर्चामुळे अनेकदा आपलं आर्थिक नियोजन बिघडत जातं. ३. क्रेडिट कार्ड: क्रेडिट कार्डचा अनेकजण वापरतात. क्रेडिट कार्ड जेवढं फायद्याचं आहे. तेवढाच...