Skip to main content

Posts

मोदीनॉमिक्स आणि विमुद्रीकरण

मोदीनॉमिक्स आणि विमुद्रीकरण डॉ. संतोष दशरथ सूर्यवंशी. श्री संत दामाजी महाविद्यालय,मंगळवेढा अर्थशास्त्र विभाग. Email ID- sant.sury@gmail.com सारांश: या संशोधन लेखाचा मुख्य उद्देश मोदीनॉमिक्स आणि विमुद्रीकरण या संकल्पना स्पष्ट करणे आहे. भारत सरकारची अधिकृत संकेतस्थळ , भारतीय रिझर्व बँकेचा वार्षिक अहवाल,   Economic and Political weekly , लोकसभा व राज्यसभेतील चर्चा , दि.हिंदू, इंडियन एक्सप्रेस इत्यादी दुय्यम साधन सामग्रीचा उपयोगात करण्यात आला आहे. मोदीनॉमिक्सचा अभ्यास करण्यासाठी सन २०१४ ते डिसेंबर २०१७ हा कालखंड विचारात घेतला आहे. मोदीनॉमिक्सची सुरवात अच्छे दिन आयेंगे पासून सुरु होऊन तो  सब का साथ सब का विकास आणि संकल्प से सिद्धि तक पर्यंत पोहचला आहे . देशातील ५८ टक्के आज ही उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहेत, ८२ टक्के शेतकरी लहान व सीमांत आहेत, २१ % लोक दारिद्रय रेषेखालील जीवन जगत आहेत. यासर्वांनच्या  विकासाशिवा सब का साथ सब का विकास शक्य नाही. उद्योगपूरक  आर्थिक धोरण, उद्योग समूहाना किमान किमतीला जमीनिची उपलब्धता, श्रमकायद्यामध्ये सुधारणा, पायाभूत सुविधांचा विकास, सुशा

मी लाभार्थी, सोशल मीडिया आणि जनता

मी लाभार्थी, सोशल मीडिया आणि जनता              राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला  आॅक्टोबर २०१७  मध्ये तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त फडणवीस सरकारकडून तीनवर्षतील कामगिरीच्या  जाहिराती प्रसिद्ध करण्यास सुरवात केली आहे. त्यामध्ये  'मी लाभार्थी' हे शब्द प्रयोग करण्यात आला आहे. राज्यातील गरिबांना फडणवीस सरकारच्या  योजनांचा लाभ कसा झाला हे 'मी लाभार्थी' या जाहिरातींमधून दाखविले जात आहे. मात्र, सोशल मीडियाने सरकारच्या या जाहिरातीची खिल्ली उडवली आहे.  सन २०१४ च्या  लोकसभा व राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 'सोशल' मीडियाचा प्रभावीपणे वापर केला होता. त्याची तयारी सन २०१२ पासून मोदी स्वता करीत होते. त्याचा फायदा त्यांना दोन्ही निवडणुकांमध्ये झाला. व सरकार केंद्रात  प्रचंड बहुमताने निवडून आले,  तर राज्यात सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपची गणना झाली. तोच सोशल मीडिया आता सरकारच्या विरोधात जाऊ लागला असल्याचे 'मी लाभार्थी' या जाहिरातीनंतर स्पष्ट झाले आहे.            'मी लाभार्थी' या जाहिरातीमध्ये सरकारने स्वच्छतागृह, जलयुक्त शिवार, भूसंपादन, मा