Bull म्हणजे बैल आणि bear म्हणजे अस्वल. या दोन प्राण्यांचे स्वभाव खूप वेगळे आहेत. विशेषतः हे जेव्हा आपल्या विरोधकांवर हल्ला करतात त्यावेळी त्यांचा स्वभाव खूप वेगळा असतो. बैल हा खूप आक्रमक असतो. आपल्या शिंगांचा वापर करून समोरील विरोधकास मारण्याचा पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करतो. या उलट अस्वल चालताना काहीसा रेंगाळत चालतो. त्याचा आक्रमक स्वभाव नाही. या प्राण्यांच्या स्वभावानुसार शेअर बाजारातील तेजी किंवा मंदी दर्शवण्यासाठी bull market आणि bear market या संज्ञा वापरल्या जातात.
गुंतवणूकदारांकडून किंवा शेअर बाजारातील विश्लेषकांकडून बुल मार्केट आणि बेअर मार्केट (Bull Market Bear Market) या दोन्ही संज्ञा वापरल्या जातात. Bull market म्हणजे शेअर बाजारातील (काही वेळा नाणेबाजार, वस्तू बाजार – कमोडिटी मार्केट ) तेजी दर्शवणारी स्थिती होय. मग ही तेजी बाजारातील असेल किंवा एखाद्या शेअरची. बुल मार्केट मध्ये गुंतवणूकदार आशावादी असतात त्यामुळे गुंतवणुक करण्यात आक्रमक असतात. कधी हि स्थिती तात्पुरती किंवा कधी दीर्घकाळ असू शकते. काही वेळा बुल मार्केट स्थिती काही लोकांकडून सट्टेबाजीमुळे निर्माण होते आणि अशा परिस्थिती मध्ये गुंतवणूकदरांची फसवणूक झाल्याचे अनुभवास येते. (कालांतराने बाजार कोसळतो).
त्याउलट bear market म्हणजे बाजारातील मंदी दर्शवणारी (downward trend) स्थिती. अशा स्थितीमध्ये गुंतवणूकदार निराशावादी असतात. बाजारातील गुंतवणूक कमी करणे किंवा नव्याने गुंतवणूक न करणे पसंत करतात. कधी हि स्थिती तात्पुरती किंवा कधी दीर्घकाळ असू शकते. परंतु काही ट्रेडर बेअर मार्केट ही स्थिती संधी म्हणून बघतात. कमी दरामध्ये गुंतवणूक करून त्यामध्ये नफा कमावतात. यामध्ये केलेली गुंतवणूक अल्प किंवा दिर्घकाळ असू शकते. काही कंपनी या काळामध्ये शेअर buy back (पुनर्खरेदी) करतात.
Very informative
ReplyDeleteThanks