हिंदुस्तान लिव्हर हे भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणारे ग्राहकोपयोगी वस्तू बनवणारी कंपनी आहे. 80 वर्षांपासून हे कंपनी देशात कार्यरत आहेत. देशातील दहापैकी नऊ कुटुंबांमध्ये आज या कंपनीची उत्पादने वापरले जातात. हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीचे 40 पेक्षा जास्त ब्रँड आहेत. या कंपनीमध्ये सध्या 18 हजार कामगार कार्यरत आहेत. कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये संजिव मेहता चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्याचबरोबर श्रीनिवास पाठक प्रदीप बॅनर्जी आदित्य नारायण संजीव मिश्रा इत्यादी डायरेक्टर आहेत. कंपनीचे सर्वाधिक महसूल गृह उपयोगी वस्तू सौंदर्यप्रसाधनांची साधने अन्न आणि अन्य घटकातून येते. 2018 -19 मध्ये कंपनीचा महसूल 38224 कोटी इतका आहे.