सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारताच्या वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी कार्पोरेट टॅक्समध्ये घट करण्याची घोषणा केली तेव्हापासून भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजीला सुरुवात झाली आहे. कार्पोरेट टॅक्सच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारांमध्ये शेअर बाजाराचे इतिहासात पहिल्यांदा सर्वात मोठी उसळी दोन दिवसात मारले होती. त्यानंतर पाठीमागील 14 ट्रेडिंग स्टेशनमध्ये शेअर बाजारात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार यांच्याकडून सातत्याने भारतीय शेअर बाजारात खरेदी सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून पाठीमागच्या 14 ट्रेडिंग सेशन मध्ये सेन्सेक्समध्ये अडीच हजार पॉइंटची वाढ झाली आहे. यादरम्यान गुंतवणूकदारांच्या वेल्थ मध्ये 11 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 20 सप्टेंबर 2019 पासून आज दिनांक 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत थेट विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार व देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार यांच्यामार्फत देशातील इक्विटी मार्केटमध्ये 11 हजार 674 कोटी रुपयांचे निव्वळ खरेदी झाली आहे. या गुंतवणुकीचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा क्षेत्रावर झाला आहे किंवा शेअर बाजाराच्या विविध हेक्टरवर झाला आहे.
त्याचाच परिणाम म्हणून आज सेन्सेक्स परत एकदा ऑल टाईम उच्च पातळीवर गेला. तीन जून 2019 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ने सर्व काळातील सर्वोच्च 40267 ला गेला होता. आज 30 ऑक्टोबर रोजी सेन्सेक्स क्लोजिंग 40051 ला आहे. म्हणजे परत एकदा सेन्सेक्स सर्वोच्च पातळी गाठण्यासाठी तयार आहे. सप्टेंबर 20 पासून ते ऑक्टोबरच्या 30 तारखेपर्यंत बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज एकूण 12 सेक्टर पैकी फक्त 2 सेक्टर मे निगेटिव्ह परफॉर्मन्स दिला आहे. यामध्ये आयटी सेक्टर आणि मीडियाचा समावेश आहेत. सर्वाधिक तेजी ऑटो सेक्टर 12.49%, एनर्जी सेक्टर 6.21%, सार्वजनिक क्षेत्रातील बँका 5.20%, वित्तीय सेवा 4.1%, एफएमसीजी आणि फार्मा सेक्टर प्रत्येकी 6% मेटल स्टॉक आणि बँक निफ्टी मध्ये प्रत्येकी 5 % आणि रियलिटी सेक्टरमध्ये 2.74 % वाढ नोंदवली आहे.सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या 30 तारखेपर्यंत बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज एकूण 12 सेक्टर पैकी फक्त 2 सेक्टर मे निगेटिव्ह परफॉर्मन्स दिला आहे. यामध्ये आयटी सेक्टर आणि मीडियाचा समावेश आहेत. सर्वाधिक तेजी ऑटो सेक्टर 12.49%, एनर्जी सेक्टर 6.21%, सार्वजनिक क्षेत्रातील बँका 5.20%, वित्तीय सेवा 4.1%, एफएमसीजी आणि फार्मा सेक्टर प्रत्येकी 6% मेटल स्टॉक आणि बँक निफ्टी मध्ये प्रत्येकी 5 % आणि रियलिटी सेक्टरमध्ये 2.74 % वाढ नोंदवली आहे.या वाढीचा सर्वाधिक फायदा हा प्रामुख्याने सरकारी कंपन्यांना झाला आहे. त्यामध्ये भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, इंडियन टुरिझम कार्पोरेशन ऑफ इंडिया, नॅशनल ॲल्युमिनियम लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, आयर्न इंटरनॅशनल लिमिटेड या कंपन्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वाढीचा फायदा झालेल्या अनेक स्टॉक मध्ये इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 60%, नॅशनल ॲल्युमिनियम कार्पोरेशन लिमिटेड 56%, अदानी ग्रीन 54%, टाटा मोटर्स 50% येस बँक 37% पॉली कॅप 26% आयशर मोटार 26% बंधन बँक 24% जमना ऑटो 24 ग्रॅन्युल्स 23% अवंती फीड 22% टाटा एलेक्सी 21 टक्के नोकरी 20% एमसीएक्स 20% एसबीआय लाइफ 18% मदरसुमी 16%. यावरून लक्षात येते की भारतीय शेअर बाजारांमध्ये परत एकदा तेजीला सुरुवात झाली आहे. मॉर्गन स्टॅनली या ब्रोकरेज हाऊसच्या मते जून 2020 पर्यंत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स पंचेचाळीस हजारापर्यंत जाणे अपेक्षित आहे. म्हणजे येथून पुढे 15% upside अपेक्षित आहे. या तेजीचा फायदा प्रामुख्याने एफएमसीजी स्टॉक, वित्तीय स्टॉक, इन्शुरन्स कंपन्या, इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऑटो सेक्टरला होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने गुंतवणुकीचे नियोजन करणे कधीही सोयीस्कर होईल.
प्रा. डॉ. संतोष सुर्यवंशी
वित्त सल्लागार,
शिवश्री फिनान्शियल सर्विसेस. मंगळवेढा.
दूरध्वनी: 8459775427
Comments
Post a Comment