मुंबई शहराला आतापर्यंतचा सर्वात मोठा धोका, पहिल्यांदाच आले फोटो समोर. नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : समुद्रातील पाण्याचा पातळी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं जगभरातील बरेच देश संकटात आहेत. हा पाण्याची पातळी सतत वाढत असल्यामुळं 2050 पर्यंत जगभरातील अनेक शहरांवर याचा विपरीत परिणाम होणार आहे. दरम्यान नुकत्याच एका रिचर्समध्ये याबाबत अभ्यास करण्यात आला. त्यानुसार, पाण्याची पातळी वाढल्यामुळं जगभरातील 15 कोटी लोकांना याचा फटका बसणार आहे. काही वर्षांनंतर या 15 कोटी लोकांकडे राहण्याची सोयही नसणार आहे. या रिचर्सनुसार समुद्रातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळं मुंबई शहर पूर्णपणे नष्ट होऊ शकते, असा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या रिचर्समध्ये शास्त्रज्ञांनी सॅटेलाइटमधून आलेल्या फोटोंवरून हा निकष काढला आहे. न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार, सॅटेलाइटच्या मदतीनं समुद्रातील पाण्याच्या पातळीची गणना करण्यात आली आहे. यावरून ही पातळी वाढत असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. हा रिसर्च प्रतिष्ठित जर्नल नेचर कम्युनिकेशननं प्रकाशित केला आहे. Free Demat Account संपूर्ण मुंबई जाणार पाण्याखा...