Skip to main content

Posts

Showing posts from November, 2018

Rich Dad Poor Dad

जगप्रसिद्ध गुंतणूकदार आणि Rich Dad Poor Dad या त्यांच्या जगप्रसिद्ध गाजलेल्या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी म्हणतात "जगातील ९०% लोक ही रॅट रेसमध्ये अडकलेली असतात. म्हणजेच काय तर सकाळी उठणे कामाधंद्यास जाणे त्यातून कमावणे, खर्च करणे, देणी देणे, परत कमवणे खर्च करणे देणी देणे आणि हे दुष्टचक्र आयुष्यभर चालूच असते म्हणून ह्या व्यक्ती कधीच श्रीमंत होऊ शकत नाहीत" कारण ह्या व्यक्ती आपण कमावलेल्या पैशाचे कधीच संपत्तीत रूपांतर करत नाहीत जसे की -रिअल इस्टेट ज्यातून भाडे मिळू शकते किंवा किंमत वाढू शकते. - शेअर्स खरेदी करणे - व्यवसायात गुंतवणूक करणे फक्त आज कमावलेले आज खर्च करणे आणि उद्याची वाट बघणे हेच ते करत असतात आणि यात मूळ अभाव असतो आर्थिक शिक्षणाचा आणि कधीच ना केलेल्या आर्थिक नियोजनाचा. आपण प्रत्येकाने शाळेत असताना "जोड्या लावा" ह्या प्रकारांमध्ये भरघोस गुण मिळवले असतील इतका सोपा गुण मिळवून देणारा प्रकार होता. पण जेव्हा आज आपल्या जीवनात काही आर्थिक ध्येयं आहेत त्यांच्यासाठी आज आपण काय गुंतवणूक केली आहे अशा जोड्या लावायला सांगितल्या तर किती त्रासदायक होईल? कारण या पद्

मेडिक्लेम....एक अत्यावश्यक गरज

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण सर्वच जण अगदी धावत आहोत पैश्यांसाठी, करीअरसाठी, टार्गेट साठी,  दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी...!         पण या सर्व व्यापात आपण स्वतःला च विसरून गेलो अाहोत. कुटुंबातील व्यक्तिंसोबत वेळ देणे, नियमीत पायी फिरायला जाणे, मैदानी खेळ खेळणे, पोहणे, सायकल चालविणे, निसर्गाच्या सान्निध्यात राहणे हे अगदी दुरापास्त झाल्यासारखे आहे. सतत कामाचा ताण, व्यायामाचा अभाव, सकस अाहाराचा अभाव, तेल व फास्ट फुड चा अति वापर, वाढत चाललेली व्यसनाधीनतेची फॅशन यावर आपल्या शरीरावर जो अन्याय होतोय तो आपण सोयीस्कर विसरतो . परिणामी आजकाल अगदी पस्तीशीच्या लोकांनाही ह्रदयविकार, अतिरक्तदाब, मधुमेह, दमा, लठ्ठपणा आदी समस्या उद्भवत आहेत. गतिमान आयुष्यात अधिक गतीने व पुरेशी सावधानता व वाहतूकीचे नियम न पाळता वाहने चालविणे वा आपण कितीही व्यवस्थित चाललो तरी  दुसरयांच्या चुकीमुळे अपघात हेही नित्याचेच झालेले आहेत. अशा एकंदरीत प्रतिकूलतेचा विचार केल्यास *आपल्याला केव्हा ना केव्हा तरी हाॅस्पीटलची पायरी चढावीच लागणार ही जाणीव प्रत्येकाला असलीच पाहिजे.*            आपण अनेकविध भौतिक सुखं व चैनीच्या वस्