प्रवासात आपण "स्टार्ट अर्ली , रिच सेफली " हे वाक्य नेहमी वाचतो . अर्थात लवकर प्रवास सुरु करा म्हणजे वेग कमी असला तरी आपण वेळेत आणि सुरक्षीतपणे योग्य ठिकाणी पोचतो. गुंतवुणकीचे सुद्धा तसेच असते. तरुण वयात लवकर गुंतवणूक सुरु करून आपण गुंतवणुकीचा कालावधी खूप मोठा ठेवून संपत्ती उभी करू शकतो. शिवाय तरुण वयात गुंतवणूक करताना थोडी जोखीम घेतली तरी कालांतराने त्या जोखमीचे रूपांतर फायद्यात होते. तसेच गुंतवणुकीचा कालावधी खूप मोठा असल्यामुळे चक्रवाढ पद्धतीने परताव्याचा फायदा आश्चर्यकारक पद्धतीने वाढतो. अर्थात अशी गुंतवणूक सुरु करण्यापूर्वी त्या गुंतवणुकीतून किती परतावा मिळू शकतो, याचा अंदाज घ्यायला हवा. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाहिल्यास म्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय दीर्घकाळात चांगला परतावा देण्याची क्षमता बाळगतो, हे सिद्ध झाले आहे. आजच्या भारतीय तरुणांच्या करियरचा विचार केल्यास साधारणतः 25 वर्षांपर्यंत शिक्षण संपून त्यांच्या नोकरी-व्यवसायाला सुरवात होते. अगदी त्याचवेळी म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरु करून पुढील 20 वर्षांचे नियोजन केल्यास वयाच्या 45 व्या वर्षी त्याच्...