कर्जमाफीचा तांत्रिक घोळ- पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली महाराष्टातील कर्जमाफीच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचणींमुळे निर्माण झालेल्या गोंधळाची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली असून महाराष्ट्र सरकारला जाब विचारला आहे. राज्याच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाने हे काम खासगी कंपनीला दिलेले आहे खासगी कंपनी आणि बँकांनी केलेल्या चुकांमुळे कर्जमाफीच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अडचणी सोडविण्यासाठी धावपळ उडाली असली तरी कर्जमाफीच्या प्रक्रियेतील तांत्रिक घोळ अजूनही मिटलेला नाही. दिवाळीत जाहीर केलेल्या साडेआठ लाख पात्र शेतकऱ्यांपैकी काहींची पहिली यादी सायंकाळी उशिरा माहिती-तंत्रज्ञान विभागाने सहकार खात्याला पाठविली. पण तांत्रिक अडचणींमुळे तीही उघडण्यात अडचणी आल्याने गोंधळ उडाला होता. कर्जमाफीची घोषणा करुन साडेचार महिने उलटले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीत आठ लाख ४० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी व प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्यात आल्याचे जाहीर केले. दररोज छाननी पूर्ण होईल व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी जमा होईल, असे सांगितले गेले. मात्र अजून पहिल्या यादीत...